गोव्यात शिवसेनेला मोठा धक्का; दसऱ्यादिवशीच उपाध्यक्षांचं सीमोल्लंघन

गोव्यात शिवसेनेला मोठा धक्का; दसऱ्यादिवशीच उपाध्यक्षांचं सीमोल्लंघन

महाराष्ट्रात शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याची (Big shock to Shivsena in Goa) जोरदार चर्चा सुरु असताना पक्षाला गोव्यात मोठा झटका बसला आहे.

  • Share this:

पणजी, 15 ऑक्टोबर : महाराष्ट्रात शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याची (Big shock to Shivsena in Goa) जोरदार चर्चा सुरु असताना पक्षाला गोव्यात मोठा झटका बसला आहे. गोव्यातील शिवसेनेच्या उपाध्यक्षा राखी नाईक (Goa vice president Rakhi Naik resigns) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत रामराम ठोकला आहे. शिवसेनेसाठी गोव्याच्या राजकारणात हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

काय म्हणाल्या राखी नाईक

राखी नाईक यांनी शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. गोव्याच्या प्रश्नात शिवसेनेच्या नेत्यांना रसच नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गोव्यातील नागरिकांच्या प्रश्नांसंदर्भात शिवसेना तळमळ दाखवेल, अशी अपेक्षा असल्यामुळेच आपण पक्षात प्रवेश केला होता. मात्र प्रत्यक्षात स्थिती तशी दिसली नाही, अशी टीका त्यांनी पक्षावर केली आहे.

गोव्यातील प्रश्नांकडे दुर्लक्ष

गोव्यात पक्षाची वाढ व्हायची असेल, तर गोवेकरांच्या स्थानिक प्रश्नांत लक्ष घालणं गरजेचं आहे. मात्र गेल्या काही वर्षात शिवसेना नेते नुसते गोव्यात येतात, मात्र प्रत्यक्षात जनतेच्या प्रश्नावर काहीच हालचाली होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गोव्यातील जनतेप्रति आपली जबाबदारी असून पक्षापेक्षा जनता अधिक महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

जनतेसाठी काम करण्याचा निर्धार

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर इतर कुठल्याही पक्षात जाण्याचा आपला विचार नसून जनतेसाठी स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. इतर कुठल्या पक्षात प्रवेश घेण्याबाबत सकारात्मक किंवा नकारात्मक असा कुठलाही विचार सध्या नसून जनतेची कामं करण्यावर आपला भर असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली आहे.

हे वाचा- हिंदुत्वाला खरा धोका नवहिंदूंपासूनच! उद्धव ठाकरेंचा टोला

शिवसेनेचं गोव्यावर लक्ष

महाराष्ट्राच्या शेजारील राज्य असणाऱ्या गोव्याच्या राजकारणात शिवसेनेनं गेल्या काही वर्षांपासून लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचं गोव्यात सध्या फारसं राजकीय वजन नसून राजकीय चंचूप्रवेश करण्याच्या तयारीत पक्ष असल्याचं दिसत आहे. त्या दृष्टीनं पक्षानं गोव्यातील पक्षबांधणीवर लक्ष दिलं असताना उपाध्यक्षांचा राजीनामा हा शिवसेनेसाठी मोठा झटका मानला जात आहे.

Published by: desk news
First published: October 15, 2021, 10:18 PM IST

ताज्या बातम्या