World AIDS Day 2020: एचआयव्हीबद्दलचे हे गैरसमज दूर करा !

World AIDS Day 2020: एचआयव्हीबद्दलचे हे गैरसमज दूर करा !

AIDS नक्की कोणाला आणि कशामुळे होतो? एड्सबद्दल आपल्या समाजात अनेक गैरसमज आहेत.

  • Share this:

मुंबई, 01 डिसेंबर: जगभरातील लोकांना एचआयव्ही संक्रमणाबाबत जागरूक करण्याच्या उद्देशाने एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. जागतिक आरोग्य संघटनेनं 1987 पासून जागतिक पातळीवर एड्स दिन पाळायला सुरुवात केली. एड्स जागरूकता अभियानाशी निगडित जेम्स डब्ल्यू बून आणि थॉमस नेटर यांच्या नावाने या दिवसाची सुरुवात करण्यात आली.

कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो एड्स

एड्स हा आजार लहान मुले आणि तरुणांनाच होतो असा गैरसमज होता; मात्र एचआयव्ही संक्रमण कोणत्याही वयातील व्यक्तीला होऊ शकतं, हे स्पष्ट झालं आहे. 1996 मध्ये संयुक्त राष्ट्र संघानं जागतिक पातळीवर या आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्याचे काम हाती घेतलं आणि 1997 पासून जगभरात एड्सचा प्रसार रोखणं, त्याबाबत जागरूकता निर्माण करणं,त्यावरील उपचार पद्धतीची माहिती अशा सर्व स्तरांवर व्यापक काम सुरू केलं.

जागतिक एड्स दिनाचा उद्देश

एचआयव्ही संक्रमणामुळे कोणत्याही वयोगटात होऊ शकणाऱ्या एड्स या आजाराबाबत जगभरात सर्वत्र जागरुकता निर्माण करणं हा जागतिक एड्स दिनाचा प्रमुख उद्देश आहे. आजच्या आधुनिक काळातही एड्स सर्वाधिक आव्हानात्मक आजार आहे. युनिसेफच्या अहवालानुसार, आतापर्यंत 36.9 दशलक्ष लोक या आजाराचे बळी ठरले आहेत. भारतात या आजाराचे 2.7 दशलक्ष रुग्ण असल्याचे भारत सरकारने सांगितले आहे.

एचआयव्ही एड्स म्हणजे काय?

एचआयव्ही एड्स हा जीवघेण्या संक्रमणामुळे होणारा एक गंभीर आजार आहे. याला वैद्यकीय परिभाषेत ह्युमन इम्युनो डेफिशिएन्सी सिंड्रोम म्हणजेच एचआयव्ही म्हटलं जातं. तर सर्वसधारण भाषेत लोक या आजाराचा अॅक्वायर्ड इम्यून डेफीशिएन्सी सिंड्रोम म्हणजे एड्स असा उल्लेख करतात. एचआयव्ही संक्रमणामुळे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्तीच क्षीण होते. त्यामुळे शरीर साध्या आजारांनांदेखील तोंड देऊ शकत नाही.

जागतिक एड्स दिनाची संकल्पना

एचआयव्ही डॉट ओआरजी या संकेतस्थळानुसार, जागतिक एड्स दिनाची या वर्षीची संकल्पना आहे, ‘एंडिंग द एचआयव्ही एड्स : लवचिक आणि प्रभावी’. ( एचआयव्ही एड्स आजाराचे समूळ उच्चाटन : लवचिक आणि प्रभावी उपाय) 2008 पासून प्रत्येक वर्षी जागतिक एड्स अभियानाची संकल्पना ग्लोबल स्टिअरिंग कमिटीद्वारे निवडली जाते.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 1, 2020, 1:21 PM IST
Tags: lifestyle

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading