• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • ...म्हणून देशात वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; आताच व्हा सावध! ICMR ने दिला इशारा

...म्हणून देशात वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; आताच व्हा सावध! ICMR ने दिला इशारा

शुक्रवारी दिवसभरात 1,145 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 2,56,507 एवढी झाली आहे.

शुक्रवारी दिवसभरात 1,145 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 2,56,507 एवढी झाली आहे.

देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 31 लाख झाली आहे. याचसोबत मृतांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मात्र भारतात कोरोनाचा प्रसार का होत आहे, याबाबत पहिल्यांदाच ICMR ने कारण दिले आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : देशातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या दिवसेंदिवस मोठ्या गतीनं वाढत आहे. देशातल रोज सरासरी 60 हजार नवे रुग्ण सापडत आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 31 लाख झाली आहे. याचसोबत मृतांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मात्र भारतात कोरोनाचा प्रसार का होत आहे, याबाबत पहिल्यांदाच ICMR ने कारण दिले आहे. भारतात कोरोना व्हायरसचा प्रसार होण्यास बेजबाबदार, काळजी न घेणारे आणि मास्क न घालणारे लोकच जबाबदार आहेत असा इशारा ICMRचे प्रमुख बलराम भार्गव यांनी दिला आहे. भारतातल्या कोरोना रुग्णांची आकडेवारी देत त्यांनी देशातली परिस्थिती नियंत्रणात असल्याचं स्पष्ट केलं. भारतातील 0.29 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत तर 1.92 टक्के रुग्ण आयसीयूमध्ये तर 2.7 टक्के रुग्णांना ऑक्सिजन देण्यात आलेला आहे. याचबरोबर भार्गव यांनी असेही सांगितले दुसरा सीरो सर्व्हे सुरू करण्यात आला आहे, सप्टेंबरपर्यंत त्याचे निकाल येतील. वाचा-राज्यात COVID-19 रुग्णांची संख्या गेली 7 लाखांवर, तासांत 329 जणांचा मृत्यू भार्गव यांनी यावेळी देशातील मृतांबाबत माहिती दिली. भार्गव यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार देशात कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 17 वर्षांपेक्षा कमी वयाचे 1 टक्के रुग्ण 18-25 एक टक्के रुग्ण, 26-44 वयोगटाचे 11, 45-60 वयोगट 36 तर 60पेक्षा जास्त वयोगटाचे 51 टक्के रुग्ण आहेत. वाचा-ऑक्सफर्ड लशीनंतर आता भारतात येणार रशियन लस? ICMR ने दिली मोठी माहिती मृतांची संख्या 58 हजार गेल्या काही दिवसांपासून केवळ 2 दिवसात एक लाख नवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी एका दिवसात 60 हजार 975 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, 848 जणांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 31 लाख 67 हजार 323 झाली आहे. तर, आतापर्यंत 58 हजार 390 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. वाचा-कोरोना रुग्णांच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम; अहवाल पाहून संशोधकांनाही बसला धक्का 24 लाख भारतीयांनी कोरोनाला हरवलं आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशात 7 लाख 4 हजार 348 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 58 हजार 390 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 24 लाख 4 हजार 585 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोना प्रभावित राज्यांत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 7 लाख झाली आहे. देशाचा रिकव्हरी रेट 75.9% झाला आहे. तर मृत्यूदर 1.8% आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published: