जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईमध्ये कोरोनाच्या विरोधात लढ्यासाठी आणखी एक उपक्रम सुरू

मुंबईमध्ये कोरोनाच्या विरोधात लढ्यासाठी आणखी एक उपक्रम सुरू

मुंबईमध्ये कोरोनाच्या विरोधात लढ्यासाठी आणखी एक उपक्रम सुरू

व्हॉईस बायोमार्कर्स क्षेत्रात काम करणाऱ्या दोन आघाडीच्या कंपन्या व्होकलिस हेल्थ तयार करण्यासाठी एकत्रित आल्या.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 22 ऑगस्ट : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे व अस्लम शेख यांनी कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी गोरेगावमधील नेस्को जंबो सुविधेत व्हॉईस बायोमार्कर्स उपलब्ध करून देण्यासाठी व्होकलिस हेल्थकेअर उपक्रम सुरू केला आहे. व्हॉईस बायोमार्कर्स क्षेत्रात काम करणाऱ्या दोन आघाडीच्या कंपन्या व्होकलिस हेल्थ तयार करण्यासाठी एकत्रित आल्या. व्होकलिस हेल्थने फुफ्फुस, हृदय आणि मेंदूच्या तीव्र आजारांचे लवकरात लवकर निदान व्हावे यासाठी व्हॉईस बायोमार्कर्स विकसित करण्यासाठी मेयो क्लिनिकसारख्या आघाडीच्या संस्थांशी करार केला आहे. हे तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी व्होकलिस हेल्थने रियाज देसाई यांनी स्थापन केलेल्या इनोव्हंट हेल्थकेअर सोबत करार केला आहे. Tal Wenderow हे व्होकलिस हेल्थ कंपनीचे CEO आहेत, त्यांनी अँजिओप्लास्टी करण्यासाठी रोबोटचा शोध लावला. Dr. Shady Hasan हे या कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि सह संस्थापक आहेत, ते स्वत: वैद्यकीय शास्त्राच्या क्षेत्रातील एक अत्यंत कुशल डॉक्टर आहेत. हेही वाचा- धक्कादायक! फक्त माणसांमध्येच नाही तर भारतात या ठिकाणीही सापडला कोरोना व्हायरस इनोवेशन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मुंबईमधील कोरोनाविरूद्धचा लढा अधिक बळकट करण्यासाठी आणि शहरातील कोविड रूग्णांसाठी त्वरित निदान आणि रिकवरी वाढविण्यासाठी मदत होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात