मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पत्नीच्या नावे उघडा 'हे' अकाउंट, दर महिन्याला मिळतील 45 हजार रुपये, वाचा काय आहे योजना

पत्नीच्या नावे उघडा 'हे' अकाउंट, दर महिन्याला मिळतील 45 हजार रुपये, वाचा काय आहे योजना

Money

Money

तुमच्यानंतरही तुमच्या पत्नीला स्वावलंबी जगता येईल आणि दर महिन्याला नियमित उत्पन्न (Regular Income) मिळू शकेल. वाचा सविस्तर

नवी दिल्ली, 30 जुलै : आपल्या घरातील मुलं किंवा पत्नीचं भविष्य सुरक्षित राहावं, त्यांना भविष्यात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, असं वाटत असेल तर तुम्ही एनपीएसमध्ये पत्नीच्या नावाने गुंतवणूक करू शकता. ज्यामुळे तुमच्यानंतरही तुमच्या पत्नीला स्वावलंबी जगता येईल आणि दर महिन्याला नियमित उत्पन्न (Regular Income) मिळू शकेल. तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर न्यू पेन्शन सिस्टम (NPS) अकाउंट उघडू शकता. NPS अकाउंट तुमच्या पत्नीच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर एकरकमी रक्कम देईल. यासोबतच त्यांना प्रत्येक महिन्याला पेन्शनच्या स्वरूपात नियमित रक्कमही मिळेल. तसंच तुम्ही NPS अकाउंटद्वारे तुमच्या पत्नीला दरमहा किती पेन्शन मिळावी हेदेखील तुम्ही गुंतवणूक करताना ठरवू शकता. यामुळे योजनेत गुंतवणूक केल्यास वयाच्या साठीनंतर तुमची पत्नी पैशांसाठी कोणावरही अवलंबून राहणार नाही. याबद्दल झी न्यूज हिंदीने वृत्त दिलंय. तुम्ही तुमच्या सोयीनुसार दर महिन्याला किंवा वर्षाला न्यू पेन्शन सिस्टम (NPS) अकाउंटमध्ये पैसे जमा करू शकता. तुम्ही फक्त 1,000 रुपयांमध्ये तुमच्या पत्नीच्या नावावर NPS खातं उघडू शकता. NPS खातं वयाच्या 60व्या वर्षी मॅच्युअर होतं. या योजनेतील नवीन नियमांनुसार, तुम्ही पत्नीच्या वयाची 65 वर्षे होईपर्यंत NPS अकाउंट सुरू ठेवू शकता. हेही वाचा -  IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर होईल मोठं नुकसान महिन्याला 45 हजार रुपये उत्पन्न जर तुमची पत्नी 30 वर्षांची असेल आणि तुम्ही तिच्या NPS खात्यात दरमहा 5000 रुपये गुंतवत असाल आणि त्या गुंतवणुकीवर दरवर्षी 10 टक्के रिटर्न मिळत असेल, तर वयाच्या 60 व्या वर्षी तिच्या खात्यात एकूण 1.12 कोटी रुपये असतील. यातील 45 लाख रुपये तिला परत मिळतील. याशिवाय तिला आयुष्यभर दरमहा सुमारे 45 हजार रुपये पेन्शन मिळत राहील. किती पेन्शन मिळणार? वय - 30 वर्षे एकूण गुंतवणुकीचा कालावधी- 30 वर्षे मंथली काँट्रीब्युशन – 5,000 रुपये गुंतवणुकीवर अंदाजे रिटर्न - 10% एकूण पेन्शन फंड - 1,11,98,471 (मॅच्युरिटीनंतर काढता येणारी रक्कम) अॅन्युइटी प्लॅन खरेदी करण्याची रक्कम - 44,79,388 रुपये अंदाजे अॅन्युइटी रेट 8% - 67,19,083 रुपये मासिक पेन्शन - 44,793 रुपये फंड मॅनेजर करतात अकाउंट मॅनेजमेंट NPS ही केंद्र सरकारची सामाजिक सुरक्षा योजना (Social Security Scheme) आहे. यामध्ये तुम्ही गुंतवलेली रक्कम प्रोफेशन फंड मॅनेजर (Professional Fund Manager) मॅनेज करतात. केंद्र सरकार या प्रोफेशनल फंड मॅनेजर्सना ही जबाबदारी देते. त्यामुळे तुमची एनपीएसमधील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते. परंतु योजनेअंतर्गत तुम्ही गुंतवलेल्या पैशावर रिटर्न मिळण्याची खात्री नसते. मात्र फायनॅन्शिअल प्लॅनर्सच्या मते, NPS ने सुरुवातीपासून सरासरी 10 ते 11 टक्के वार्षिक रिटर्न दिला आहे.
First published:

Tags: Investment, Money, Saving bank account, Tax

पुढील बातम्या