लखनऊ, 13 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते आज काशी कॉरिडॉरचं (Kashi corridor) लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना चिमटे काढले. “काशीच्या विकासासाठी आपण जेव्हा काही वर्षांपूर्वी काशीत आलो होतो तेव्हा विश्वास घेऊन आलो होतो. त्यावेळी काही लोकांनी वैयक्तिक स्वार्थ आणि राजकारणासाठी संशय घेतला होता. मोदीसारखे भरपूर आले-गेले. होणारच नाही, इथे असंच चालतं. पण काशी तर काशी आहे. काशीत एकच सरकार आहे, ज्यांच्या हातात डमरु आहे त्यांचं सरकार आहे”, अशा शब्दात मोदींनी विरोधकांवर नाव न घेता निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?
“मी जेव्हा बनारस आलो होतो तेव्हा एक विश्वास घेऊन आलो होतो. हा विश्वास माझ्यापेक्षा जास्त बनारसच्या नागरिकांवर होता. आज हिसाबकिताबची वेळ नाही. पण त्यावेळी काही लोक असेही होते जे बनारसच्या नागरिकांवर संशय घेत होते. कसं होणार? होणारच नाही. इथे तर असंच चालतं. मोदीजींसारखे भरपूर आले-गेले. मला तर आश्चर्य वाटायचं की, बनारस बद्दल लोकांच्या मनात असे विचार तयार झाले होते. ही जनता बनारसची नव्हती. थोडंफार राजकारण होतं. काहींचा वैयक्तिक स्वार्थ होता. त्यामुळे बनारसवर आरोप केला जात होता. पण काशी तर काशी आहे. काशी अभिभाषी आहे. काशीत एकच सरकार आहे, ज्यांच्या हातात डमरु आहे त्यांचं सरकार आहे. जिथे गंगा आपला प्रवाह बदलून वाहू शकते त्या काशीचा संकल्प कोण बदलवू शकतो? माझ्या प्रसन्नता शिवाय काशीत कोण येऊ शकतं, असं महादेवांनी म्हटलंय. काशीत महादेवांच्या इच्छेशिवाय काहीच होत नाही. इथे जे काही होतं ते महादेवाच्या इच्छेने होतं. इथे जे काही झालंय ते महादेवांनीच केलंय”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. हेही वाचा : म्हाडा परीक्षा पेपरफुटीच्या रॅकेटचं मूळ औरंगाबादेत, तीन क्लासेस चालकांचा पर्दाफाश
पंतप्रधान मोदींचं भाषण जसच्या तसं, वाचा…
“आमच्या पुराणात म्हटलं आहे, जो काशीत प्रवेश करतो तो साऱ्या बंधनांपासून मुक्त होतो. भगवान विश्वेश्वरचा आशीर्वाद आहे. इथे आल्यावर एक अलौकीक ऊर्जा आमच्या अंतरात्म्याला जागृत करते. आज तर या चीर चैतन्य काशीच्या चैतनात एक वेगळंच स्पंदन आहे. आज शास्वत बनारसच्या संकल्पात एक वेगळंच सामर्थ्य दिसत आहे. आम्ही शास्त्रात ऐकलंय की जेव्हा कधी पुण्य क्षण असतो तेव्हा सर्व तीर्थ, सारी देवी आणि शक्ती बनारसमध्ये बाबाजवळ उपस्थित होते. काहीसा असाच अनुभव मला बाबाच्या दरबारात येऊन येतोय”, असं मोदी म्हणाले. “मला असं वाटतंय की संपूर्ण ब्रह्मांड यासोबत जुडला गेला आहे. विश्वनाथ धामच्या या पवित्र क्षणासोबत संपूर्ण विश्व जोडलं गेलं आहे. आज भगवान शिवचा प्रिय दिवस सोमवार आहे. आजचा दिवस एक नवा इतिहास रचत आहे. आपलं भाग्य आहे की, आपण या तिथीचा साक्षीदार बनत आहोत. आज विश्वनाथ धाम अनंत ऊर्जांनी भरला आहे. त्याची विशेषता आकाशाला गवसणी घालत आहे. इथे आजूबाजूला जे अनेक प्राचीन मंदिर नाहीसे होण्याच्या मार्गावर होते किंवा जीर्ण झाले होते त्यांनाही पुनर्स्थापित करण्यात आलं आहे. बाबा आपल्या भक्तांच्या सेवेने प्रसन्न झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी आजच्या दिवसाचा आपल्याला आशीर्वाद दिला आहे”, अशी भावना मोदींनी व्यक्त केल्या. हेही वाचा : 21 वर्षांनी भारताने जिंकलाMiss Universeचा ताज, हरनाझच्या विजयावर लारा म्हणाली… “विश्वनाथ धामचा हा पूर्ण परिसर हा भारताच्या सनातन संस्कृतिचा, आमच्या अध्यात्मिक आत्म्याचं, भारताच्या प्राचीनता, परंपरा, ऊर्जा आणि गतीशीलतेचा प्रतिक आहे. तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा तुम्हाला केवळ आस्थाचं दर्शन होईल असं नाही. तर तुम्हाला आपल्या संस्कृतीच्या गौरवाचादेखील अनुभव येईल. प्राचीनता आणि नवीनता कशाप्रकारे सजली आहे, पुरातणच्या प्रेरणा भविष्याला दिशा देत आहेत, याचे साक्षात दर्शन विश्वनाथ धाम परिसरात आम्ही करत आहोत. जी गंगा माता उत्तर वाहिनी होऊन बाबाच्या चरणी येते. ती गंगा माताही आज खूप प्रसन्न असेल. जेव्हा आम्ही भगवान विश्वनाथांच्या चरणी प्रणाम करणार, ध्यान लावणार तेव्हा गंगा माताला स्पर्श करणारी हवा आम्हाला आशीर्वाद देईल. जेव्हा गंगा माता उन्मुक्त आणि प्रसन्न होईल तेव्हा आम्हाला दैवी अनुभव येईल”, असं मोदी म्हणाले.
Special day for us all. Inauguration of Shri Kashi Vishwanath Dham. https://t.co/Kcih2dI0FG
— Narendra Modi (@narendramodi) December 13, 2021
“बाबा विश्वनाथ, गंगा माता सगळ्यांची आहे. त्यांचा आशीर्वाद सगळ्यांसाठी आहे. पण वेळ आणि परिस्थितीमुळे बाबा आणि गंगामातेच्या सेवेची सुलभता कठीण होऊण बसली होती. इथे प्रत्येकाला यायची इच्छा होती. पण रस्ता आणि जागेची कमतरता भासत होती. वयस्कर, दिव्यांगांना इथे येण्यासाठी खूप अडचणींना सामोरं जावं लागत होतं. मात्र, आता विश्वनाथ धाम परियोजना पूर्ण झाल्याने इथे प्रत्येकाला पोहोचणं सोपं झालं आहे. दिव्यांग, वयस्कर आई-वडील थेट बोटीतून जेटीपर्यंत येणार. जेटीहून घाटवर येण्यासाठीदेखील इस्केलेटर लावण्यात आले आहे. तिथून थेट मंदिरापर्यंत येता येईल. आधी हे मंदिर क्षेत्र फक्त तीन हजार स्केअर फुट होतं. पण आज ते पाच लाख स्केअर फुटचं झालं आहे. आता मंदिर परिसरात 50 ते 70 हजार भाविक एकाच वेळी येऊ शकतात. आधी गंगा मातेचं दर्शन, त्यानंतर थेट विश्वनाथ धाम हेच तर आहे हर हर महादेव”, अशी माहिती नरेंद्र मोदींनी दिली.