मुंबई, 21 फेब्रुवारी : तुम्ही देखील आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) किंवा SBI चे खातेदार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी चांगली असू शकते. ICICI बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने त्यांच्या ग्राहकांसाठी FD च्या विशेष योजनांवर सूट दिली आहे. ICICI बँकेने मुदत ठेव योजनेतील गोल्डन इयर्स (Golden Years FD) FD मध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख वाढवली आहे. आयसीआयसीआय बँकेने आता या योजनेतील गुंतवणुकीची अंतिम तारीख 8 एप्रिल 2022 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी या योजनेत गुंतवणुकीची अंतिम तारीख 31 मार्च 2022 होती. त्याचवेळी, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने देखील वीकेअर (WeCare SBI) योजनेतील गुंतवणुकीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवली आहे. या दोन्ही बँकांच्या योजनांमध्ये बँकेच्या ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना सामान्य एफडीपेक्षा जास्त व्याजदर मिळतो. शेअर बाजारात घसरणीची मालिका सुरुच, Sensex 149 अंकांनी खाली, तर Nifty 17206 वर ICICI ची Golden Years FD काय आहे? आयसीआयसीआय बँकेने ज्येष्ठ नागरिक ग्राहकांसाठी गोल्डन इयर्स FD अंतर्गत एक विशेष योजना आणली आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना योजनेतील गुंतवणुकीवर सामान्य एफडीपेक्षा 0.75% अधिक व्याज मिळत आहे. बँकेकडून 5 ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 5.60% व्याज मिळत आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना या मुदतीच्या FD वर 6.35% वार्षिक व्याज मिळत आहे. या एफडीची ही विशेष योजना 2 कोटींच्या ठेवींवर 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी लागू आहे. SBI चा Wecare विशेष ठेव योजना काय आहे? स्टेट बँक ऑफ इंडियानेही आपल्या ग्राहकांसाठी Wecare विशेष ठेव योजनेतील गुंतवणुकीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी त्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 होती. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीच्या FD वर सामान्य FD पेक्षा 0.80% अधिक व्याज मिळत आहे. सध्या SBI FD वर कमाल 5.40% व्याज देत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.