Home /News /explainer /

योग दिन नव्हे, हे आहे 21 जूनचं खास वैशिष्ट; या कारणामुळे असतो वर्षातला सर्वात वेगळा दिवस

योग दिन नव्हे, हे आहे 21 जूनचं खास वैशिष्ट; या कारणामुळे असतो वर्षातला सर्वात वेगळा दिवस

दिल्लीत 21 जून 2021 हा दिवस तब्बल 14 तासांचा असेल. नेमकं सांगायचं झालं, तर आजचा दिवस दिल्लीत (Delhi) 13 तास 58 मिनिटं आणि एक सेकंद एवढ्या कालावधीचा असेल.

    मुंबई 21 जून: 21 जून (Summer solstice) हा वर्षातला सर्वांत मोठा दिवस असतो. दिल्ली किंवा उत्तर भारतात आजचा दिवस किती तासांचा असतो, माहिती आहे का? सर्वसाधारणपणे जेव्हा दिवस आणि रात्र सारख्या कालावधीचे असतात, तेव्हा प्रत्येकी 12-12 तासांचे असतात. 21 डिसेंबरनंतर (Winter Solstice) रात्र छोटी होऊ लागते आणि दिवसांचा कालावधी वाढू लागतो. 21 जूनचा दिवस सर्वांत मोठा असतो. त्यानंतर दिवसाचा कालावधी घटायला सुरुवात होते. दिल्लीत 21 जून 2021 हा दिवस तब्बल 14 तासांचा असेल. नेमकं सांगायचं झालं, तर आजचा दिवस दिल्लीत (Delhi) 13 तास 58 मिनिटं आणि एक सेकंद एवढ्या कालावधीचा असेल. 21 जून 2021 रोजी दिल्ली आणि उत्तर भारतात सूर्योदय पहाटे पाच वाजून 23 मिनिटांनी झाला आहे. सूर्यास्त सायंकाळी सात वाजून 21 मिनिटांनी होणार आहे. संसर्ग झाला तरी प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी?; तज्ज्ञ काय म्हणतायेत पाहा 21 जूनचा दिवस खासकरून ते देश किंवा देशाच्या त्या भागांत सर्वांत मोठा असतो, जे भाग विषुववृत्ताच्या (Equator) उत्तरेकडच्या भागांत असतात. त्यात रशिया, उत्तर अमेरिका, आशिया, युरोप आणि अर्धा आफ्रिका यांचा समावेश आहे. तांत्रिकदृष्ट्या विचार केला, तर जेव्हा सूर्याची किरणं थेट कर्कवृत्तावर (Tropic of Cancer) पडतात, तेव्हा असं होतं. या दिवशी सूर्याला (Sun) पृथ्वीच्या या भागांना मिळणारी ऊर्जा 30 टक्के जास्त असते. विवाह नोंदणी करणं का आहे आवश्यक? Marriage Certificate बद्दल जाणून घ्या सर्व माहिती ... पृथ्वी स्वतःभोवतीची एक फेरी अर्थात परिवलन 24 तासांत पूर्ण करते. त्यामुळे दिवस (Day) आणि रात्र (Night) या घटना घडतात. सूर्याभोवती एक फेरी म्हणजेच परिभ्रमणासाठी पृथ्वीला 365 दिवस लागतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना ज्या भागावर सूर्यप्रकाश पडत असतो, त्या भागात तुम्ही असाल, तर तुम्हाला दिवस दिसतो. तुम्ही असलेल्या भागात सूर्यप्रकाश नसेल, तर तुम्हाला रात्र दिसते. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना मार्च ते सप्टेंबरदरम्यान पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात (Northern Hemisphere) सूर्याची किरणं सरळ येतात. तेव्हा त्या गोलार्धात दिवस जास्त कालावधीचे असतात. अन्य वेळी पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात (Southern Hemisphere) सूर्याची किरणं सरळ पडतात. उन्हाळा, थंडी हे सारे ऋतू पृथ्वीच्या परिभ्रमणामुळेच घडून येतात. उत्तर गोलार्धात 20,21,22 जून रोजी सूर्याची सर्वांत जास्त किरणं पडतात. म्हणजेच या कालावधीत आपण सूर्याच्या जास्त जवळ असतो. पाश्चिमात्य देशांत अनेक ठिकाणी या कालावधीला ग्रीष्णकालीन संक्रांत असंही म्हणतात. दक्षिण गोलार्धात हे दिवस 21,22,23 डिसेंबर या  दिवशी येतात. समुद्र आणि चंद्र यांचा जेव्हा पृथ्वीशी संबंध आला, तेव्हापासून पृथ्वीचा आपल्या आसाभोवती फिरण्याचा वेग कमी होत गेला. त्याला टायडल फ्रिक्शन असं म्हणतात. पृथ्वीच्या स्वतःभोवतीच्या फेरीवेळी यामुळे अनेक अडथळे येतात. त्यामुळे पृथ्वीची ऊर्जा फेरी मारण्यात खर्च न होता उष्णतेत परिवर्तित होते. पृथ्वी आणि महासागरात घडणाऱ्या घटनांमुळे पृथ्वीच्या परिवलनाचा वेग कमी होतो. त्यामुळे दिवसांचा कालावधी वाढत जातो. प्रत्येक शतकात दिवसाची लांबी 3 मिलिसेकंदांनी वाढत जाते. हे प्रमाण कमी वाटत असलं, तरी एक कोटी वर्षांनी पृथ्वीवरचा दिवस एका तासाने वाढेल. म्हणजेच दिवस 24 तासांचा नव्हे, तर 25 तासांचा असेल. 400 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी स्वतःभोवती एक फेरी सहा तासांत पूर्ण करत होती. म्हणजे दिवस 6 तासांचा होता. 35 कोटी वर्षांपूर्वी दिवस 23 तासांचा झाला. सध्या तो 24 तासांचा आहे. हिमनद्यांमधला (Glacier) बर्फ वितळण्यासारख्या घटनांमुळे पृथ्वीची परिवलनाची गती वाढते. 12 हजार वर्षांपूर्वी हिमनद्यांचा बर्फ वितळण्याची प्रक्रिया सुरू झाली. आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे त्यात वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसाची लांबी काही मिलिसेकंदांनी कमी होत आहे. भूकंप, हवामानात बदल, महासागराचा प्रवाह आदींमुळेही पृथ्वीचा परिवलनाचा वेग कमी किंवा जास्त होत असतो. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन शास्त्रज्ञांनी असं अनुमान काढलं आहे, की पृथ्वीवरचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा दिवस 1912 साली येऊन गेला. त्या वर्षी उन्हाळ्यात उत्तर गोलार्धात सूर्यप्रकाश सर्वांत जास्त काळ राहिला होता. तसंच, त्या वर्षी थंडीत सर्वांत जास्त कालावधीची रात्र झाली होती. येणाऱ्या काळात अनेक मोठे दिवस पाहायला मिळण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.
    Published by:Mandar Gurav
    First published:

    Tags: Environment, Sunset 2015

    पुढील बातम्या