नवी दिल्ली, 14 फेब्रुवारी: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 (UP Assembly Election 2022) च्या दुसऱ्या टप्प्यासाठी राज्यातील 55 जागांव्यतिरिक्त, गोवा (Goa Assembly Election 2022) आणि उत्तराखंडच्या (Uttarakhand Assembly Election 2022) सर्व विधानसभा जागांसाठी सोमवारी मतदान होत आहे. यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami), माजी मुख्यमंत्री हरीश रावत (Harish Rawat) आणि समाजवादी पक्षाचे (एसपी) नेते आझम खान (Azam Khan)हे प्रमुख उमेदवार आहेत. गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी सोमवारी मतदान होणार असून, त्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. या जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात आहेत. गोव्यात यावेळी बहुकोणीय लढत होत आहे, आम आदमी पार्टी (AAP), तृणमूल काँग्रेस (TMC) आणि इतर लहान पक्ष राज्याच्या निवडणूक परिदृश्यावर छाप पाडण्यासाठी स्पर्धा करत आहेत. एका निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले की, कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी मतदान केंद्रांवर मतदारांना गोल्व्हज दिले जातील. ते म्हणाले की, महिला मतदारांच्या सोयीसाठी राज्यात 100 हून अधिक महिला मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशात 55 जागांसाठी मतदान उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज 9 जिल्ह्यांतील 55 जागांसाठी मतदान होणार असून त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका सात टप्प्यांत प्रस्तावित आहेत. दुसऱ्या टप्प्यात सहारनपूर, बिजनौर, मुरादाबाद, संभल, रामपूर, अमरोहा, बुदौन, बरेली आणि शाहजहांपूर या नऊ जिल्ह्यांतील विधानसभेच्या 55 जागांसाठी सोमवारी मतदान होणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करून निवडणुका घेण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. उत्तराखंड विधानसभेच्या 70 जागांसाठी सोमवारी होणाऱ्या निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. उत्तराखंडमध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतदान सुरू होणार असून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. मतदानासाठी 11,697 केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या नेत्यांच्या भवितव्याचा फैसला होणार या निवडणुकीत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, त्यांचे मंत्रिमंडळ सहकारी सतपाल महाराज, सुबोध उनियाल, अरविंद पांडे, धनसिंग रावत आणि रेखा आर्य यांच्याशिवाय भाजपच्या उत्तराखंड युनिटचे अध्यक्ष मदन कौशिक हे महत्त्वाचे उमेदवार ज्यांचे राजकीय भविष्य ठरवायचे आहे. काँग्रेसच्या प्रमुख उमेदवारांमध्ये माजी मुख्यमंत्री हरीश रावत, माजी मंत्री यशपाल आर्य, काँग्रेसच्या उत्तराखंड युनिटचे अध्यक्ष गणेश गोदियाल आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रीतम सिंह यांचा समावेश आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 57, काँग्रेसला 11, तर अपक्ष उमेदवारांनी दोन जागा जिंकल्या होत्या. हे प्रमुख उमेदवार आहेत ज्यांच्या भवितव्याचा फैसला होणार गोव्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत (भाजप), विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (काँग्रेस), माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाओ (टीएमसी), रवी नाईक (भाजप), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष), माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई (GFP), सुदिन ढवळीकर (MGP), माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर आणि AAP चे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अमित पालेकर यांचा समावेश आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) यांनी निवडणूकपूर्वी युतीची घोषणा केली होती, तर अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी (AAP) स्वबळावर निवडणूक लढवत आहे. उत्तर प्रदेशातही मतदान उत्तर प्रदेशमध्ये आज सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील 55 जागांपैकी 2017 मध्ये भाजपने 38 जागा जिंकल्या, तर सपाला 15 आणि काँग्रेसला दोन जागा मिळाल्या. सपा आणि काँग्रेसने गेल्या विधानसभा निवडणुका युतीने लढल्या होत्या. सपाने जिंकलेल्या 15 जागांपैकी 10 जागांवर मुस्लिम उमेदवार विजयी झाले. या टप्प्यातील रिंगणातील प्रमुख चेहऱ्यांमध्ये उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री धरमसिंग सैनी यांचा समावेश आहे, जे भाजप सोडून सपामध्ये सामील झाले आहेत. आझम खान यांना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या रामपूर मतदारसंघातून तर सैनी नकुड विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत. खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांना स्वार मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १० फेब्रुवारीला मतदान झाले. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.