मराठी बातम्या /बातम्या /explainer /X, Y आणि Z सुरक्षा म्हणजे काय? कुमार विश्वास यांना कोणती सुरक्षा मिळाली?

X, Y आणि Z सुरक्षा म्हणजे काय? कुमार विश्वास यांना कोणती सुरक्षा मिळाली?

अलीकडेच कुमार विश्वास यांना Y श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. आपल्या देशात, सरकार गरजेनुसार अनेक प्रकारची एलिट सुरक्षा देते. सामान्यतः हे संरक्षण देशातील एलिट म्हटल्या जाणार्‍या लोकांना दिले जाते. कोणला कोणती सुरक्षा दिली जाते? त्याचं स्वरुप काय असतं? चला जाणून घेऊया.

अलीकडेच कुमार विश्वास यांना Y श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. आपल्या देशात, सरकार गरजेनुसार अनेक प्रकारची एलिट सुरक्षा देते. सामान्यतः हे संरक्षण देशातील एलिट म्हटल्या जाणार्‍या लोकांना दिले जाते. कोणला कोणती सुरक्षा दिली जाते? त्याचं स्वरुप काय असतं? चला जाणून घेऊया.

अलीकडेच कुमार विश्वास यांना Y श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. आपल्या देशात, सरकार गरजेनुसार अनेक प्रकारची एलिट सुरक्षा देते. सामान्यतः हे संरक्षण देशातील एलिट म्हटल्या जाणार्‍या लोकांना दिले जाते. कोणला कोणती सुरक्षा दिली जाते? त्याचं स्वरुप काय असतं? चला जाणून घेऊया.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी : नुकत्याच झालेल्या पंजाब निवडणुकीत कवी कुमार विश्वास यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दहशतवादी असल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर गुप्तचर विभागाच्या अहवालात त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना तातडीने सुरक्षा पुरवण्यात आली आहे. आपल्या देशात पंतप्रधानांपासून ते नेते, मंत्री आणि इतर खास व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारची सुरक्षा पुरवली जाते. चला या संदर्भात सविस्तर जाणून घेऊया.

कुमार विश्वास यांना दिलेली सुरक्षा Y श्रेणीची आहे. हे संरक्षण एसपीजी, झेड प्लस, झेड आणि वाय प्लस संरक्षणापेक्षा काहीशी कमी आहे. पण विश्वास यांच्या सुरक्षेची खास गोष्ट म्हणजे त्यांना CRPF कवच मिळाले आहे, म्हणजेच यात त्याच्यासोबत असणारे सुरक्षा कर्मचारी CRPF चे असतील, त्यात 1-2 कमांडो देखील असतील.

भारतात कोणत्या प्रकारची एलिट सुरक्षा सरकार प्रदान करते, ते जाणून घेऊया. देशाचे माजी पंतप्रधान, विशेष मंत्री यांना सहसा झेड प्लस सुरक्षा दिली जाते. यामध्ये सुरक्षेचे मजबूत वर्तुळ देण्यात आले आहे. SPG नंतर ही देशातील दुसरी सर्वात महत्वाची सुरक्षा आहे. झेड प्लस सुरक्षा कोणाला द्यायची हे केंद्र सरकार ठरवते. गुप्तचर विभागांना मिळालेल्या माहितीच्या आधारे व्हीआयपींना झेड प्लस आणि अन्य प्रकारची सुरक्षा दिली जाते.

किती प्रकारची सुरक्षा व्यवस्था आहे?

भारतातील सुरक्षा व्यवस्था चार प्रकारात विभागली गेली आहे. Z प्लस (Z+), (उच्च पातळी), Z (Z), Y (Y) आणि X (X) श्रेणी. या चार श्रेणींमध्ये कोणाला कोणत्या स्तरावर संरक्षण द्यायचे हे सरकार ठरवू शकते. सरकार पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, नोकरशहा, माजी नोकरशहा, न्यायाधीश, माजी न्यायाधीश, व्यापारी, क्रिकेटपटू, चित्रपट कलाकार, साधू-संत किंवा सामान्य नागरिक यांना ही व्हीआयपी सुरक्षा देऊ शकते.

लोकल टू ग्लोबल! दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यात मोदींची भूमिका कशी होती?

झेड प्लस सुरक्षा कशी आहे?

झेड प्लस सुरक्षा ही देशाची दुसरी मोठी सुरक्षा आहे. यात 36 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये 10 NSG (National Security Guards) आणि SPG (Special Protection Group) कमांडो तसेच काही पोलिसांचा समावेश आहे. यामध्ये इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस (Indo- Tibetan Border Police) आणि सीआरपीएफ (Central Reserve Police Force) जवानही सुरक्षेत तैनात आहेत. या सुरक्षेमध्ये पहिल्या वर्तुळाची जबाबदारी एनएसजीची आहे तर दुसऱ्या चक्राची जबाबदारी एसपीजी कमांडोची आहे. तसेच, एस्कॉर्ट्स आणि पायलट वाहने देखील Z+ सुरक्षिततेमध्ये प्रदान केली जातात.

या लोकांना झेड प्लस सुरक्षा

उपराष्ट्रपती, माजी पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्यपाल, मुख्यमंत्री, महत्त्वाचे केंद्रीय मंत्री, प्रमुख नेते, प्रसिद्ध कलाकार, कोणताही खेळाडू, देशातील कोणताही प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या नागरिकाला ही सुरक्षा मिळते.

Z सुरक्षा म्हणजे काय?

झेड सिक्युरिटीमध्ये (Z Security) 22 सुरक्षा कर्मचारी आहेत. त्यात नेहमी पाच एनएसजी कमांडो असतात. यामध्ये आयटीबीपी (Indo-Tibetan Border Police) आणि सीआरपीएफ (CRPF) चे अधिकारी सुरक्षेत तैनात आहेत. या सुरक्षेत एस्कॉर्ट्स आणि पायलट वाहने देखील देण्यात आली आहेत. तसेच दिल्ली पोलिस किंवा स्थानिक पोलिसांचे सुरक्षा कर्मचारी असतात.

पोलिसाचा उच्चशिक्षित मुलगा कसा झाला 'मौत का सौदागर'? कधीकाळी होता संपादक

वाय श्रेणी सुरक्षा

सुरक्षिततेचा हा तिसरा स्तर आहे. हे संरक्षण कमी जोखीम असलेल्या लोकांना दिले जाते. यामध्ये 11 सुरक्षा कर्मचारी Y+ सुरक्षेत सहभागी आहेत. ज्यामध्ये दोन कमांडो तैनात असतात, उर्वरित पोलिस तर Y सुरक्षा श्रेणीमध्ये 4 ते 8 सुरक्षा कर्मचारी 1-2 कमांडोसोबत असतात. विश्वास यांना 4 सीआरपीएफ सुरक्षा जवानांचे कवच मिळाले आहे. काही काळापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला Y+ सुरक्षा देण्यात आली होती.

एक्स श्रेणी सुरक्षा

या श्रेणीत दोन सुरक्षा रक्षक तैनात आहेत. ज्यामध्ये एक पीएसओ (पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर) असतो. देशातील अनेकांना एक्स-क्लास सुरक्षा आहे. या सुरक्षेमध्ये कोणतेही कमांडो सहभागी नसतात.

या सुरक्षेतील कमांडो आणि जवान कुठे निवडले जातात?

या संरक्षणासाठी पोलीस आणि कमांडोची निवड केली जाते. ते भारताच्या मुख्य चार लष्करी दल किंवा सैन्यातून येतात.

1. SPG (Special Protection Group)

2. NSG (National Security Guard)

3. ITPB (Indo- Tibetan Border Police)

4. CRPF (Central Reserve Police Force)

First published:
top videos

    Tags: Police Security, Security alert, Z security