मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Kashi Vishwanath | औरंगजेब ते अहिल्याबाई होळकर, काशी विश्वनाथ मंदिर उभारणी आणि विध्वंसाची रंजक कहाणी

Kashi Vishwanath | औरंगजेब ते अहिल्याबाई होळकर, काशी विश्वनाथ मंदिर उभारणी आणि विध्वंसाची रंजक कहाणी

Kashi Vishwanath Temple: काशी विश्वनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. काशी विश्वनाथ मंदिराला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. असे मानले जाते की एकदा या मंदिरात गेल्यावर आणि पवित्र गंगेत स्नान केल्यास मोक्ष प्राप्त होतो. पूर्वी 3000 चौरस फुटांपर्यंत असलेलं संकुल आता सुमारे 5 लाख चौरस फुटांच्या विस्तीर्ण क्षेत्रात पसरलं आहे, यावरुन याच्या विशालतेचा अंदाज येऊ शकतो. काय आहे काशीचा इतिहास? आतापर्यंत कित्येकवेळा या मंदिरावर हल्ले झालेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 13 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या (Kashi Vishwanath Corridor) पहिल्या टप्प्याचे लोकार्पण केलं. या मोठ्या प्रकल्पामुळे वाराणसीतील पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे बोलले जात आहे. हे काम सुरू करण्यासाठी 8 मार्च 2019 रोजी पंतप्रधानांनी प्रकल्पाची पायाभरणी केली होती. हा प्रकल्प आता सुमारे 5 लाख चौरस फुटांच्या विस्तीर्ण क्षेत्रात पसरला आहे, पूर्वी संबंधित संकुल सुमारे 3000 चौरस फुटांपर्यंत मर्यादित होते, यावरुन याच्या विशालतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर काशी विश्वनाथ मंदिराच्या इतिहासावर एक नजर टाकूया. हे मंदिर कधी बांधले आणि कितीवेळा पाडले गेले.

काय आहे इतिहास?

काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. त्याच्या बांधकाम आणि पुनर्बांधणीबद्दल विविध सिद्धांत आहेत. इतिहासकार सांगतात की विश्वनाथ मंदिर अकबराच्या नौरत्नांपैकी एक राजा तोडरमल याने बांधले होते. काशी विद्यापीठातील इतिहास विभागाचे निवृत्त प्राध्यापक यांच्या म्हणण्यानुसार, 'विश्वनाथ मंदिर राजा तोडरमलने बांधले होते, याचे ऐतिहासिक पुरावे आहेत आणि तोडरमल यांनीही अशी अनेक बांधकामे केली आहेत. मात्र, अकबराच्या आदेशाने त्यांनी हे काम करून घेतले, ही गोष्ट ऐतिहासिकदृष्ट्या पटणारी नाही. अकबराच्या दरबारात राजा तोडरमलची स्थिती अशी होती की त्यांना या कामासाठी अकबराच्या आदेशाची गरज नव्हती.

ज्योतिर्लिंग

काशी विश्वनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. काशी विश्वनाथ मंदिराला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. या मंदिरात जाऊन पवित्र गंगेत स्नान केल्याने मोक्षप्राप्ती होते, असे मानले जाते.

11व्या शतकात बांधकाम

हे मंदिर गंगा नदीच्या पश्चिम तीरावर आहे. 11 व्या शतकात हे मंदिर राजा हरिश्चंद्र यांनी पुन्हा बांधले होते असे सांगितले जाते. 1194 मध्ये मुहम्मद घोरीने हे पाडले. यानंतर मंदिराचे पुन्हा एकदा निर्माण करण्यात आले. पण, 1447 मध्ये जौनपूरच्या सुलतान महमूद शाहने ते पुन्हा भूईसपाट केले. जर आपण इतिहासाची पाने चाळली तर तर लक्षात येईल की काशी मंदिराचे बांधकाम आणि पाडण्याच्या घटना 11 व्या शतकापासून 15 व्या शतकापर्यंत चालू होत्या.

ज्यांच्या हातात डमरु आहे त्यांचं काशीत सरकार आहे : नरेंद्र मोदी

मंदिर तोडण्यासाठी शाहजहाननं सैन्य पाठवलं

सन 1585 मध्ये पंडित नारायण भट्ट यांनी राजा तोडरमल यांच्या मदतीने ते बांधले होते. मात्र, 1632 मध्ये शाहजहानने ते तोडण्यासाठी सैन्याची तुकडी पाठवली. हिंदूंच्या विरोधामुळे सैन्य आपल्या उद्दिष्टात यशस्वी होऊ शकले नाही. असे म्हणतात की 18 एप्रिल 1669 रोजी औरंगजेबाने हे मंदिर पाडण्याचा आदेश दिला होता.

विद्यमान मंदिर कधी बांधलं?

सुमारे 100 वर्षांनंतर औरंगजेबाने हे मंदिर पाडल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सुमारे 125 वर्षे येथे विश्वनाथ मंदिर नव्हते. विद्यमान विश्वनाथ मंदिर 1780 मध्ये महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले होते. नंतर महाराजा रणजित सिंह यांनी 1853 मध्ये 1000 किलो सोने दान केले. या मंदिराला भेट देण्यासाठी आदि शंकराचार्य, संत एकनाथ, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, महर्षी दयानंद, गोस्वामी तुलसीदासही आल्याचे सांगितले जाते.

सवाई माधवपूरपेक्षा राजस्थानातील 'या' शहराला भेट द्या, पैसा वसूल ट्रिप होईल!

5 लाख चौरस फुटांच्या विस्तीर्ण क्षेत्रात काशी विश्वनाथ धाम

आता 286 वर्षांनंतर हे मंदिर नव्या अवतारात जगासमोर येत आहे. सुमारे 5 लाख चौरस फुटांच्या विस्तीर्ण क्षेत्रात काशी विश्वनाथ धाम पूर्णपणे तयार आहे. या भव्य कॉरिडॉरमध्ये 23 लहान-मोठ्या इमारती आणि 27 मंदिरे आहेत. कॉरिडॉर 3 भागांमध्ये विभागलेला आहे. प्रदक्षिणा मार्गावर 4 मोठे दरवाजे आणि 22 संगमरवरी शिलालेख आहेत. यामध्ये काशीचे वैभव वर्णन केले आहे.

मंदिराजवळ मशीद

मंदिरासोबतच ज्ञानवापी मशीद आहे. मंदिराच्या मूळ जागेवरच मशीद बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. ज्ञानवापी मशीद मुघल शासक औरंगजेबाने मंदिर तोडून बांधली होती. याशिवाय आलमगिरी मशीद देखील आहे, तीही औरंगजेबाने मंदिर तोडून बांधली असल्याचे सांगितले जाते.

First published:

Tags: Pm modi, Temple inauguration, Uttarkashi