मराठी बातम्या /बातम्या /explainer /Christmas | हे देश 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा करत नाहीत, कारण वाचून बसेल धक्का!

Christmas | हे देश 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा करत नाहीत, कारण वाचून बसेल धक्का!

जगभरात 25 डिसेंबरला मोठ्या उत्साहात ख्रिसमस (Christmas) म्हणजेच नाताळ सण साजारा केला जातो. मात्र, असेही काही देश आहेत, जिथे 25 डिसेंबरला नाही तर वेगळ्या तारखेला साजरा केला जातो.

जगभरात 25 डिसेंबरला मोठ्या उत्साहात ख्रिसमस (Christmas) म्हणजेच नाताळ सण साजारा केला जातो. मात्र, असेही काही देश आहेत, जिथे 25 डिसेंबरला नाही तर वेगळ्या तारखेला साजरा केला जातो.

जगभरात 25 डिसेंबरला मोठ्या उत्साहात ख्रिसमस (Christmas) म्हणजेच नाताळ सण साजारा केला जातो. मात्र, असेही काही देश आहेत, जिथे 25 डिसेंबरला नाही तर वेगळ्या तारखेला साजरा केला जातो.

मुंबई, 24 डिसेंबर : उद्या 25 डिसेंबरला जगभरात ख्रिसमस (Christmas) म्हणजेच नाताळ सण उत्साहात साजरा केला जातो. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्ष हा सण अत्यंत साधेपणाने साजारा करावा लागला होता. यावर्षीही असच सावट या सणावर आहे. मात्र, 25 डिसेंबरनंतरही ख्रिसमसचा उत्सव सुरूच असतो हे तुम्हाला माहिती आहे का? 25 डिसेंबरला जगातील फक्त एक तृतीयांश लोक ख्रिसमस साजरा करतात. पण, अनेक देशांमध्ये हा दिवस वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो. आश्चर्य वाटले ना? पण हे सत्य आहे. चला याबद्दल आणखी माहिती घेऊयात.

ख्रिसमसचं नाव ऐकलं की प्रत्येकाला सांताक्लॉजची आठवण होते. सांता तुम्हाला अनेक भेटवस्तू देत असतो. आता सांताने तुम्हाला कोणती भेट दिली हे तर तुम्ही शकणार नाही. पण आम्ही तुम्हाला सांगतो की सांता त्याच्यासोबत आनंदाची भेट घेऊन येत असतो. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या दिवशी सांताकडून आनंद मिळविण्यासाठी लोकं आपापली घरांना सजावट करत असतात. विशेषकरुन आपल्या घरी एक झाड बनवतात. ज्याला ते ख्रिसमस ट्री म्हणतात. याला आनंद देणारं झाडंही म्हतात. या झाडाच्या समोर उभं राहून ते सांताकडे आपली इच्छा व्यक्त करतात.

अनेक दशकांपासून लोकांचा असा विश्वास आहे की सांता त्यांची इच्छा ऐकतो आणि नंतर त्यांना या झाडावर भेट देतो. त्यामुळे नवीन वर्षांपर्यंत हे झाड असेच राहते. कारण नवीन वर्षापर्यंत सांता कधीही तुमच्या घरी येऊ शकतो.

येथे 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जात नाही

लेबनॉन, आर्मेनियामध्ये ख्रिसमसचा हा सण 6 जानेवारीला साजरा केला जातो. या दिवशी या देशांमध्ये राष्ट्रीय सुट्टी देखील असते आणि येथील लोक ती मोठ्या उत्साहात साजरी करतात. आता तुम्ही 25 डिसेंबरच्या रात्री हा उत्सव साजरा करू शकता. मात्र, जगातील इतर अनेक देश आहेत जे यानंतरही तो साजरा करत असतात.

ऑर्थोडॉक्स ख्रिसमस कधी आणि कुठे साजरा केला जातो? Orthodox

ख्रिसमसचा दिवस हा प्रत्येकासाठी खास असतो. पण, ऑर्थोडॉक्स ख्रिसमसचा उत्सव त्याहूनही खास असतो. जॉर्जिया, कझाकिस्तान, रशिया, सर्बिया, युक्रेन यांसारख्या देशांमध्ये दरवर्षी 7 जानेवारीला ख्रिसमस साजरा केला जातो.

कॉप्टिक ख्रिसमस देखील साजरा होतो Coptic

इजिप्त, इथिओपिया, इरिट्रिया सारख्या देशांमध्ये कॉप्टिक शैलीत ख्रिसमस साजरा केला जातो. येथील लोक या दिवशी खूप धमाल करतात. पार्टी आणि भरपूर खाण्याचा आनंद घेतात.

काय आहे कारण?

मध्य आशिया आणि पूर्व युरोपमधील अनेक देश 25 डिसेंबरच्या अधिकृत तारखेपेक्षा 13 दिवसांनी ख्रिसमस साजरा करतात. हे त्यांनी पाळलेल्या कॅलेंडरमुळे आहे. बहुतेक जग ग्रेगोरियन कॅलेंडरचे अनुसरण करते, तर हे देश ज्युलियन कॅलेंडरचे अनुसरण करतात. या देशांमध्ये बेलारूस, इजिप्त, जॉर्जिया, इथिओपिया, कझाकिस्तान आणि सर्बिया यांचा समावेश आहे. रशियाच्या अनेक भागांमध्ये 7 जानेवारीला ख्रिसमस साजरा केला जातो. इटलीमध्ये ख्रिसमस 6 जानेवारीला एपिफनी, मेजवानीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. असे मानले जाते की येशूच्या जन्मानंतर 12 व्या दिवशी, तीन विचारवंतांनी आशीर्वाद तसेच भेटवस्तूंचा वर्षाव करण्यासाठी त्याला भेट दिली. त्यामुळेच इटलीमध्ये 6 जानेवारीला ख्रिसमस साजरा केला जातो.

आतापर्यंत तुम्हाला असे वाटत असेल की 25 डिसेंबरनंतर तुम्ही सांताला तुमच्या मनातील इच्छा सांगू शकणार नाही. तर असं अजिबात नाही. अगदी नवीन वर्षातही तुम्ही सांताकडे Wish करू शकता. त्यामुळे इतर देशांप्रमाणे तुम्हीही तुमच्या घरी ख्रिसमस ट्री लावा आणि तुमच्या इच्छा पूर्ण करा.

First published:

Tags: Christmas