मराठी बातम्या /बातम्या /explainer /एकेकाळी मोबाईल म्हणजे Nokia होता, मग नेमकं अडलं कुठं? नोकिया पुन्हा भारतात उभा राहिल का?

एकेकाळी मोबाईल म्हणजे Nokia होता, मग नेमकं अडलं कुठं? नोकिया पुन्हा भारतात उभा राहिल का?

Nokia G21 Launched: नोकियाने आपल्या बजेट G-सिरीजचे दोन नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत. याद्वारे तो पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे. एकेकाळी भारतात दबदबा निर्माण करणारा नोकिया आता इतके मागे का गेला?

Nokia G21 Launched: नोकियाने आपल्या बजेट G-सिरीजचे दोन नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत. याद्वारे तो पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे. एकेकाळी भारतात दबदबा निर्माण करणारा नोकिया आता इतके मागे का गेला?

Nokia G21 Launched: नोकियाने आपल्या बजेट G-सिरीजचे दोन नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केले आहेत. याद्वारे तो पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे. एकेकाळी भारतात दबदबा निर्माण करणारा नोकिया आता इतके मागे का गेला?

पुढे वाचा ...

मुंबई, 27 एप्रिल : आजच्या युगात स्मार्टफोन मार्केट (Smartphone market) हे सर्वात फायदेशीर आहे. त्याचे कारण म्हणजे स्मार्टफोनची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. स्मार्टफोनच्या वाढत्या मागणीने आज शेकडो फोन कंपन्या बाजारात आणल्या आहेत. मात्र, आजपासून 15 वर्षांपूर्वी भारतासह जगातील अनेक देशांमध्ये नोकियाच्या फोनचा (Nokia Phone) बोलबाला होता. जवळपास प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक घरात आणि प्रत्येक हातात नोकियाचे फोन दिसत होते. नोकियाचे रिंगटोन सर्वत्र ऐकू येत होते. पण, अखेर असं काय झालं? पॉवरफुल आणि बजेट फोन असूनही मोबाईल मार्केटमधून फक्त नोकियाचे फोनच गायब झाले. चला जाणून घेऊया याची 5 मोठी कारणे.

नोकियाचे फोन बाजारातून गायब होणे हा कंपनीला सध्याचा बाजार समजला नसल्याचा पुरावा आहे. 2G नंतर, 3G आणि आता 4G ने ज्या प्रकारे बाजारात प्रवेश केला, नोकिया कंपनीला त्याचा फायदा उठवण्यात अपयश आले, तर सॅमसंग, एलजी आणि मायक्रोमॅक्स, इंटेक्स सारख्या देशांतर्गत कंपन्यांनी त्याचा जबरदस्त फायदा घेतला. आता तर चायनातील काही कंपन्यांनी बाजारावर ताबा मिळवला आहे.

स्मार्टफोन लाँचला विलंब

नोकिया फोन बाजारातून गायब होण्यामागचे एक कारण म्हणजे 3G नेटवर्क पाहता इतर कंपन्यांनी स्मार्टफोन सादर केले, पण नोकिया फीचर फोनमध्ये अडकून राहिला. नोकियाला 3G सह स्मार्टफोनची ताकद समजली नाही. आत्ताचं उदाहरण द्यायचं झालं तर देशात अद्याप 5G लाँच होणे बाकी आहे. तरीही मार्केटमध्ये 5G फोन आले आहेत. म्हणजेच ह्या कंपन्यांनी बाजाराचं भविष्य ओळखलं आहे. नोकिया यात मागे पडली.

सॅमसंगच्या स्मार्टफोनने नोकियाला मागे टाकले

सॅमसंगने 3G नेटवर्कचा फायदा घेत एकामागून एक अनेक स्मार्टफोन लॉन्च केले, तर नोकिया शांत राहिला. सॅमसंगसाठी, ही संधी नशीब बदलणारी ठरली आणि सॅमसंगच्या फोनने संपूर्ण बाजारपेठ व्यापली. यादरम्यान सॅमसंगने 3 हजारांपर्यंतचे अनेक फोन लॉन्च केले, जे लोकांना खूप आवडले. जिथे आधी नोकियाची रिंगटोन घरोघरी ऐकू यायची तिथे आता सॅमसंगची रिंगटोन वाजायला लागली.

सावधान! WhatsApp च्या माध्यमातून केली जातीये आर्थिक फसवणूक; पेमेंट करताना या गोष्टी लक्षात ठेवाच

चिनी कंपन्यांचं भारतात आगमन

चिनी मोबाईल कंपन्यांचे भारतात आगमन सॅमसंग आणि नोकिया या दोघांनाही महागात पडले, सॅमसंग बाजारात कायम राहिला तरी नोकिया गायब झाला. त्याच वेळी, नोकियाने मायक्रोसॉफ्ट लुमियासह बाजारात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, यश आले नाही. याचे मोठे कारण म्हणजे अँड्रॉइड प्लॅटफॉर्मचे आगमन. सर्व कंपन्यांनी अँड्रॉइड फोन सादर केले, तर नोकियाने विंडोज फोन लॉन्च केला, जो वापरकर्त्यांना आवडला नाही.

महागडे स्मार्टफोन

नोकियाने आपल्या विंडोज फोनसह बाजारात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, फोनच्या बजेटची काळजी घेतली नाही. मायक्रोमॅक्स, इंटेक्स, सॅमसंग आणि चिनी कंपन्यांनी 2 हजार ते 3 हजार रुपयांपर्यंतचे स्मार्टफोन बाजारात आणले, तर नोकियाचे विंडो फोन या श्रेणीत अजिबात नव्हते. काही फोन असले तरी त्यात फीचर्सची कमतरता होती.

पुन्हा पुनरागमनाची तयारी

नोकियाने (Nokia) भारतीय बाजारपेठेत जम बसवण्यासाठी यापूर्वी अनेकदा प्रयत्न केले आहेत. आता पुन्हा एकदा असचा प्रयत्न नोकिया करत आहे. नोकियाने आपल्या नवीनतम जी सीरीज अंतर्गत भारतीय ग्राहकांसाठी नोकिया जी21 (Nokia G21) हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये दोन वर्षे अँड्रॉइड ओएस आणि तीन वर्षांचे मासिक सुरक्षा अपडेट देण्याचे वचन दिले आहे. Nokia G21 ला एकाच चार्जवर तीन दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ देण्यासाठी देखील रेट केले जाते. नोकिया G21 ची भारतात किंमत रु.12,999 पासून सुरू होते.

First published:

Tags: Mobile, Smartphone