नवी दिल्ली, 21 जानेवारी : देशात कोरोनाचे (coronavirus) रुग्ण वेगानं वाढत आहेत. कुटुंबातला एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आला, तर इतर सदस्यांनाही कोरोनाची लक्षणं (corona symptoms) दिसून येतात. परंतु ते जेव्हा चाचणी (corona test) करण्यासाठी जातात तेव्हा त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह येतो (Why corona test negative despite covid symptoms). तुमच्याबाबतीतही असं झालं आहे का? यामागील नेमकं काय कारण आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल (Why corona test negative despite contacted with corona patient).
कोरोना रुग्णाच्या संपर्कात राहून, कोरोनाची लक्षणं दिसूनही कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह येण्यामागे बरीच कारणं असू शकता. या कारणांबाबत डॉक्टरांनी सविस्तर माहिती दिली आहे.
नमुने गोळा करण्यात चूक
आज तकच्या रिपोर्टनुसार इंडियन स्पायनल इन्ज्युरीज सेंटरचे डॉ. विजय दत्ता सांगतात, कुटुंबातले काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) आढळतात, परंतु काही सदस्यांना लक्षणं असतानाही त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह (corona negative) येत आहेत. यामागे नमुने गोळा करण्यात काही चुका होऊ शकतात हे एक कारण असू शकतं. योग्य प्रक्रियेद्वारे नमुने गोळा केले आणि 2-5 सेल्सिअस तापमानात नमुने घेतले गेले तर ते रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ शकतात.
हे वाचा - कोरोनाचा असाही भयंकर फटका! 2022 मध्ये इतके कोटी लोकं राहणार बेरोजगार
जेनेस्ट्रिंग डायग्नोसिसच्या मायक्रोबायोलॉजिस्टच्या डॉ. अल्पना राजदान यांच्या माहितीनुसार, जर स्वॅब व्यवस्थित घेतले गेले नाही किंवा स्वॅब टेस्टदरम्यान घेण्यात आलेले नमुन्यात पुरेशा प्रमाणात व्हायरसचे पार्टिकल आले नाहीत, तर टेस्ट निगेटिव्ह येते.
कोरोना टेस्ट कधी करावी
कोरोनाच्या प्रकरणांमध्ये इन्क्यूबेशन खूप महत्त्वाचे आहे. व्हायरचे इन्क्यूबेशन होणं म्हणजे, जेव्हा शरीरात व्हायरस गेल्यावर तो विकसित होण्यासाठी काही दिवस घेतो. डॉ. विजय दत्ता सांगतात, की व्हायरसचे शरीरात इन्क्यूबेशन होत असताना किंवा तो शरीरात विकसित झालेला नसताना आरटीपीसीआर टेस्ट केली, तर रिपोर्ट निगेटिव्ह येऊ शकतो. काही तज्ज्ञ सांगतात की इन्क्यूबेशनला जास्त काळही लागू शकतो. डॉ. राजदान यांच्या माहितीनुसार इन्क्यूबेशनचा काळ 4 -6 दिवस असा आहे. यादरम्यान व्हायरस शरीरात विकसित होत असतो.
पीसीआर टेक्निक संवेदनशील असतानाही व्हायरसचे निश्चित काळ झालेले पार्टिकल नमुन्यात येणं आवश्यक आहे. लक्षणं दिसल्यानंतरचे सहा दिवस टेस्टसाठी महत्त्वाचे असतात. याच्या आधीसुद्धा काही लोकं पॉझिटिव्ह येऊ शकतात.
एक ते दहा दिवसांत दुसऱ्यांना होऊ शकते लागण
डॉ. राजीव यांच्या माहितीनुसार, ओमायक्रॉनची लागण झालेल्या मोठ्या प्रमाणातल्या लोकांना लक्षणं दिसत नाहीत. ILBS सीरिजच्या कोरोना रुग्णांपैकी 54-72 टक्के रुग्णांमध्ये लक्षणं दिसून येत नाहीत. अशा प्रकरणात रुग्णांचा पहिला दिवस कोणता असतो हे लक्षात येत नाही. अशात इन्फोक्टिव्ह फेज निघून गेल्यानंतर कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येऊ शकतो. लोकं बाधित होण्याच्या पहिल्या दिवसापासून ते दहा दिवसांपर्यंत व्हायरस पोहोचू शकतो. कोरोनाची प्रमुख लक्षणं येण्याच्या 24 तासांपूर्वी टेस्ट करण्याचा योग्य वेळ आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Coronavirus symptoms