
'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू माता आणि बंधू भगिनींनो…असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली. मला कल्पना आहे, आपल्याला संधी मिळाली आहे. आपला आवाज कुणीच दाबू शकत नाही आणि आवाज दाबणारा कधी जन्माला येणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 'आजचा हा क्षण आपल्यासाठी खूप मोलाचा आहे. बाळासाहेबांनी ज्याची सुरुवात केली होती, तो तुमच्या साक्षीने आपणज पुढे नेत आहोत. शस्त्र पुजन केल्यानंतर मी तुमच्यावर फुलं उधळली, कारण तुम्ही माझे खरे शस्त्र आहात' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

आज जर हिंदुत्वाला धोका असेल, तर तो परकीयांपासून नाही. तो स्वकीयांपासूनच आहे. हिंदुत्वाच्या शिडीवर चढून इंग्रजांची फोडा आणि झोडा ही निती वापरली जात आहे. यांच्यापासून सर्वांनी सावध राहणं गरजेचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

आज जर हिंदुत्वाला धोका असेल, तर तो परकीयांपासून नाही. तो स्वकीयांपासूनच आहे. हिंदुत्वाच्या शिडीवर चढून इंग्रजांची फोडा आणि झोडा ही निती वापरली जात आहे. यांच्यापासून सर्वांनी सावध राहणं गरजेचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मला स्वत: मी कधी मुख्यमंत्री आहे असं वाटू देत नाही. कारण मी मला तसं कधी वाटत नाही. माझं तर असं म्हणणं आहे, मी तुमच्या घरातलाच माणूस आहे. मी तुमचा भाऊ आहे, ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. काही जण म्हणत होते मी पुन्हा येईन, पण आता बस तिकडेच. कारण संस्कार हे महत्त्वाचे असतात, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला.

राजनाथ सिंह हे सावरकर यांच्याबद्दल बोलले, सावरकर आणि महात्मा गांधींबद्दल बोलण्याची लायकी तरी आहे का, महिलांवर अत्याचार वाढत आहे. मी दसऱ्या मेळाव्यात बोललो होते, 'माय मरो आणि गाय जगो' हे हिंदुत्त्व नाही. यावर वाद झाला. मग हिंदुत्व म्हणजे काय आहे, कुणाकडून हिंदुत्व शिकायचं? आणि कुणाला शिकवायचं? जर हिंदुत्वाला धोका नाही, आजच जर हे सत्य आहे, तेव्हा हिंदूत्वाला धोका होता तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे उभे राहिले होते. त्यावेळी अनेकांनी धमक्या दिल्या उडवून टाकू, ज्या रंगाची गोळी माझ्या अंगाला शिवून जाईल तो रंग देशातून पुसून टाकू असा इशारा बाळासाहेबांनी दिला होता.

सकाळी संघाचा मेळावा झाला, मी जे काही बोलतोय याचा अर्थ असा नाही की, मी मोहन भागवत यांच्यावर टीका करत नाही. तुमचीच माणसं जर हे ऐकत नसतील तर ही मेळाव्याची थेरं करायची कशाला. एकीकडे तुमच्या हिंदूत्व म्हणजे, आम्ही कुणाचा द्वेष मत्सर करत नाही, असा विचार तुम्ही देताय पण दिवसाढवळ्या जे दिसतंय, ते मोहन भागवत तुम्हाला मान्य आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

जर तुम्हाला धमकी द्यायची असेल तर स्वत: च्या लायकीनुसार द्या, ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या मागे उभे राहुन काय बोलता. मी सुद्धा आज पक्षप्रमुख म्हणून बोलायचं झालं तर शिवसैनिकांच्या ताकदीतून उत्तर द्यायला तयार आहे. पोलिसांच्या मागे लपून बसायचे म्हणजे हे नामर्दपणा आहे,

छापा-काटा हा जसा खेळ असतो, तसाच खेळ केंद्रातील सत्ताधीश खेळत आहेत. आम्हाला तुमचा काटा काढायचा आहे म्हणून आम्ही छापा टाकतो आहोत, असा खेळ सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला.

टीकाकारांना सुनावले जे चिरकणे आहे, ठाकरे घराण्यावर हल्ले करायचा विचार करताय तिथल्या तिथेच ठेचून काढू. आता रोजगार हमीचे काम सुरू झाले आहे. तुम्ही जितके चिरकाल तितके पैसे मिळत आहे. तुम्ही जितका चिरकाल तितका माझा वाडा हा चिरेबंद आहे. डोकं फुटेल पण भेगा पडणार नाही.

तुम्ही वचन मोडलं. आणि मी हे पद स्विकारलं आणि कारण माझ्या पित्याला वचन दिलं होतं. मी तुमच्या शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवले, असं वचन आणि जबाबदारी घेतली होती. कदाचित जर दिलेले वचन त्यांनी पाळलं असतं तर कदाचित मी राजकीय जिवनातून बाजूला सुद्धा झालो असतो. हे माझं क्षेत्र नाही, मी एक पूत्र कर्तव्य पार पडण्यासाठी ठामपणे उभा आहे. हे काही थोतांड नाही. मैं झोला उठाके आया हु, असले कर्मदरीद्री विचार माझे नाही.

हिंदू राष्ट्र हा संघ जेव्हा शब्द वापरतो. तेव्हा त्यामध्ये सत्तापिपासूपणा नसतो, त्यामध्ये सत्ता मिळवण्याची लालसा नसते. सत्तेसाठी संघर्ष करत असताना विवेक वापरावा, वैचारिक लढा हवा, युद्ध नको, आता तुमच्या वर्गातून जी माणसं बाहेर पडली आहे, त्यांनी सत्ता काबिज केली आहे. त्यांना एकदा शिकवणी लावा. सध्या जो काही खेळ चालू आहे, सर्व काही करायचं आहे पण मला सत्ता हवी आहे. सत्तेचं व्यसन हे एक अंमली प्रकार आहे आहे. अगदी बाजार उद्यान समित्यापासून ते लोकसभेपर्यंत माझ्या अंमलाखाली पाहिजे, हा सुद्धा अंमली प्रकार आहे. या अंमली प्रकाराचा बंदोबस्त कोण करणार आहे, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.




