मराठी बातम्या /बातम्या /explainer /

Explainer: जगभरातल्या बड्या व्यक्तींच्या गुप्त संपत्तीची माहिती उघड करणार Pandora Papers; काय आहे हे प्रकरण?

Explainer: जगभरातल्या बड्या व्यक्तींच्या गुप्त संपत्तीची माहिती उघड करणार Pandora Papers; काय आहे हे प्रकरण?

आता जगभरातल्या शोधपत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांच्या संघटनेनं ‘पँडोरा पेपर्स’ (what are Pandora Papers) नावानं जाहीर केलेल्या अहवालात जगभरातल्या शेकडो दिग्गजांच्या गुप्त खात्यांची माहिती दिली आहे.

आता जगभरातल्या शोधपत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांच्या संघटनेनं ‘पँडोरा पेपर्स’ (what are Pandora Papers) नावानं जाहीर केलेल्या अहवालात जगभरातल्या शेकडो दिग्गजांच्या गुप्त खात्यांची माहिती दिली आहे.

आता जगभरातल्या शोधपत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांच्या संघटनेनं ‘पँडोरा पेपर्स’ (what are Pandora Papers) नावानं जाहीर केलेल्या अहवालात जगभरातल्या शेकडो दिग्गजांच्या गुप्त खात्यांची माहिती दिली आहे.

नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर: अनेकदा आपण वाचतो, ऐकतो की एखाद्या व्यक्तीच्या घरी प्रचंड प्रमाणात रोख रक्कम सापडली. स्विस बँकेत अनेक बड्या भारतीयांनी पैसा ठेवल्याची चर्चा होत असते. अनेक नेते, उद्योजक, कलाकार आपली बेहिशेबी संपत्ती लपवून ठेवत असल्याची, परदेशात अनेक ठिकाणी त्यांची गुंतवणूक असल्याची चर्चा होत असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यावर परदेशात लपवून ठेवलेला काळा पैसा (Black Money) देशात परत आणण्याची घोषणा केली होती. त्यामुळे सर्वसामान्य जनतेत भ्रष्टाचार संपण्याची आशा निर्माण झाली होती. आता जगभरातल्या शोधपत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांच्या संघटनेनं ‘पँडोरा पेपर्स’ (what are Pandora Papers) नावानं जाहीर केलेल्या अहवालात जगभरातल्या शेकडो दिग्गजांच्या गुप्त खात्यांची माहिती दिली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

117 देशांतल्या 150 माध्यमांच्या 600 पत्रकारांचा समावेश असलेल्या इंटरनॅशनल कन्सोर्शियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट्स (International Consortium of Investigative Journalists) या संस्थेने नुकत्याच जाहीर केलेल्या एका अहवालात जगभरातले शेकडो राजकारणी, उद्योजक, धार्मिक नेते, सेलिब्रिटीज आदींनी लपवलेल्या अमाप संपत्तीची माहिती उघड करण्यात आली आहे. ‘पँडोरा पेपर्स’ म्हणून प्रसिद्ध झालेल्या या अहवालाने जगभरातल्या शेकडो श्रीमंत आणि भ्रष्ट व्यक्तींचे छुपे व्यवहार उघड केले आहेत. 14 कंपन्यांच्या जवळपास 1 कोटी 20 लाख फायलींच्या अभ्यासातून ही माहिती जगासमोर आणण्यात आली आहे. जगभरातल्या अनेक देशांच्या नेत्यांनी, उद्योजकांनी परदेशात स्थावर मालमत्तेसह (Properties) अन्य मालमत्तांमध्ये आपली संपत्ती गुंतवल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

Explainer: कोरियाने केलेली Hypersonic Missile ची चाचणी का आहे महत्त्वाची?

या अहवालात बेहिशेबी संपत्ती जमवणाऱ्या 330 हून अधिक विद्यमान आणि माजी राजकारण्यांचा उल्लेख असून, जॉर्डनचे राजे अब्दुल्ला (दुसरे), ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर, झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान आंद्रेज बाबिस, केनियाचे राष्ट्रपती उहुरू केन्याट्टा, इक्वेडोरचे राष्ट्रपती गिल्लेर्मो लासो, तसंच पाकिस्तान आणि रशिया या दोन्ही देशांच्या राष्ट्रपतींच्या सहायकांसह तुर्की बांधकाम क्षेत्रातले दिग्गज एरमन इलिकॅक आणि सॉफ्टवेअर उत्पादक कंपनी रेनॉल्ड्स आणि रेनॉल्ड्सचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रॉबर्ट टी. ब्रोकमन अशा अब्जाधीशांचा यात समावेश आहे. कर चुकवून (Tax) कोट्यवधी डॉलर्सची संपत्ती लपवण्यासाठी या लोकांनी ऑफशोअर खाती (Offshore Accounts) वापरली असल्याचं उघड झालं आहे.

हा अहवाल जाहीर झाल्यानंतर जगभरातल्या अनेक संस्थांनी सत्य उघडकीस आणल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. धर्मादाय कार्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या ब्रिटनमधल्या ऑक्सफॅम इंटरनॅशनल (Oxfam Internationl) या संस्थेनं 'पँडोरा पेपर्स'ची प्रशंसा केली असून, यामुळं आमचं हरवलेलं हॉस्पिटल कुठे आहे, हे लक्षात येतं असं 'ऑक्सफॅम'नं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. एखादा राजकारणी किंवा उद्योगपती दावा करतो, की त्याच्याकडे पैसे नाहीत तेव्हा त्याच्या पैशांचा शोध कुठे घ्यायचा हे आता आम्हाला कळलं आहे, असंही या संस्थेनं म्हटलं आहे.

Explainer: एका दिवसात विकलं तब्बल 8.1 टन सोनं; सामान्यांवर काय होणार परिणाम?

युरोपियन संसदेत ग्रीन पार्टीचे खासदार स्वेन गिगोल्ड यांनी ही माहिती सर्वसामान्य लोकांना जागृत करणारी ठरावी अशी अपेक्षा व्यक्त केली. जगभरातली कर चोरी जागतिक पातळीवर आर्थिक विषमतेला प्रोत्साहन देते. आता आपण त्याविरोधात वेगानं पावलं उचलण्याची गरज असल्याचं मत स्वेन गिगोल्ड यांनी व्यक्त केलं.

आता या अहवालानंतर यातल्या दोषींवर कारवाई होणार का, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.

First published: