जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / Ahmedabad Serial Blast | पोलिसाचा उच्चशिक्षित मुलगा कसा झाला 'मौत का सौदागर'? कधीकाळी होता संपादक

Ahmedabad Serial Blast | पोलिसाचा उच्चशिक्षित मुलगा कसा झाला 'मौत का सौदागर'? कधीकाळी होता संपादक

Ahmedabad Serial Blast | पोलिसाचा उच्चशिक्षित मुलगा कसा झाला 'मौत का सौदागर'? कधीकाळी होता संपादक

Ahmedabad Serial Blast : अहमदाबाद सीरियल ब्लास्ट प्रकरणी कोर्टाने दोषी ठरवलेल्यांमध्ये सफदर नागोरी (Safdar Nagori), जावेद अहमद आणि अतीकुर रहमान यांचा समावेश आहे. सफदर नागोरी हा दिल्ली दंगलीचा आरोपी उमर खालिद याच्या वडिलांसोबत सिमीमध्ये काम करत होता

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 फेब्रुवारी : अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सफदर नागोरीसह 38 दोषींनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचवेळी, यूएपीए अंतर्गत 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. एका दशकाहून अधिक काळ चाललेल्या खटल्यानंतर अलीकडेच न्यायालयाने 49 जणांना दोषी ठरवले होते. तर 28 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 26 जुलै 2008 रोजी झालेल्या स्फोटात 56 जणांचा मृत्यू झाला होता. तर 200 हून अधिक जखमी झाले. यातील सफदर हा पोलीसाचा मुलगा असून पत्रकारितेतील पदव्युत्तर पदवीधर आहे. अभ्यासादरम्यान त्याने आपले बंडखोर इरादे शोधनिबंधांमधून व्यक्त केले होते. उज्जैनच्या विक्रम विद्यापीठात शिकत असताना त्याने ‘बर्फाची आग कशी विझवायची’ या नावाने काश्मीर आणि त्यातील प्रश्नांवर वादग्रस्त संशोधन केले. या संशोधनाने त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. पण, सफदरचा पत्रकारिता ते दहशतवादी हा प्रवास कसा झाला? विद्यार्थीदशेतच संकेत उज्जैनच्या विक्रम विद्यापीठात 2000 मध्ये अंतिम वर्षात, त्याला प्रकल्प कार्यासाठी विषय देण्यात आला - उर्दू पत्रकारितेचे आयाम. सफदर यांनी विभागप्रमुख प्रा. रामराजेश मिश्रा यांना विषय बदलण्यास सांगितले. मिश्रा यांच्या परवानगीने त्यांनी काश्मीर समस्येवर एक प्रकल्प लिहिला - बर्फाची आग कशी विझवायची. हा प्रकल्प चार खंडांमध्ये लिहला आहे. काश्मीर शोकांतिका, पृथ्वीवरील स्वर्ग: काल आणि आज, विवादित मुद्दे: काही तथ्ये आणि अशा प्रकारे बर्फाची आग विझवली जाईल. त्यात सफदरने लिहिले, ‘लोकशाहीचा अर्थ बहुसंख्यांची हुकूमशाही नाही. काश्मीरचा निर्णय काश्मिरींनीच घ्यावा. जे हा प्रस्ताव मान्य करत नाहीत ते खरोखरच फॅसिस्ट वृत्ती दाखवत आहेत. पुढे तो लिहतो, पक्षी पिंजऱ्यात असो किंवा कुत्रा साखळदंडात बांधलेला असो आणि तुम्ही जगाला सांगता की तो स्वेच्छेने माझ्यासोबत असेल तर फक्त अंध व्यक्तीच त्यावर विश्वास ठेवू शकेल. नागोरी एकेकाळी संपादक सफदर नागोरी हा उज्जैनच्या नागोरी गावचा रहिवासी आहे. त्याने पत्रकारितेची पदवी घेतली आहे. पदवी घेतल्यानंतर तो तहरीर या सिमीच्या कारवायांचा प्रचार करणाऱ्या मासिकाचा संपादक होता. वडील पोलिसातून निवृत्त झाले नागोरी याचा जन्म 1970 मध्ये उज्जैनमधील महिदपूरच्या नागोरी गावात झाला. त्याचे वडील गहिरुद्दीन नागोरी उज्जैन पोलीस गुन्हे शाखेत होते आणि 2005 मध्ये सहायक उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाले. नागोरी याने 1999 मध्ये विक्रम विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. विद्यापीठात शिकत असताना तो सिमी (स्टुडंट इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया) मध्ये सामील झाला. त्याला प्रदेशाध्यक्षपद मिळाले. भाऊ कमरुद्दीन नागोरी याला आंध्र प्रदेशातील सिमी प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

पार्किंगमध्ये काम करणारा निघाला गुप्तहेर;व्हॉट्सअॅपवरुन पाकला पुरवित होता माहिती

1993 मध्ये सिमीचा सदस्य 1992 च्या बाबरी विध्वंस आणि त्यानंतरच्या जातीय दंगलीनंतर नागोरी कट्टरपंथी झाला. तो 1993 मध्ये सिमीमध्ये सामील झाला होता. नागोरीविरुद्ध पहिला गुन्हा 1997 मध्ये उज्जैनमधील महाकाल पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. इंदूरमध्ये 1998 मध्ये ही घटना घडली होती. इंदूर पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर सोडून दिले. चुकीच्या कामात गुंतल्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याच्याशी संबंध तोडले. 2001 मध्ये संघटनेवर बंदी घालण्यापूर्वी तो भूमिगत झाला होता. 11 डिसेंबर 2000 रोजी त्याला फरारी घोषित करण्यात आले. इंदूर येथील फार्महाऊसवर प्रशिक्षण सफदर नागोरी याला मध्य प्रदेश पोलिसांनी 26 मार्च 2008 रोजी इंदूरमधील संयोगितागंज येथील फ्लॅटमधून अटक केली होती. तो, त्याचा भाऊ कमरुद्दीन नागोरी आणि 11 सिमीचे दहशतवादी या कारवाईत पकडले गेले. हे लोक इंदूर शहरापासून 35 किमी अंतरावर असलेल्या चोराल येथील फार्महाऊसवर दहशतवादी प्रशिक्षण शिबिर चालवायचे. झारखंड, केरळ, कर्नाटक आदी राज्यांतील सिमी सदस्यांना येथे प्रशिक्षण देण्यात आले. पोलिसांना या फार्महाऊसमधून शस्त्रे, दारूगोळा, उर्दू आणि हिंदी भाषेतील कट्टरवादी साहित्य आणि स्फोटके सापडली होती. या प्रकरणात नागोरी याला सोडण्यात आले. तीन महिन्यांनंतर 26 जुलैला गुजरात हादरलं 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. 70 मिनिटांत 56 जणांचा मृत्यू झाला होता. तर 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सफदर नागोरी याचा बॉम्बस्फोटात सहभाग होता. त्याला गुजरात पोलिसांनी अटक केली. चौकशीदरम्यान नागोरीने एसटीएफला सांगितले होते की, सिमीच्या सैनिकांनी हिजबुल मुजाहिद्दीनसोबत जम्मू-काश्मीरमध्ये प्रशिक्षण घेतले होते. नागोरी याने सांगितले की, त्याला देशभरातील विविध प्रकारच्या दहशतवादी कारवायांसाठी प्रशिक्षण देण्यात आले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात