मुंबई, 29 नोव्हेंबर : स्त्रिया पॉर्न कंटेंट पाहत नाहीत, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. मात्र, अलीकडील सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की आता जगातील एकूण पॉर्न पाहणाऱ्या लोकांपैकी एक तृतीयांश या महिला आहेत. आणि यात सातत्याने वाढ होत आहे. यामागे विज्ञान आणि सामाजिक शास्त्र अशी दोन कारणे सांगितली जातात. यामागे जी गोष्ट जबाबदार मानली जात आहे, तो घटक स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही आहे.
जगातील दोन सर्वात मोठ्या पॉर्न साइट्सने एक सर्वेक्षण केलंय. त्यातून महिलांमध्ये हा वाढता कल दिसून आला. त्यानंतर प्रश्न निर्माण झाला की महिला पॉर्न का पाहतात? पुरुषांशी संबंधित या प्रश्नावर अनेक अभ्यास समोर आले आहेत. परंतु, महिला पॉर्न पाहण्याबाबत फारसे संशोधन झालेलं नाही. तरीही मिरर न्यूरॉन्समुळे स्त्रिया या उद्योगाच्या प्रेक्षक बनत आहेत हे एक प्रमुख कारण आहे.
मिरर न्यूरॉन्स हे खरे तर आपल्यामध्ये एक प्रकारची अनुकरण प्रवृत्ती निर्माण करतात. जसे की जेव्हा तुम्ही एखाद्या दृश्यात हसताना किंवा रडताना पाहता तेव्हा तुम्ही स्वतःच हसायला किंवा रडायला लागता. कारण मिरर न्यूरॉन्समुळे तुम्हाला असे वाटते की तुम्ही ती क्रिया करत आहात. या मिरर न्यूरॉन्समुळे पॉर्न कंटेंटकडे कल वाढतोय. पुरुष आणि स्त्रिया दोघांनाही हे न्यूरॉन्स असतात. आता जाणून घ्या शास्त्रज्ञ आणि तज्ञ महिलांचे पॉर्न पाहणे कसे समजतात.
Porn बघण्यास दिला नकार, 6 वर्षांच्या मुलीची दगडानं ठेचून हत्या; तीन अल्पवयीन मुलांना अटक
हा कल तरुण आणि सुशिक्षित महिलांमध्ये अधिक
मानवाप्रमाणे सुरुवातीच्या प्रजाती आणि पक्ष्यांमध्येही मिरर न्यूरॉन्स आढळले आहेत. पण त्यांच्यामुळे जर महिला पॉर्नच्या प्रेक्षक झाल्या असतील तर त्यांना याचा काय फायदा होत असेल. मानसशास्त्र तज्ज्ञांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की जास्त पॉर्न पाहिल्याने सेक्सचा आनंद घेण्याची क्षमता वाढते आणि प्रक्रिया सुलभ होते. तरुण आणि सुशिक्षित स्त्रिया जास्त पॉर्न बघतात ही वस्तुस्थिती आहे.
एका पॉर्न वेबसाइटच्या आकडेवारीनुसार 1 लाख लोकांवर केलेल्या सर्वेक्षणात असं समोल आलंय की 33.8% महिलांचे वय 18 ते 24 होते. तर 60% महिला प्रेक्षक म्हणतात की पॉर्न पाहल्याने त्यांची सेक्स लाइफ चांगली झाली. याआधी 2019 च्या एका सर्वेक्षणात पॉर्न पाहणाऱ्या महिलांचे प्रमाण 32% टक्के होते. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत 3 टक्क्याने जास्त आहे.
हा ट्रेंड पाश्चिमात्य संस्कृतींमध्ये जास्त
या सर्वेक्षणावर काही तज्ञांनी एक शक्यता अशीही वर्तवली आहे, की अनेक पुरुष हे महिलांचे संगणक किंवा मोबाईल फोन अधिक वापरत असू शकतात. त्यामुळे ही आकडेवारी वाढत असल्याचे दिसते. मात्र, जर्मन सांस्कृतिक अभ्यासक मदिता इमिंग यांचा हवाला देत एका अहवालात म्हटले आहे की, महिलांच्या लैंगिक इच्छा किंवा त्यांच्या लैंगिकतेबद्दल समाजात अजूनही संकोच आहे.
राज कुंद्रा कसा करायचा Pornography बिझनेस? कमवायचा बक्कळ पैसे
इमिंग सांगतात की, केवळ प्रणय किंवा बाळंतपण या हेतूनेच नाही, तर महिलांनाही केवळ आनंदासाठी सेक्स करायचा असतो आणि हे म्हटल्यावर पुरुषप्रधान समाजात हे अजूनही पचनी पडत नाही. परंतु, गेल्या दशकाच्या तुलनेत परिस्थिती बदलली आहे आणि आता मासिकांपेक्षा फोनमध्ये पॉर्न सामग्री अधिक सहज उपलब्ध आहे. परिणामी महिला दर्शकसंख्या हळूहळू वाढत आहे, ही वस्तुस्थिती आहे, परंतु, इमिंग (Eaming) यांच्या मते ही वाढ पाश्चात्य संस्कृतींमध्ये अधिक आहे.
हा हळूहळू विकासाचा परिणाम तर नाही?
उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ थॉमस जंकर यांच्या मते, महिलांची पॉर्न चित्रपट पाहण्याची कारणे पुरुषांपेक्षा वेगळी असतात. एकीकडे जिथे पुरुष महिलांचे सौदर्य, शारीरिक स्वरूप मुलं जन्माला घालण्यासाठी जास्त महत्त्व देतात, तर दुसरीकडे महिलांसाठी बोलणे आणि स्पर्श हे अधिक उत्तेजक पैलू आहेत. जोडीदार निवडण्यासाठी महिला जबाबदार, उपयुक्त आणि संवेदनशील व्यक्तीच्या शोधात अधिक असतात.
अशा युक्तिवादानंतर, जंकर म्हणतात की पॉर्न पाहण्याची इच्छा नैसर्गिक आहे की उत्क्रांतीचा परिणाम आहे हे कदाचित कधीच समजणार नाही. जंकर यांच्या मते, काही काळापासून महिलांमधील मिरर न्यूरॉन्स अधिक सक्रिय झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Porn sites, Porn star, Porn video, Women