Home /News /explainer /

Monkeypox Virus: कोरोनानंतर जगावर 'मंकीपॉक्स'चा धोका! जाणून घ्या संसर्गजन्य आजाराची लक्षणे आणि उपचार

Monkeypox Virus: कोरोनानंतर जगावर 'मंकीपॉक्स'चा धोका! जाणून घ्या संसर्गजन्य आजाराची लक्षणे आणि उपचार

monkeypox virus : कोरोना विषाणूचा धोका अद्याप पूर्णपणे संपलेला नाही तोच आणखी एका व्हायरसने लोकांच्या हृदयाला हादरवून सोडले आहे. विशेष म्हणजे कोरोनाप्रमाणेच हा विषाणू देखील संक्रमित जीवांपासून मानवांमध्ये पसरतो.

    मुंबई, 10 मे : कोरोना विषाणूचा (corona virus) धोका अद्याप पूर्णपणे संपलेला नाही तोच आणखी एका व्हायरसने लोकांच्या हृदयाला हादरवून सोडले आहे. विशेष म्हणजे कोरोनाप्रमाणेच हा विषाणू देखील संक्रमित जीवांपासून मानवांमध्ये पसरतो. या विषाणूचे नाव मंकीपॉक्स (Monkeypox Virus) आहे. हा रोग उंदीर किंवा माकडांसारख्या संक्रमित जीवांद्वारे मानवांमध्ये पसरतो. यूकेच्या आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले की संक्रमित व्यक्ती नुकतीच नायजेरियातून आली आहे. अशा परिस्थितीत त्याच देशात रुग्णाला मंकीपॉक्सची लागण झाल्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, 1970 मध्ये मानवांमध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यामुळे आता आणखी काळजी घेण्याची गरज आहे. चला या संदर्भात आणखी माहिती घेऊ. मंकीपॉक्स व्हायरस म्हणजे काय? What is Monkeypox Virus Infection मंकीपॉक्स हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो मुख्यतः उंदीर आणि माकडांपासून मानवांमध्ये पसरतो. संक्रमित प्राण्यांच्या संपर्कात आल्याने मंकीपॉक्स रोगाचा धोका वाढतो. हा एक दुर्मिळ संसर्ग आहे जो स्मॉल पॉक्ससारखा (कांजण्या) दिसतो. या आजारात फोडांची लक्षणे दिसतात. याशिवाय या संसर्गजन्य आजारात रुग्णामध्ये फ्लूसारखी लक्षणेही दिसू शकतात. ज्या लोकांमध्ये हा आजार गंभीर आहे अशा लोकांमध्ये न्यूमोनियाची लक्षणेही दिसून येतात. जेव्हा त्याचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णामध्ये दिसणारी लक्षणे सौम्य किंवा गंभीर असू शकतात. संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर हा आजार डोळे, नाक किंवा तोंडाद्वारे मानवी शरीरात पसरतो. मंकीपॉक्सची लक्षणे Monkeypox Virus Symptoms ही लक्षणे रुग्णाच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर लाल फोड आणि पुरळ यांसह देखील दिसू शकतात. शरीरावर गडद लाल ठिपके त्वचेवर लाल पुरळ. फ्लूची लक्षणे. न्यूमोनियाची लक्षणे. ताप आणि डोकेदुखी. स्नायू दुखणे. थंडी वाजून येणे. जास्त थकवा. लिम्फ नोड्सची सूज. बॉडी बनवणाऱ्या प्रोटीन पावडरमध्ये सापडली विषारी केमिकल्स! एका चुकीमुळे होऊ शकते शरीराची राख ​इनक्युबेशन पीरियड काय आहे? इनक्युबेशन कालावधी हा संसर्गापासून लक्षणांपर्यंतचा काळ असतो. हा कालावधी 7 ते 14 दिवसांचा असतो. सामान्यत: ताप सुरू झाल्यानंतर 1 ते 3 दिवसांत रुग्णाला पुरळ उठते. जे चेहऱ्यापासून सुरू होते आणि शरीराच्या इतर भागात पसरते. त्वचेचा उद्रेक होण्याची अवस्था 2 ते 4 आठवड्यांदरम्यान असते. या दरम्यान जखमा कडक होतात आणि त्यात वेदना होतात. हा आजार साधारणपणे 2 ते 4 आठवडे टिकतो. मंकीपॉक्सचा उपचार जरी या आजाराने बाधित व्यक्ती सामान्यतः एका आठवड्यात बरी होते. मात्र, काही लोकांमध्ये हा रोग खूप गंभीर आणि प्राणघातक देखील असू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, मंकीपॉक्सवर सध्या कोणतेही अचूक उपचार नाहीत. या रोगाची लागण झाल्यावर, लक्षणे कमी करण्यासाठी रुग्णावर उपचार केले जातात. संक्रमित व्यक्तीला वेगळं ठेवल्याने त्याचा इतर लोकांमध्ये प्रसार होण्याचा धोका कमी होतो. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क वापरणे, स्वच्छतेची काळजी घेण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. खसखस खाल्ल्यानं वजन कमी होतं का? त्यातील पोषक घटक आणि फायदे जाणून घ्या मंकीपॉक्स कसा रोखायचा विषाणू पसरवणाऱ्या प्राण्यांशी संपर्क टाळा. आजारी जनावरांपासून दूर राहा. संक्रमित रुग्णांना वेगळे करा. हात वारंवार धुवा आणि स्वच्छ ठेवा. (Disclaimer: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.)
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Coronavirus, Virus

    पुढील बातम्या