जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / Cheque | चेकवर सही करण्याअगोदर या गोष्टी जाणून घ्या, अन्यथा होईल पश्चाताप

Cheque | चेकवर सही करण्याअगोदर या गोष्टी जाणून घ्या, अन्यथा होईल पश्चाताप

Cheque | चेकवर सही करण्याअगोदर या गोष्टी जाणून घ्या, अन्यथा होईल पश्चाताप

चेक किंवा धनादेश व्यवहार करण्यासाठी सुरक्षित माध्यम मानले जाते. मात्र, चेकचे प्रकार तुम्हाला माहित नसेल तर नुकसानसुद्धा होऊ शकते.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 फेब्रुवारी : तुम्ही बँकेचे व्यवहार करताना अनेकदा चेकचा वापर केला असेल. धनादेश किंवा चेक (Cheque) ही पेमेंटची लोकप्रिय पद्धत आहे. चेकने व्यवहार करणे सर्वात सुरक्षित मानले जाते. चेक हे बँकिंग प्रणालीचे एक असे साधन आहे, ज्याद्वारे एखादी व्यक्ती बँकेला एखाद्या विशिष्ट व्यक्तीला पैसे देण्याचे आदेश देते. ज्या व्यक्तीला पैसे द्यायचे आहेत, त्याचे नाव चेकमध्ये लिहावे लागते. यात एखाद्या व्यक्तीचे किंवा कंपनीचे नाव देखील नाव असू शकते. चेकमध्ये रक्कम लिहावी लागते, तसेच चेकच्या वरच्या बाजूला सही करणे आवश्यक असते. धनादेशाचे काही प्रकार आहे, यामुळे अनेकांचा गोंधळ होतो. आज आपण या संदर्भात माहिती घेऊ. स्थानिक चेक आणि आउटस्टेशन चेक Local Cheque and Outstation Cheque कोणताही धनादेश त्याच शहरात क्लिअर होत असेल तर त्याला स्थानिक चेक म्हणतात. दुसरीकडे शहराबाहेर नेऊन स्थानिक चेक क्लिअर केल्यास त्याला आउटस्टेशन चेक म्हटले जाते. आउटस्टेशन चेकसाठी बँकेकडून निश्चित शुल्क आकारले जाते. एट पार चेक At Par Cheque एट पार चेक संबंधित बँकेच्या देशभरातील सर्व शाखांमध्ये स्वीकारले जातात. या चेकची विशेष बाब म्हणजे बाहेरील शाखांमध्ये हा चेक क्लिअर करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. 1 लाख रुपयांपेक्षा कमी मूल्याच्या धनादेशांना सामान्य मूल्याचे धनादेश म्हणतात आणि 1 लाख रुपयांच्या वरच्या धनादेशांना उच्च मूल्याचे धनादेश म्हणतात. प्रिय व्यक्तींना भेट म्हणून दिलेल्या चेकला गिफ्ट चेक म्हणतात. गिफ्ट चेकची रक्कम 100 रुपयांपासून 10 हजार रुपयांपर्यंत असू शकते. HDFC Securities ची या टेक्सटाईल शेअरला BUY रेटिंग; चेक करा टार्गेट आणि स्टॉपलॉस पोस्ट डेटेड चेक Post Dated Cheque भविष्यातील तारखेसाठी जारी केलेल्या धनादेशांना पोस्ट डेटेड चेक म्हणतात. देशात पोस्ट-डेटेड चेकचा कालावधी 3 महिन्यांचा आहे. स्टॉल चेक Stale Cheque जर जारी केलेला धनादेश 3 महिन्यांनंतर वापरला गेला नाही तर अशा चेकला स्टॉल चेक म्हणतात. अँटी-डेटेड चेक Ante-dated Cheque अँटी-डेटेड चेक म्हणजे मुदत संपलेला चेक जो नंतर बँकेत जमा केला जातो. मात्र, हा धनादेश 3 महिन्यांच्या आत जमा करणे आवश्यक आहे. ओपन चेक  Open Cheque ओपन चेक हा चेकचा असा प्रकार आहे, जो बँकेत सादर करुन काउंटरवरच रोख रक्कम मिळवू शकतो. तुम्हाला क्लॅरेन्सची वाट पाहण्याची गरज नाही. ओपन चेक असलेली व्यक्ती काउंटरवर जाऊन चेक दाखवू देऊन पैसे घेऊ शकते किंवा पैसे त्याच्या खात्यात ट्रान्सफर करू शकते. ICICI बँक आणि SBI च्या खातेदारांसाठी आनंदाची बातमी! या योजनेत मिळणार जास्त फायदा बेअरर चेक Bearer Cheque बेअरर हा असा चेक आहे जो खातेदाराच्या कोणत्याही प्रतिनिधीने बँकेत जाऊन कॅश केला जाऊ शकतो. प्रतिनिधीला धनादेश देताना धनादेशावर मागे सही करण्याची गरज नसते. धनादेश देऊन पैसे काढले जाऊ शकतात. हा चेक जोखमीचा आहे. कारण, हा चेक विसरला तर कोणीही बँकेत जाऊन तो कॅश करू शकतो. क्रॉस चेक Crossed Cheque क्रॉस केलेला चेक एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या नावाने लिहिलेला असतो आणि त्यांच्यामध्ये वरच्या डाव्या बाजूला दोन समांतर रेषा काढल्या जातात “& CO.” or “Account Payee” or “Not Negotiable” असे लिहिले जाऊ शकते किंवा कोराही असू शकतो. या धनादेशातून कोणतेही रोख पैसे काढले जात नाहीत आणि संबंधित रक्कम केवळ नामनिर्देशित व्यक्ती/संस्थेच्या खात्यात असू शकते. आदेश चेक Order Cheque या चेकमध्ये bearer हा शब्द खोडला असतो आणि त्याच्या जागी order लिहिलेला आहे. यामध्ये, खुल्या धनादेशाप्रमाणे, कोणीही धनादेशाद्वारे त्याच्या खात्यात पैसे हस्तांतरित करू शकतो किंवा चेकच्या मागील बाजूस स्वाक्षरी करून इतर कोणत्याही व्यक्तीस अधिकृत करू शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात