मुंबई, 1 डिसेंबर : गेल्या दोन वर्षापासून संपूर्ण जग कोविड महामारीशी दोन हात करत आहेत. यावर लस विकसित करण्यात आली असली तरी उपचार मात्र शोधता आलेले नाहीत. पण, कोविड-19 हा काही जगातील एकमेव आजार नाही ज्यावर कोणताही इलाज नाही. असे अनेक रोग आहेत जे संसर्गाने पसरतात आणि त्यावर उपचार किंवा लस अद्याप शास्त्रज्ञांना शोधता आलेली नाही. एड्स हा आजार त्यापैकीच एक आहे. संपूर्ण जग 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिन (World AIDS Day) साजरा करते. हे साजरे करण्यामागचा उद्देश लोकांना या संसर्गाविषयी जागरुक करणे आणि यामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करणे हा आहे. COVID-19 साथीच्या रोगाने जगाला अनेक धडे दिले आहेत जे एड्स विरुद्ध काम करण्याच्या गरजेवर भर देतात.
यावर्षीची थीम काय आहे?
'विषमता संपवा' ही या वर्षाची थीम आहे. एड्स संपवणे म्हणजे विषमता संपवणे. जागतिक आरोग्य संघटना, युनायटेड नेशन्स आणि इतर भागीदार संस्था या एचआय सेवामध्ये वाढणाऱ्या असमानतेला दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी ज्यांच्यापर्यंत या सेवा पोहचत नाही, त्यांच्यावर लक्ष केंद्रीत करत आहे.
एड्स काय आहे? AIDS
एड्स हे ऍक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोमचे छोटे स्वरूप आहे. हा एक विकार आहे जो ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (HIV) च्या संसर्गाने पसरतो. याच्या प्रभावाविषयी बोलायचे झाले तर तो एखाद्या व्यक्तीची संरक्षण प्रणाली कमकुवत करतो, ज्यामुळे तो इतर कोणत्याही रोगाशी लढण्यास सक्षम राहत नाही. यामुळेच एड्सग्रस्तांचा मृत्यू नेहमी कोणत्या ना कोणत्या आजाराने होतो.
एड्स खरच असाध्य आहे का?
एड्सचा या आजारावर अद्यापपर्यंत कोणताही उपचार नाही हे सत्य आहे. त्यावर कोणतीही लस नाही आणि त्यासाठी प्रतिजैविकही बनवलेले नाही. पण हेही खरे आहे की काही उपचार पूर्णपणे नसले तरी मोठ्या प्रमाणात परिणामकारक ठरतात. या उपचारांमुळे व्यक्तीचे आयुष्य 20 वर्षांपेक्षा जास्त वाढू शकते.
World AIDS Day 2021: HIV बरा होतो का? जाणून घ्या काय आहेत लक्षणं आणि उपचार
एड्स संपवण्याचे ध्येय
युनायटेड नेशन्स म्हणते की एड्स आणि इतर साथीच्या आजारांवर उपचार करण्याच्या प्रयत्नांमध्ये प्रचंड असमानता संपवणे अत्यावश्यक आहे. या विषमतेविरुद्ध कठोर पावले उचलली नाहीत, तर 2030 पर्यंत एड्सचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट गमावण्याचा धोका आहे. त्यामुळे सामाजिक-आर्थिक समस्या अधिकच गडद होतील.
काय आहे इशारा?
युनायटेड नेशन्स एड्स डे वेब पेजवर, संस्थेने याची आठवण करून दिली की एड्सचा पहिला रुग्ण दिसल्यानंतर 40 वर्षांनंतरही, एचआयव्ही जगासाठी धोका आहे. 2030 पर्यंत एड्सचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नांपासून आज जग भरकटले आहे. हे ज्ञान आणि उपकरणांच्या कमतरतेमुळे नाही तर संरचनात्मक असमानतेमुळे झालं आहे. जे एचआयव्ही प्रतिबंध आणि उपचारांच्या सिद्ध उपायांमध्ये अडथळा आणत आहेत.
World AIDS Day 2020: एचआयव्हीबद्दलचे हे गैरसमज दूर करा !
आणीबाणीचा प्रकार
युनायटेड नेशन्सचे म्हणणे आहे की जर आपल्याला 2030 चे लक्ष्य गाठायचे असेल तर असमानता लवकरात लवकर संपवायला हवी. अशा प्रकारे आपण एड्सच्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देत आहोत. यावर काम न करणे आपल्याला परवडणारे नाही. एड्स विरुद्धच्या प्रयत्नांमध्ये असमानता संपवण्यासाठी जागतिक नेत्यांनी ठोस पावले उचलली नाहीत तर आणखी लाखो मृत्यू होतील.
2030 पर्यंत जगातून एड्सचे उच्चाटन करता येईल, असा विश्वास संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला आहे. एड्सला हरवण्यासाठी अनेक ठिकाणी खूप चांगलं काम केलं जात आहे. मात्र, एड्सला जगातून हद्दपार करायचं असेल तर हे काम सर्वत्र आणि सर्वांसाठी करावे लागेल. आमच्याकडे एक प्रभावी रणनीती आहे. यावर संयुक्त राष्ट्रात नेते सहमत होऊ शकतील. ही योजना पूर्णपणे अंमलात आणली पाहिजे. यासाठी समाजाचे नेतृत्व असलेल्या लोकांवर केंद्रीत रचना हवी. लस, औषधे आणि आरोग्य तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक पावले उचलावी लागतील, असं आवाहन युनायटेड नेशन्सने जगभरातील नेत्यांना केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.