मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /सावधान! WhatsApp च्या माध्यमातून केली जातीये आर्थिक फसवणूक; पेमेंट करताना या गोष्टी लक्षात ठेवाच

सावधान! WhatsApp च्या माध्यमातून केली जातीये आर्थिक फसवणूक; पेमेंट करताना या गोष्टी लक्षात ठेवाच

आता व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp QR Code Fraud) माध्यमातून होणाऱ्या क्यूआर कोड घोटाळ्याची भर पडली आहे. अलीकडेच यातून काही जणांची फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे.

आता व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp QR Code Fraud) माध्यमातून होणाऱ्या क्यूआर कोड घोटाळ्याची भर पडली आहे. अलीकडेच यातून काही जणांची फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे.

आता व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp QR Code Fraud) माध्यमातून होणाऱ्या क्यूआर कोड घोटाळ्याची भर पडली आहे. अलीकडेच यातून काही जणांची फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे.

    नवी दिल्ली 26 एप्रिल : सोशल मीडिया (Social Media) आणि ऑनलाइन पेमेंट (Online Payment) या दोन गोष्टी सध्या आपल्या जीवनाचा जणू काही अविभाज्य भागच बनल्या आहेत. स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. तसंच, स्मार्टफोन वापरणाऱ्यांपैकी बहुतांश जण सोशल मीडिया आणि ऑनलाइन पेमेंट (Online Payment Fraud) या सुविधा वापरतात. कोरोना कालखंडात या सुविधांच्या वापराला आणखी चालना मिळाली; मात्र त्याचा गैरवापर करून फसवणूक करण्याचे प्रकारही वाढीला लागले आहेत. त्यामुळे ऑनलाइन पेमेंटच्या बाबतीत खूप सावधगिरी बाळगणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

    अक्षरशः दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणुकीच्या बातम्या आपल्याला ऐकायला/पाहायला मिळत असतात. त्यात आता व्हॉट्सअ‍ॅपच्या (WhatsApp QR Code Fraud) माध्यमातून होणाऱ्या क्यूआर कोड घोटाळ्याची भर पडली आहे. अलीकडेच यातून काही जणांची फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे. ही फसवणूक नेमकी कशी होते, याबद्दल आपण माहिती घेऊ या, जेणेकरून स्वतःची फसवणूक टाळता येऊ शकेल. याबद्दलची अधिक माहिती देणारं वृत्त 'टीव्ही नाइन हिंदी'ने दिलं आहे.

    ALERT! लाखो अँड्रॉइड स्मार्टफोन्स धोक्यात, हॅकर्सकडून मीडिया फाइल्सचा आधार

    व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून क्यूआर कोड पाठवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढीला लागले आहेत. यात होतं असं, की एखाद्या दुकानाच्या किंवा व्यवसायाच्या मालकाला काही ऑर्डर दिली जाते. त्यानंतर त्याला पैसे पाठवण्यासाठी एक क्यूआर कोड पाठवला जातो. तो क्यूआर कोड स्कॅन केल्यास पैसे खात्यात जमा होतील, असं संबंधित दुकानमालकाला सांगण्यात येतं. त्यानंतर ती व्यक्ती तो क्यूआर कोड स्कॅन (QR Code Scan) करते. त्यानंतर त्याला पैसे मिळण्याऐवजी त्याच्याच खात्यातून पैसे कापले जातात. थोडक्यात, त्या व्यक्तीकडून थेट खात्यात हात घालून चोरी केली जाते. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणुकीचा हा सर्वात नवा प्रकार आहे.

    आता अशा प्रकारच्या फसवणुकीपासून (QR Code Scam) वाचण्यासाठी काय करायचं, याची थोडी माहिती घेऊ या. यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही, की क्यूआर कोडच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार करणं अगदी सोपं झालं असलं, तरी त्यात सावधगिरी अत्यंत जरूरीची आहे. क्यूआर कोड स्कॅन करून एखाद्याला पैसे पाठवणं शक्य आहे; पण क्यूआर कोड स्कॅन करून पैसे स्वीकारणं (QR Code for sending Money) म्हणजेच रिसीव्ह करणं शक्य नाही, ही तांत्रिक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि कायम लक्षात ठेवली पाहिजे.

    विना चार्जर iPhone विक्री करणं पडलं महागात, ग्राहकाला द्यावे लागणार 82 हजार रुपये; काय आहे प्रकरण

    म्हणजेच समजा एखादी व्यक्ती तुम्हाला काही पैसे देणं लागते आणि ते पैसे तुम्हाला देण्यासाठी त्या व्यक्तीने तुम्हालाच क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी दिला, तर ती फसवणूक आहे, हे लक्षात घ्यावं. त्या व्यक्तीला पैसे खरंच पाठवायचे असतील, तर त्या व्यक्तीने तुमचा क्यूआर कोड स्कॅन करणं गरजेचं आहे. तरच त्याच्या खात्यातून पैसे तुम्हाला येतील. याउलट, त्या व्यक्तीने तुम्हालाच क्यूआर कोड स्कॅन करायला दिला, तर पैसे तुमच्याच खात्यातून कापले जाऊन त्या व्यक्तीच्या खात्यात जाणार, हे लक्षात घ्यावं. ही मूलभूत गोष्ट लक्षात घेतली, तर फसवणूक होण्याची शक्यताच नाही.

    आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाइन पेमेंट करताना किंवा क्यूआर कोड स्कॅन केल्यास ते पैसे नेमके कोणाला जात आहेत, याचीही खात्री करणं गरजेचं आहे. अज्ञात व्यक्तीकडून आलेला क्यूआर कोड स्कॅन करू नये. पुरेशी खात्री पटल्यानंतरच ऑनलाइन व्यवहार करावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

    First published:
    top videos

      Tags: Financial fraud, Money fraud, Online payments, Whatsapp, Whatsapp pay