मराठी बातम्या /बातम्या /explainer /

व्हिक्टर यानुकोविच कोण आहे? युद्धानंतर व्लादिमीर पुतिन त्यांना बसवणार युक्रेनच्या अध्यक्षपदी?

व्हिक्टर यानुकोविच कोण आहे? युद्धानंतर व्लादिमीर पुतिन त्यांना बसवणार युक्रेनच्या अध्यक्षपदी?

Russia-Ukraine Crisis: पाश्चात्य देशांचा असा विश्वास आहे की व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनचे निवडून आलेले सरकार उलथून टाकायचे आहे आणि झेलेन्स्की यांच्या जागी व्हिक्टर यानुकोविचच्या नेतृत्वाखाली युक्रेनमध्ये कठपुतळी सरकार आणायचे आहे.

Russia-Ukraine Crisis: पाश्चात्य देशांचा असा विश्वास आहे की व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनचे निवडून आलेले सरकार उलथून टाकायचे आहे आणि झेलेन्स्की यांच्या जागी व्हिक्टर यानुकोविचच्या नेतृत्वाखाली युक्रेनमध्ये कठपुतळी सरकार आणायचे आहे.

Russia-Ukraine Crisis: पाश्चात्य देशांचा असा विश्वास आहे की व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनचे निवडून आलेले सरकार उलथून टाकायचे आहे आणि झेलेन्स्की यांच्या जागी व्हिक्टर यानुकोविचच्या नेतृत्वाखाली युक्रेनमध्ये कठपुतळी सरकार आणायचे आहे.

पुढे वाचा ...
    कीव, 2 मार्च : रशियाने (Russia) युक्रेनवर (Ukraine) हल्ला केल्यानंतर एकएक शहर ताब्यात घेत आहे. बलाढ्या रशियासमोर युक्रेनची ताकद कमी पडत आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्सकी यांनी जगभरातील देशांकडे मदत मागितली. मात्र, अद्यापतरी त्यांना कोणाकडूनही मदत मिळालेली नाही. अशा परिस्थितीत रशियामध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 2014 मध्ये रशियाला पळून गेलेले युक्रेनचे माजी राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच (Viktor Yanukovych) यांना क्रेमलिन (रशियन सरकार) एका खास प्रसंगासाठी तयार करत आहे. कीव इंडिपेंडंटने (The Kyiv Independent) युक्रेयिन्स्का प्रवदा (Ukrayinska Pravda) या ऑनलाइन वृत्तपत्राच्या वृत्ताचा हवाला देत हे ट्विट केले आहे. पुतिन यांना यानुकोविचला युक्रेनचे राष्ट्राध्यक्षपदी बसवायचंय? या अहवालात गुप्तचर संस्थांचा हवाला देत असे लिहिले आहे की, "एका परिस्थितीनुसार, रशिया त्यांना (व्हिक्टर यानुकोविच) "युक्रेनचे अध्यक्ष" म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न करेल. क्रेमलिन यानुकोविचच्या युक्रेनला परत येण्यासाठी माहिती मोहीम किंवा कृती तयार करू शकते. 2010 मध्ये व्हिक्टर यानुकोविच युक्रेनचे चौथे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि ते मैदान क्रांतीपर्यंत (Maidan Revolution) या पदावर राहिले. यानुकोविचच्या कार्यकाळातच क्रिमियावर रशियाचा ताबा रशियाने फेब्रुवारी 2014 मध्ये क्रिमियाला जोडले. 16 मार्च 2014 रोजी झालेल्या सार्वमतामध्ये असा दावा करण्यात आला आहे की क्रिमियाच्या 97 टक्के लोकांनी रशियामध्ये सामील होण्याच्या बाजूने मतदान केले. यानंतर, 18 मार्च 2014 रोजी क्रिमिया औपचारिकपणे रशियाला जोडण्यात आले. तेव्हा युक्रेनचे अध्यक्ष व्हिक्टर यानुकोविच होते. ते रशियाचे समर्थक मानले जातात. त्यांच्या सांगण्यावरून युक्रेनने क्रिमिया न लढता रशियाच्या हवाली केल्याचे सांगितले जाते. सगळीकडे आक्रोश अन् कानठाळ्या बसवणारा आवाज! 'आम्ही खूप घाबरलोय... व्हिक्टर यानुकोविच फेब्रुवारी 2014 मध्ये पदच्युत व्हिक्टर यानुकोविच यांनी युरोपियन युनियन (EU) सोबत राजकीय आणि व्यापार करार करण्यास नकार दिला होता. याच्या निषेधार्थ नोव्हेंबर 2013 पासून विरोधी पक्षांनी यानुकोविच सरकारच्या विरोधात आघाडी उघडली होती. रशियाने क्रिमियावर कब्जा केल्याने आगीत आणखी भर पडली. कीवमध्ये, विरोधी पक्ष आणि त्यांच्या समर्थकांव्यतिरिक्त सामान्य जनताही यानुकोविचच्या विरोधात रस्त्यावर उतरली होती. यादरम्यान, आंदोलक आणि पोलिसांमध्ये हिंसक चकमक उडाली, गोळीबार झाला, अनेकांचा जीव गेला. परिणामी फेब्रुवारी 2014 मध्ये, युक्रेनमधील व्हिक्टर यानुकोविचचे सरकार उलथून टाकण्यात आले. त्यांना रशियामध्ये आश्रय घ्यावा लागला. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान भारतातील आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू, चिंता वाढली व्हिक्टर यानुकोविच हेच का? व्हिक्टर यानुकोविच यांची क्रेमलिनशी जवळीक, युक्रेनचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले अध्यक्ष म्हणून त्यांची मागील कारकीर्द, त्यांना पुतिनसाठी एक व्यवहार्य उमेदवार बनवते. पाश्चात्य देशांचा असा विश्वास आहे की व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनचे निवडून आलेले सरकार उलथून टाकायचे आहे. झेलेन्स्की यांच्या जागी व्हिक्टर यानुकोविचच्या नेतृत्वाखाली युक्रेनमध्ये कठपुतळी सरकार आणायचे आहे. युरोपचा नकाशा पुन्हा तयार करणे आणि मॉस्कोच्या शीतयुद्धाच्या काळातील प्रभावाचे पुनरुज्जीवन करण्याचा रशिया प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Russia Ukraine, Vladimir putin

    पुढील बातम्या