मुंबई 21 जुलै: पॉर्नोग्राफी (Pornography) हा जगातील सर्वात मोठ्या व्यवसायांपैकी एक म्हणून ओळखला जातो. युरोप अमेरिकेतील काही देशांमध्ये हा व्यवसाय करणं अधिकृत आहे. मात्र भारतात पॉर्नोग्राफीला अद्याप मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे काही निर्माते अनधिकृतरीत्या अश्लील चित्रपटांची निर्मिती करतात. (Pornography in India) अशाच एका प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला अटक करण्यात आली आहे. गेली अनेक वर्ष तो हा व्यवसाय करतोय. या व्यवसायातून मिळाणाऱ्या नफ्याचा आकडा पाहून तुमचं डोकं देखील चक्रावून जाईल.
‘तर मी देखील तुरुंगात असते’; राज कुंद्रानं या अभिनेत्रीला दिली होती Pornographyची ऑफर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज लंडनमधील केनरिन नामक एका कंपनीसाठी या पॉर्नपटांची निर्मिती करतो. ही कंपनी भारतात हॉटशॉट नावाचं एक अॅप चालवते. या अॅपवर इतर OTT प्लॅटफॉर्मप्रमाणे महिन्याचं वगैरे सबस्क्रिप्शन मिळत नाही. तर प्रेक्षकांना प्रत्येक चित्रपट किंवा सीरिजसाठी वेगळे पैसे द्यावे लागतात. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार राजने या अॅपवरील अश्लील व्हिडीओंच्या माध्यमातून जवळपास 500 कोटी रुपयांचा नफा आतापर्यंत मिळवला आहे. इंटरनेटवर हजारो पॉर्न वेबसाईट कार्यरत आहेत. गुगलच्या एका सर्वेनुसार भारतातील इंटरनेट युजर सरासरी 8 मिनिटं 23 सेकंद अशा वेब साईटवर घालवतो. या पार्श्वभूमीवर हॉटशॉटने कमी वेळात मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईबर्स मिळवले होते. अन् त्यामधून नफा देखील कोट्यवधींचा मिळत होता.
मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा; राज कुंद्रा या कंपनीसाठी करत होता पॉर्नोग्राफी
हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?
फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Porn video, Raj kundra, Shilpa shetty