मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

कोरोनाचा असाही भयंकर फटका! 2022 मध्ये इतके कोटी लोकं राहणार बेरोजगार

कोरोनाचा असाही भयंकर फटका! 2022 मध्ये इतके कोटी लोकं राहणार बेरोजगार

आगामी काळातही बेरोजगारीचं सावट कायम राहणार असून, 2022 मध्ये जगातल्या बेरोजगारांची संख्या 20.7 कोटी असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेनं (International Labour Organization-आयएलओ -ILO) नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात वर्तवला आहे.

पुढे वाचा ...

जीनिव्हा, 21 जानेवारी: गेल्या दोन वर्षांपासून सगळं जग कोरोना विषाणूच्या (Coronavirus Pandemic) महाभयंकर साथीचा सामना करत आहे. लसीकरणामुळे (Vaccination Drive) दिलासा मिळाला असला तरी अद्यापही धोका कायम आहे. अर्थात आता सुरुवातीच्या काळातल्या लॉकडाउनसारखे कठोर उपाय योजले जाण्याची शक्यता कमी आहे; मात्र काही निर्बंध पाळणं अनिवार्य आहे. या सगळ्याचा सर्वाधिक फटका बसत आहे तो रोजगार निर्मितीला (Coronavirus affect on Employment). कोरोना साथीच्या सुरुवातीच्या काळात अनेक उद्योगधंदे बंद पडल्यानं जगभरात लाखो, कोट्यवधी नागरिकांचे रोजगार गेल्याचं दिसून आलं. आता परिस्थिती काहीशी सावरली असली, तरी फार दिलासादायक नाही. आगामी काळातही बेरोजगारीचं सावट कायम राहणार असून, 2022 मध्ये जगातल्या बेरोजगारांची संख्या 20.7 कोटी असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेनं (International Labour Organization-आयएलओ -ILO) नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात वर्तवला आहे.

जागतिक स्तरावर बेरोजगारांची संख्या 2023 पर्यंत कोविडपूर्व काळातल्या (Pre Covid Time) बेरोजगारांच्या संख्येपेक्षा (Unemployment) जास्तच राहील, असं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 2022 मध्ये जगभरात बेरोजगारांची संख्या 20.7 कोटी असेल. 2019 च्या तुलनेत ही संख्या 2 कोटींहून अधिक आहे. जीनिव्हातल्या युनायटेड नेशन्सच्या या एजन्सीने 2022 मध्ये रोजगार निर्मिती क्षेत्रातील विकास दर कमी असेल, असं म्हटलं आहे.

हे वाचा-Zomato शेअरमध्ये पाच दिवसात 12 टक्क्यांची घसरण, गुंतवणूकदारांनी काय करावं?

एका आठवड्यात 48 तासांच्या कामावर आधारित रोजगारांची संख्या मोजली जाते. त्यानुसार 2019 च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत जागतिक स्तरावर कामाच्या तासांमध्ये झालेली घट 5.2 कोटी पूर्ण रोजगारांएवढी असेल. मे 2021 मध्ये ही घट 2.6 कोटी पूर्ण रोजगार एवढी असण्याचा अंदाज होता. या वर्षी कामकाजाच्या तासांमध्ये दोन टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे.

आयएलओच्या 'ग्लोबल एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलूक ट्रेंड्स रिपोर्ट - 2022'नुसार, जागतिक पातळीवर रोजगार निर्मितीत साथीचा प्रभाव कायम आहे. त्यामुळे या वर्षीही कोट्यवधी नागरिक बेरोजगारीच्या छायेखाली असणार आहेत. 2023पर्यंत जागतिक बेरोजगारीचा आकडा कोरोना साथीच्या पहिल्या लाटेतल्या काळापेक्षा अधिक असणार आहे.

हे वाचा-याठिकाणी आहे Twindemic ची स्थिती, कोरोनासह या पँडेमिकशी द्यावा लागतोय लढा!

कोरोनाच्या दोन वर्षांच्या संकटानंतर आताही परिस्थिती बिकटच आहे. आजही अनेक जणांना आपली नोकरी अनिश्चित असल्याची टांगती तलवार डोक्यावर घेऊन जगावं लागत आहे. त्यामुळे अनेकांना नव्या कामाकडे वळावं लागत आहे. नव्या क्षेत्रात काम करताना त्याचा परिणाम उत्पादनावर आणि आर्थिक घडामोडींवर होत आहे. आफ्रिका, अमेरिका, आशिया पॅसिफिक, युरोप आणि मध्य आशियामध्ये नोकरीच्या संधीची शक्यता खूप कमी आहे. युरोपीय देशांत ही परिस्थिती अधिक गंभीर आहे, असंही या अहवालात म्हटलं आहे.

First published:

Tags: Corona, Unemployment