Home /News /explainer /

संसर्ग झाला तरी प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी?; तज्ज्ञ काय म्हणतायेत पाहा

संसर्ग झाला तरी प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी?; तज्ज्ञ काय म्हणतायेत पाहा

मुलांशी संबंधित कोविड-19 बाबत अनेक शंका आणि प्रश्नांबाबत तज्ज्ञांनी दिलेली उत्तरं

नवी दिल्ली, 19 जून : कोरोनाच्या (Coronavirus) पहिल्या लाटेत वयोवृद्ध नागरिकांना संसर्ग होण्याचं प्रमाण अधिक दिसलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांना संसर्ग होण्याचं प्रमाण अधिक होतं. मात्र आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असून या लाटेत 18 वर्षाखालील तरुणांना अधिक प्रमाणात संसर्ग होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तरुणांमध्ये कोरोनाचा संसर्ग लवकर का झाला? आताही तो त्यांच्यामध्येच का पसरत आहे? लहान मुलांना (Coronavirus in children) कोरोनाचा संसर्ग कमी प्रमाण होतो का? लहान मुलांमध्ये गंभीर कोरोना होण्याची शक्यता कमी आहे का? यामागील सत्य आणि कारणं काय आहेत? मुलांशी संबंधित कोविड-19 बाबत अशा अनेक शंका आणि प्रश्नांशी निगडीत गृहितकं आणि सिद्धांत मांडण्यात आले आहेत. काय आहेत या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. 1) नवा कोरोनाव्हायरस (Novel Corona Virus) हा ACE2 या रेस्पिटरमध्ये एकत्रित होत नासोफरिनक्स (nasopharynx), फुफ्फुसं, आतडे, हृदय, आणि मूत्रपिंडातील पेशींमध्ये प्रवेश करतो. नासोफरिनक्स आणि फुफ्फुसांच्या एपिथेलियममध्ये ACE2चा प्रसार हा वयानुसार वाढतो. शिवाय या कोरोनाव्हायरसमध्ये ACE2 रेस्पिटरची (Receptor) रासायनिक क्रिया हीदेखील वयापरत्वे वाढते. त्यामुळे कमी वयोगटातील लोकसंख्येस संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. प्राण्यांवर केलेल्या अभ्यासानुसार असे दिसून येते की ACE2 रेस्पिटर हे नोव्हेल कोरोनाव्हायरसमुळे फुफ्फुसाला होणाऱ्या दुखापतीपासून संरक्षण करतात. जेव्हा या कोरोनाव्हायरसचं प्रमाण वाढतं आणि विषाणू ACE2 रेस्पिटरच्या माध्यमातून पेशींमध्ये प्रवेश करतात, तेव्हा ACE2 रेस्पिटरची संसर्गाचा सामना करण्याची क्षमता कमी होते आणि संरक्षणात्मक परिणाम कमी दिसून आजार गंभीर रुप धारण करतो. हे वाचा - कोरोना आणि फंगसमधून बरं झाल्यानंतर किती दिवसांनी पूर्णपणे ठणठणीत होतो रुग्ण? 2) मुलांमधील (Children) एंडोथिलियम (रक्त वाहिन्यांचा आतील स्तर) आणि कोग्युलेशन यंत्रणा प्रौढांपेक्षा (Young) वेगळी असते. त्यामुळे मुलांमध्ये हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक यासारख्या थ्रोम्बॉटिक गुंतागुंत होण्याची शक्यता कमी असते. 3) अनेकांमध्ये बालपणीच कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अँटीबॉडीज (Antibodies) तयार झाल्याचे पाहायला मिळते. अशी पूर्वीच तयार झालेल्या अँटीबॉडीज कोरोनाव्हायरसचा पेशींमधील प्रवेश सुलभ करतात. त्यामुळे प्रौढांमध्ये संसर्गाची तीव्रता वाढते. यालाच अँटीबॉडी आधारित वाढ (ADE) म्हणतात. कोरोनाबाधित मुलांमध्ये प्रौढांच्या तुलनेत एडीईचे प्रमाण कमी असते. 4) वृद्धत्व हे इम्योनोसेनेन्सशी संबंधित आहे. जन्मजात आणि जुळवून घेणारी प्रतिकारशक्ती हळूहळू कमी होणं हे व्हायरस क्लिअरन्समध्ये (Virus Clearance) योगदान देतं. शिवाय मुलांमध्ये जन्मजात आणि जुळवून घेणारी प्रतिकारशक्ती असल्याने त्यांच्यामध्ये संसर्गाची शक्यता कमी असते. 5) सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांमध्ये मधुमेह, हायपरटेन्शन, ह्दयरोग आणि सीओपीडी यांसारख्या कोमॉर्बिडीटीचे (Co-morbidity) प्रमाण कमी असते. परंतु हेच प्रमाण प्रौढांमध्ये अधिक असतं, त्यामुळे संसर्ग गंभीर रुप धारण करतो. हे वाचा - मुंबईला दिलासा! पॉझिटिव्ही रेट घसरला; काय असतो हा Rate, कशी काढतात Positivity? 6) अँटिइन्फ्लेमॅटरी आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असलेल्या व्हिटॅमिन डीची (Vitamin D) कमतरता मुलांच्या तुलनेत प्रौढांमध्ये अधिक असतं. 7) प्रौढांच्या तुलनेत मुलांच्या श्वसनमार्ग आणि पचनसंस्थेत सूक्ष्मजीवांचं (बॅक्टेरिया, विषाणू) अस्तित्व अधिक असतं. त्यामुळे पेशींवर आक्रमण करणाऱ्या कोरोनाव्हायरसला स्पर्धा निर्माण होते. 8) अँटिइंफ्लेमेटरी आणि अँटिऑक्सिडेटिव्ह हे गुणधर्म असलेला हार्मोन मेलाटोनिन हे लहान मुलांमध्ये उच्च पातळीवर असते. वय कमी झाल्यास या वयोगटातील सौम्य लक्षणांसाठी हातभार लावू शकते. 9) प्रौढ व्यक्तींच्या तुलनेत लहान मुलांना काही काळापूर्वीच बीसीजी किंवा अन्य लसी दिलेल्या असतात. त्यामुळे आजाराची तीव्रता सौम्य राहू शकते. 10) प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांचा वावर गर्दीच्या ठिकाणी कमी असतो तसेच शॉपिंग, प्रवास आदी ठिकाणी ही लहान मुलं फारसं जात नाहीत. त्यामुळे कोरोनाव्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. (सर्वात स्वीकार्ह कारण) कोरोनाव्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून लहान मुलांची कशी काळजी घ्यावी? आपण स्वतःची जशी काळजी घेतो अगदी तशीच काळजी लहान मुलांची देखील घ्यावी. सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing), नाक आणि तोंड पूर्णतः झाकून घेण्यासाठी स्वच्छ मास्कचा (Mask) वापर, हात स्वच्छ धुणं, लसीकरण आणि अति गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं या उपाययोजना मुलांच्या बाबतही महत्त्वाच्या आहेत. जर किशोरवयीन आणि तरुणांचे लसीकरण कमी प्रमाणात झालं तर लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे 2 वर्षे किंवा त्यावरील वयोगटातील मुलांचे लसीकरण (Vaccination) व्हावं, असं वाटतं.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Corona, Coronavirus, Covid-19

पुढील बातम्या