मराठी बातम्या /बातम्या /explainer /

सामान्य फटाक्यांपेक्षा कसे वेगळे असतात Green Crackers; यातून धूर येत नाही का?

सामान्य फटाक्यांपेक्षा कसे वेगळे असतात Green Crackers; यातून धूर येत नाही का?

ग्रीन फटाके (Green Crackers) खरंच प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक असतात का?

ग्रीन फटाके (Green Crackers) खरंच प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक असतात का?

ग्रीन फटाके (Green Crackers) खरंच प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक असतात का?

मुंबई, 28 ऑक्टोबर : दिवाळी (Diwali) म्हणजे फराळ (Diwali Faral) , दिवाळी म्हणजे रांगोळी (Diwali rangoli) , दिवाळी म्हणजे आकाशकंदील (Diwali kandil)  आणि दिवाळी म्हणजे फटाके (Diwali Crackers). खरंच, फटाक्यांशिवाय दिवाळीची खरी मजा येत नाही असं अनेकांचं मत असेल (Diwali celebration). विविध प्रकारच्या, शोभेच्या, आकाशात जाऊन रोषणाई करणाऱ्या फटाक्यांमुळे दिवाळीची मजा आणखीच वाढते. गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणमुक्त दिवाळीचा (Environment friendly diwali) आग्रह धरला जातो आहे (Eco friendly diwali). त्यामुळे साहजिकच फटाकेमुक्त दिवाळीचा (Diwali without Crackers) पर्यायाचाही विचार केला जातोय (Pollution free diwali). यावर मध्यममार्ग म्हणून ग्रीन फटाक्यांचा (Green Crackers) पर्याय समोर येतो.

आता दिवाळी अगदी तोंडावर आलीय आणि त्यामुळेच पुन्हा एकदा ग्रीन फटाक्यांवर चर्चा होऊ लागली आहे. राज्य सरकारांनी फटाक्यांबाबत गाइडलाइन्स (State Guidelines on Crackers) जाहीर करायला सुरुवात केली आहे. यामध्ये अनेक राज्यांनी नेहमीच्या फटाक्यांवर बंदी घालून या ग्रीन फटाक्यांना परवानगी दिली आहे. त्यामुळेच आता लोकही ग्रीन फटाक्यांबाबत जास्त विचारणा करू लागले आहेत. हे फटाके कुठे मिळू शकतील, त्यांच्या किंमती किती असतील किंवा त्याचा फायदा काय असे प्रश्न आता अनेकांना पडू लागले आहेत.

ग्रीन फटाके म्हणजे काय?

ज्या फटाक्यांमुळे प्रदूषण कमी होतं, (no pollution) जे फटाके पर्यावरणपूरक आहेत, त्यांना ग्रीन क्रॅकर्स किंवा हरित फटाके (Green Crackers) असं म्हटलं जातं. हे ग्रीन फटाके नेहमीच्या फटाक्यांप्रमाणेच दिसतात. यामध्येही फुलबाजी, फ्लॉवरपॉट, स्कायशॉट असे प्रकार मिळतात.

हे वाचा - Diwali 2021: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीसह विष्णूची पूजा का केली जात नाही?

हे फटाकेही काडेपेटीच्या साह्यानेच उडवले जातात. याशिवाय या ग्रीन फटाक्यांमध्ये सुगंध असणारे फटाकेही असतात आणि वॉटर फटाकेही असतात. हे फटाके उडवण्याची पद्धत वेगळी असते.

ग्रीन फटाक्यांमध्ये काय असतं?

हे फटाके वेगळ्या पद्धतीने तयार केले जातात. या फटाक्यांमुळे प्रदूषण अजिबात होत नाही असं नाही; पण ते सरासरी 30 ते 40 टक्के कमी होऊ शकतं. तसंच ग्रीन फटाक्यांमध्ये प्रदूषण वाढवणारी हानिकारक रसायनं नसतात. त्यात अॅल्युमिनियम, बेरियम, पोटॅशिअम नायट्रेट आणि कार्बन वापरलं जात नाही. हे घटक वापरलेले असले, तरी त्यांचं प्रमाण अत्यल्प असतं. त्यामुळे वायूप्रदूषण कमी होतं. या फटाक्यांमुळे रोषणाईही होते. हे फटाके नेहमीच्या फटाक्यांसारखेच असतात; मात्र ते पर्यावरणपूरक असतात हे महत्वाचं. हे फटाके उडवताना धूर निघतो पण त्याचं प्रमाण अगदी कमी असतं.

कुठे मिळतात ग्रीन फटाके आणि ते महाग असतात का?

गेल्या काही वर्षांपर्यंत काही ठरावीक संस्थाच या पर्यावरणपूरक फटाक्यांची निर्मिती करत होत्या. आता मात्र मोठ्या प्रमाणावर या फटाक्यांचं उत्पादन होऊ लागलं आहे. त्यामुळे सरकारमान्य नोंदणी (Govt. Registerd) असणाऱ्या दुकानांमध्ये हे फटाके मिळू शकतील.

हे फटाके सर्वसाधारण फटाक्यांपेक्षा थोडेसे महाग असतात. म्हणजे जे फटाके एरव्ही 250 रुपयांना मिळतात, त्याच प्रकारच्या ग्रीन फटाक्यांसाठी (Diwali with Green Crackers) सुमारे 400 रुपये खर्च करावे लागू शकतात.

हे वाचा - दिवाळीत फटाके फोडणार असाल तर सावधान; गृहमंत्रालयाने जाहीर केली नवी नियमावली

आपल्याला दिवाळी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करायची असेल, तर ग्रीन फटाक्यांचा पर्याय चांगला आहे. वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण न करणारे फटाके आपल्याला आणि मुख्य म्हणजे आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी पर्यावरण बिघडू देणार नाहीत. ग्रीन फटाके उडवून दिवाळीची नेहमीसारखी मजा लुटता येऊ शकेल. दिवाळी फटाकेमुक्त करण्यापेक्षा ग्रीन फटाके उडवून नेहमीसारखीच दिवाळी साजरी करणं चांगलं.

First published:

Tags: Diwali, Diwali 2021, Diwali-celebrations, Eco friendly Diwali, Lifestyle