मुंबई, 30 जुलै : आकाशात उडणारी विमानं (Airplane) तर आपण सगळ्यांनीच पाहिली असतील. अनेकजणांनी विमानप्रवासही केला असेल. काहीवेळेस आपल्या मित्रांना, नातेवाईकांना सोडायला आपण एअपोर्टवरही जातो. पण बहुतेक विमानांचा रंग पांढराच (Why Airplanes are white?) असतो, हे तुमच्या कधी लक्षात आलं आहे का? पांढऱ्याशिवाय अन्य रंगाची विमानं संख्येनं अगदीच थोडी असतील. या मागचं कारण आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 'झी न्यूज' नं याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
एअरलाईन्स कंपनीचं एअरक्राफ्टचं ब्रँडिंग (Aircraft Branding) आणि टॅगलाईन (Tagline) भलेही वेगवेगळ्या रंगात असेल पण प्रत्येक एअरलाईन्स कंपनीच्या विमानाचा बेसिक रंग मात्र पांढराच असतो.
विमानाचा रंग पांढराच ठेवण्याची कारणं
1. पांढरा रंग सूर्यप्रकाशाला रिफ्लेक्ट (White Colour Reflects Sunrays) म्हणजेच परावर्तित करतो हे विमानाचा रंग पांढरा ठेवण्यामागचं सगळ्यांत महत्त्वाचं कारण आहे. यामुळे सूर्याची किरणं विमानावर पडल्यानंतर बाउन्स होतात. त्यामुळे निळ्या किंवा रात्रीच्या चमचमणाऱ्या आकाशातही विमानं अगदी स्पष्ट दिसू शकतात. त्याशिवाय सूर्यप्रकाश परावर्तित झाल्यामुळे विमानाचा पृष्ठभाग गरम होत नाही. त्यामुळे विमानाच्या आत बसलेल्या प्रवाशांनाही गरम होत नाही, उकाडा जाणवत नाही. पांढऱ्या रंगाशिवाय अन्य रंग सूर्यप्रकाशाला शोषून घेतात. त्यामुळे विमानातील प्रवाशांना अस्वस्थ वाटू शकतं. म्हणूनच विमानाचा रंग पांढरा ठेवला जातो.
2. विमान टेक ऑफ (Take off) घेताना किंवा लँडिंगच्या (Landing) वेळेस पक्षी धडकण्याची शक्यता असते. त्यामुळे अपघातही होऊ शकतात. असे अपघात रोखण्यासाठी एअरलाईन कंपन्या विमानाचा रंग पांढराच ठेवतात. विमानाचा रंग पांढरा असल्याने त्याची Visibility म्हणजेच दृश्यमानता जास्त चांगली असते. त्यामुळे पक्ष्यांना अगदी लांबूनही विमानं दिसू शकतात. त्यामुळे मोठे अपघात होणं टाळलं जाऊ शकतं.
3. विमान आकाशात उंच उडतं. त्यामुळे त्याला अनेक प्रकारच्या वातावरणीय परिस्थितीला सामोरं जावं लागतं. अशा वेगवेगळ्या स्थितींतून गेल्यावरही त्याचा रंग बदलू नये म्हणूनच तो पांढरा ठेवला जातो. धूळ, पाऊस किंवा कडक ऊन या सगळ्याचा विमानावर परिणाम होऊ शकतो. पण पांढरा रंग असल्याने विमानाचं सौंदर्यही खराब होत नाही आणि त्याचा डौल कायम राहतो.
4.. पांढऱ्या रंगावर एखादा ओरखडा, स्क्रॅच (Scratch), डॅमेज (Damage) झाल्यास लगेचच दिसून येतं. त्यामुळेच विमानालाही असे काही डॅमेज वगैरे झालं तर ते लगेचच समजून येतं. विमानातील प्रवाशांसाठी ही अर्थातच अत्यंत चांगली गोष्ट आहे.
एकूणात काय तर प्रवासी आणि विमान या दोन्हींच्या हितासाठी विमानांना पांढरा रंग दिला जातो. पुढच्यावेळी जेव्हा तुम्ही विमानात बसाल तेव्हा तुम्हाला या बातमीची आठवण नक्की होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.