मुंबई, 27 डिसेंबर : साहित्याशी (literature) संबंध आलेल्या प्रत्येकाने मिर्झा गालिब हे नाव वाचलं किंवा ऐकलं नसेल तर नवलचं. मिर्झा गालिब (Mirza Ghalib Birthday) यांचा जन्म 27 डिसेंबर 1797 रोजी आग्रा येथे झाला. गालिब 29 वर्षांचे असताना ते कोलकात्याला गेले होते. वाटेत वसलेल्या लखनौ, कानपूर, अलाहाबाद, बनारस या शहरांना भेट देत ते गेले. यावेळी त्यांना बनारस इतकं आवडलं की ते तिथे राहण्याचा विचार करू लागले. काशी संदर्भात त्यांनी लिहलेलं वाचलं तर लक्षात येतं की ते असं का म्हणत होते.
विनोद भारद्वाज यांच्या “गली कासिम जान” या पुस्तकातून बनारसबद्दल गालिब यांचे काय विचार होते? हे चांगलच समोर आलं आहे. गालिब जेव्हा बनारसला पोहोचले तेव्हा त्यांना या शहराविषयी आकर्षण निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. ते म्हणाले, हे शहर वेगळं आहे. काशीला काबा-ए-हिंदुस्थानचा दर्जा मिळायला हवा. या शहराचे असलेलं काशी नाव आवडल्याचे त्यांनी लिहलं आहे. आता आवडलेल्या शहरावर शेर लिहला नसता तर नक्कीच आश्चर्य वाटलं असतं.
तआलिल्ला बनारस चश्मेबद्दूर
बहिश्ते ख़ुर्रमो फिरदौस मामूर
इबादत खाना ए नाकूसियां अस्त
हमाना काब ए हिंदोस्तां अस्त
गंगेला निरखत रहायचे
बनारसमध्ये त्यांनी जे काही पाहिले होते ते त्यांनी त्यांच्या 'चिराग-ए-दैर' या मसनवीत लिहिले आहे, ही मसनवी त्यांनी पर्शियनमध्ये लिहिली होती. त्यांनी लिहिले की, 'मी या शहरातील इमारतींचा उल्लेख करतोय जे पूर्णपणे मित्रांनी भरलेलं आहे. हिरवट रंगावरील देवदूताचा चेहरा हा सौंदर्यवतींने मोहक आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, शत्रू दिल्लीची भीती नसती, तर मी नम्र होऊन आणि जनेयू घालून तस्बीह मोडली असती आणि गंगेच्या काठावर बसलो असतो. माझ्या देहावरील शीर शाबूत आहे आणि मी पूर्णपणे जगात मिसळत नाही तोपर्यंत मी इथं बसून राहील.
गालिबच्या म्हणण्यानुसार बनारसला येताच ते सराई नैरंग येथे येऊन राहिले. पण विनाकारण तिथे 4-5 दिवस व्यर्थ गेले, कारण जवळपास चार आठवडे या शहरात राहायचे होते, म्हणून त्यांनी जवळपास वेगळी जागा शोधली.
..आपल्या इच्छेचे शहर बनारस तर आहे
संध्याकाळ झाली की मी जवळच्या घाटाच्या पायऱ्यांवर बसायचो. तासनतास कसे निघून जायचे, मलाही कळायचे नाही. दिल्लीतील जमना पुल, ज्याला मी भेटायला जायचो, माझ्या मनात हळूहळू विचार येऊ लागला की, मिर्झा, तुम्हाला ज्या शहराची इच्छा होती ती म्हणजे काशीच तर आहे. ज्यांना माझं नाव माहित नाही, फक्त कामाची आशा आहे.
एके दिवशी सायंकाळी ढळणारी रात्र पाहत होतो, काबा-ए-हिंदुस्थान काशीच्या इमारतींचे दिवे गंगेच्या पाण्यावर लखलखत होते. सजवलेल्या बोटीतून लोक इकडून तिकडे नदीच्या जत्रेचा आनंद लुटत होते. जणू काही शहरच नदीवर उघडे पडलेलं आहे.
स्वर्गात जाण्याची शिडी कुठे आहे माहिती आहे का? शिडी काढण्याचा निर्णय का घेतला?
बाबा विश्वनाथांचे भजन गाणारी मुमताज
याच शहरातील घाटावर बसून मिर्झा गालिब यांना वाचन-लेखनाची आवड असलेल्या मुमताज अली यांची भेट झाली. बुरखा घालत होती. बाबा विश्वनाथांचे भजन गाण्यासाठी त्यांना ठिकठिकाणी बोलावले जायचे, त्यातून त्यांच्या घरचा उदरनिर्वाह चालायचा. गालिब सांगतात, मुमताजसोबतच्या एका छोट्या भेटीने मला काशीबद्दल खूप काही समजलं. अशी गंगा-जमुनी तहजीब, जिथे मुसलमान भजन गाऊन पोट भरतो. मला असे वाटले की इथे काशीत एक छोटेसे घर बांधून गंगा नदीच्या काठावर आयुष्य घालवता येईल.
रस्त्यावर आनंद घ्या
गालिब जोपर्यंत बनारसमध्ये राहिले तोपर्यंत ते तेथील घाट आणि गल्ल्यांचा आनंद घेत राहिले. बनारसच्या रस्त्यांबद्दल त्यांनी लिहिलं आहे की, "या रस्त्यांवर चालताना जाणवलं की हे छोटे आहेत, पण अतिशय स्वच्छ आहेत, म्हणजेच बूट काढूनही आरामात फिरता येतं, सजवलेली दुकानं, एकामागून एक पक्वानाच्या डिश, कुठेतरी हातात घुघरू बांधून भांग सेवन केली जात होती, पानाच्या दुकानांचा रंग दिल्लीपेक्षा वेगळा होता.
गौहर जानच्या कोठ्यावर
बनारसमध्ये गौहर जानच्या कोठ्यावरही गालिब गेले. रात्र उमलत होती. लोकांचा ओघ झपाट्याने वाढला होता. रॅक्स आणि मौसिकीची नशा पसरला होता. कोठ्याची सजावट पाहून महालाही फिका पडला असता. स्वर्गाचा दरवाजा उघडल्याचा भास झाला, हळूहळू गौहर जान हळू पावलांनी मेळाव्यात आली. गझल सुरू झाली, गौहरने नवे पदर उघडायला सुरुवात केली. गझल, ठुमरीचा जो रंग गौहरने दाखवला, त्यामुळे लखनौच्या लोकांची सभा बेरंग दिसू लागली. मध्यरात्री गौहर जानने पैलू बदलून भैरवीचा सूर घेतला, तेव्हा कयामत आली. गौहर जानची जादू गालिब यांच्यावर दीर्घकाळ टीकून राहिली.
Christmas | हे देश 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा करत नाहीत, कारण वाचून बसेल धक्का!
बनारस सोडताना गालिब उदास
गालिब यांनी बनारसच्या बैल आणि माकडांचाही उल्लेख केला आहे. बनारसहून कोलकात्याला जाण्याचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला तसतसे गालिब उदास होऊ लागले. पण मग त्यांनी ठरवले की परत येताना काही काळ या शहरात नक्कीच राहायचे. त्यांनी लिहिले, या शहरातील लोकांनी माझ्या पाहुणचारात कोणतीही कसर सोडली नाही.
आपल्या अल्पशा मुक्कामात गालिबला बनारस ही एखाद्या मैत्रिणीसारखी वाटत होती जी रात्रंदिवस गंगेचा आरसा हातात घेऊन स्वतःच्या सौंदर्याकडे पाहत राहते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uttarkashi, Varanasi