Home /News /ganesh-chaturthi /

मुंबईत आज दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, विसर्जनाआधी वाचा 'या' नव्या अटी

मुंबईत आज दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप, विसर्जनाआधी वाचा 'या' नव्या अटी

आज मुंबईत हजारो दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन होणार आहे. त्याकरता पालिकेने तयारी केलीच आहे. मात्र, करोनाचे सावट असल्याने अनेक कडक नियमावलींचे पालन करण्याचे आवाहन मुंबईकरांना केले आहे.

मुंबई, 23 ऑगस्ट : कोरोनाच्या संकटातही शनिवारी घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले. दिवसभर गणरायाची भक्ती भावाने पूजा, आरती करत सगळ्यांनीच आपल्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. मात्र, आज आपल्या लाडक्या दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. आज मुंबईत हजारो दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन होणार आहे. त्याकरता पालिकेने तयारी केलीच आहे. मात्र, करोनाचे सावट असल्याने अनेक कडक नियमावलींचे पालन करण्याचे आवाहन मुंबईकरांना केले आहे. कोरोनाचं संकट असल्यामुळे भाविकांनी काळजी घेत आणि नियमांचं पालन करत आपल्या बाप्पाला निरोप द्यायचा आहे असं आवाहन पालिकेकडून करण्यात आला आहे. आनंदाची बातमी! 73 दिवसांत भारतात उपलब्ध होणार कोरोनाची लस गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेचे नियम - घरगुती गणपती बाप्पांचे घरीच विसर्जन करावं अथवा आपल्या घरानजीक असलेल्या कृत्रिम तलावात घरातील एक किंवा दोन सदस्यांनी जावून विसर्जन करावं. - मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 70 नैसर्गिक विसर्जन ठिकाणं आहेत. तसंच यावर्षी 167 कृत्रिम विसर्जन तलाव तयार करण्यात आलं आहेत. कृत्रिम तलावांची ही संख्या गेल्या वर्षीपेक्षा 5 पट अधिक आहे. - मुंबई महानगरपालिकेने विभागवार 'फिरती गणेशमूर्ती संकलन केंद्र' सुरू केलं आहे. या केंद्राकडे लाडक्या बाप्पाला विसर्जनसाठी सोपवावं. मुंबईमध्ये कोरोनाच्या विरोधात लढ्यासाठी आणखी एक उपक्रम सुरू - नैसर्गिक तसंच कृत्रिम तलावाच्या ठिकाणी आरती करता येणार नाही. आरती घरीच करून येण्याचं पालिके तर्फे आवाहन करण्यात आलं आहे. - विसर्जन स्थळी बाप्पाची मुर्ती विसर्जन स्थळावर असलेल्या संकलन केंद्राच्या प्रतिनिधीकडे देण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे. मूर्ती विसर्जनासाठी जमा करताना सोशल डिस्टंन्सिंग पाळावं, गर्दी करू नये असंही मुंबई महापालिकेनं सांगितलं आहे. - गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी आत पाण्यात जाता येणार नाही. पालिका स्वत: गणपती बाप्पांचं विसर्जन करतील. - कंटेनमेंट झोनमध्ये सोसायटीच्या आवारात तात्पुरती विसर्जनस्थळ तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
Published by:Renuka Dhaybar
First published:

Tags: Corona, Coronavirus, Lockdown

पुढील बातम्या