मराठी बातम्या /बातम्या /explainer /

राष्ट्रपतींना किती मिळतो पगार? निवृत्तीनंतर काय आहेत फायदे? जाणून घ्या प्रथम नागरिकाचं आयुष्य

राष्ट्रपतींना किती मिळतो पगार? निवृत्तीनंतर काय आहेत फायदे? जाणून घ्या प्रथम नागरिकाचं आयुष्य

तुम्ही शाळेत असताना कदाचित ‘मी राष्ट्रपती झालो तर’ या विषयावर निबंध लिहिला असेल. देशाचा राष्ट्रपती (President of India) झाल्यावर आयुष्य कसं बदलतं याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

तुम्ही शाळेत असताना कदाचित ‘मी राष्ट्रपती झालो तर’ या विषयावर निबंध लिहिला असेल. देशाचा राष्ट्रपती (President of India) झाल्यावर आयुष्य कसं बदलतं याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

तुम्ही शाळेत असताना कदाचित ‘मी राष्ट्रपती झालो तर’ या विषयावर निबंध लिहिला असेल. देशाचा राष्ट्रपती (President of India) झाल्यावर आयुष्य कसं बदलतं याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

मुंबई, 29 जुलै : रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपला असून द्रौपदी मूर्मू  यांनी आता राष्ट्रपती पदाची (President Draupadi Murmu) सूत्रं आहेत.  देशाचे प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपतींचं आयुष्य कसं असतं याचा कधी विचार केलाय? तुम्ही शाळेत असताना कदाचित ‘मी राष्ट्रपती झालो तर’ या विषयावर निबंध लिहिला असेल. मात्र, तुम्हाला माहिती आहे, राष्ट्रपती झाल्यानंतर तुमचं आयुष्य (Life of India’s President) कसं असेल? तुम्हाला किती पगार मिळेल? किंवा मग राष्ट्रपती होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? याच गोष्टींबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

पात्रता

भारतीय संविधानानुसार, राष्ट्रपती होण्यासाठी काही अटींची पूर्तता (Eligibility to become India’s President) करणं आवश्यक आहे. या अटी पुढीलप्रमाणे :

1. राष्ट्रपती होणारी व्यक्ती ही भारताची नागरिक असावी. त्या व्यक्तीचे वय किमान 35 वर्षे पूर्ण असावं आणि ती व्यक्ती लोकसभेचा सदस्य म्हणून निवडणूक लढवण्यास पात्र असावी.

2. जर एखादी व्यक्ती केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा कोणत्याही स्थानिक प्रशासनात एखाद्या पदावर कार्यरत असेल, तर ती व्यक्ती राष्ट्रपती होण्यास अपात्र ठरते.

या अटींची पूर्तता केल्यास तुमचा अर्ज वैध ठरतो. यानंतर तुम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागतं. ही क्लिष्ट प्रक्रिया आहे. पण समजा, तुम्ही सर्व अडथळे पार करत ही निवडणूक जिंकला, आणि राष्ट्रपतिपदावर विराजमान झालात; तर तुमचं आयुष्य कसं असेल?

पगार

कोणतंही काम करायचं म्हटलं की, लोक सर्वांत आधी पगार (Salary of India’s President) विचारतात. राष्ट्रपती झाल्यानंतर तुम्हाला साधारपणपणे 5 लाख रुपये दरमहा एवढा पगार मिळेल. भारताच्या राष्ट्रपतींचा पगार हा प्रेसिडेंट्स अचिव्हमेंट अँट पेन्शन अ‍ॅक्ट 1951 या कायद्यानुसार ठरवला जातो. विशेष म्हणजे देशातील सर्वांत जास्त पगार मिळणारा सरकारी कर्मचारी हा राष्ट्रपती असतो. 2018 साली राष्ट्रपतींचा पगार 1,50,000 रुपयांवरुन 5,00,000 रुपये दरमहा करण्यात आला.

भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या अनुसूचीनुसार, भारताच्या राष्ट्रपतींचा पगार हा सुरुवातीला 10 हजार रुपये (100 अमेरिकी डॉलर्स) होता. त्यानंतर 1998 साली यात वाढ करून, तो 50,000 रुपये करण्यात आला. विशेष म्हणजे, पगाराव्यतिरिक्त राष्ट्रपतींना विविध प्रकारचे भत्तेदेखील मिळतात.

संसदेत सोनिया गांधी-स्मृती इराणींमध्ये जबरदस्त खडाजंगी, सुप्रिया सुळेंनी केली मध्यस्थी

राष्ट्रपतींचा पत्ता

राष्ट्रपती झाल्यानंतर तुमचा पत्ता हा राष्ट्रपती भवन, प्रेसिडेंट्स् इस्टेट, नवी दिल्ली, 110004 हा असेल. हे राष्ट्रपती भवन (Rashtrapati Bhawan) ब्रिटिश काळात भारताच्या व्हॉईसरॉयचं निवासस्थान म्हणून ओळखलं जात होतं. त्यासाठीच ते उभारण्यात आलं होतं.

राष्ट्रपती निवासस्थानाची (President’s residence) इमारत 1929 साली बांधून पूर्ण झाली. यामध्ये एकूण 340 खोल्या आहेत. यात रिसेप्शन हॉल, गेस्ट रूम, विविध ऑफिसेस यांचा समावेश आहे. शिवाय पूर्ण प्रेसिडेंशिअल इस्टेटमध्ये कित्येक गार्डन, मोकळे लॉन, बॉडीगार्ड आणि स्टाफ रेसिडेंस, घोड्यांचा तबेला, इतर ऑफिस आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत. संपूर्ण प्रेसिडेंशिअल इस्टेट ही 320 एकरांत पसरली आहे.

राष्ट्रपती भवनाच्या वेबसाईटनुसार, “सर एडविन लुटेन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी या इमारतीची उभारणी केली. या इमारतीच्या H आकाराच्या डिझाईनचे श्रेय सर लुटेन्स यांना जातं. ही इमारत एकूण 5 एकर परिसरात पसरली आहे.” सामान्य नागरिकांसाठी ही इस्टेट (President’s Estate) काही दिवसांसाठी खुली केली जाते. यावेळी नागरिक राष्ट्रपती भवनाला भेट देऊ शकतात. मात्र, तुम्ही राष्ट्रपती झालात तर तुम्हाला इथं रहायलाच मिळेल.

India@75: अशा 10 भारतीय महिला शास्त्रज्ञ, ज्यांनी आपल्या कामानं जगाला केलं अचंबित

दोन व्हेकेशन रिट्रीट

राष्ट्रपती भवनात पूर्ण वर्ष काम करणं कदाचित कंटाळवाणं ठरू शकतं. मात्र, चिंता करू नका. तुम्हाला वर्षातून दोन व्हेकेशन रिट्रीट (President Vacation Retreat) देखील मिळतात. यातील एक देशाच्या उत्तर भागात, तर दुसरी देशाच्या दक्षिण भागात आहे.

1. दी रिट्रीट बिल्डिंग, माशोब्रा, शिमला

माशोब्राच्या टेकडीवर असलेल्या दी रिट्रीट या इमारतीत राष्ट्रपती वर्षातून किमान एकदा तरी जातात. या वेळी त्यांचे ऑफिसदेखील या ठिकाणी शिफ्ट होते. शिमला रिज टॉपपेक्षा हजारो फूट उंचीवर नयनरम्य अशा वातावरणात दी रिट्रीट उभारलं आहे. ही इमारत म्हणजे स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. ही इमारत आणि भोवतालचे निसर्गसौंदर्य यामुळे दी रिट्रीट हे शिमल्यातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ बनलं आहे.

2. बोलारम, हैदराबाद: राष्ट्रपती निलयम

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बोलारम येथील राष्ट्रपती निलयम ही इमारत हैदराबादच्या निजामाकडून ताब्यात घेऊन राष्ट्रपती सचिवालयाकडे सुपूर्द करण्यात आली. 1860 साली बांधलेली ही इमारत एकूण 90 एकरांत पसरली आहे. या एकमजली इमारतीत एक डायनिंग हॉल, सिनेमा हॉल, दरबार हॉल, मॉर्निंग रूम आणि डायनिंग रूम आहे. देशाचे राष्ट्रपती वर्षातून एकदा तरी या ठिकाणी रहायला जातात. शिमल्याप्रमाणेच राष्ट्रपती या ठिकाणाहून काम करतात.

प्रवास कसा करतात

राष्ट्रपतींना प्रवासासाठी अगदी अद्ययावत असं वाहन (Indian President’s Vehicle) मिळतं. गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी त्यांच्या गाडीचे मेक, मॉडेल आणि रजिस्ट्रेशन नंबर ही माहिती उघड केली जात नाही. विशेष म्हणजे राष्ट्रपतींच्या गाडीला नंबर प्लेटही नसते. त्याऐवजी तिथे भारताची राजमुद्रा – अशोकस्तंभ असतो.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना 2021 च्या जानेवारीमध्येच नवीन गाडी मिळणार होती, मात्र कोरोना महामारीमुळे तेव्हा हे शक्य झालं नाही. अखेर 15 ऑगस्टला त्यांना मर्सिडीज मेबॅक S600 पुलमन गार्ड ही गाडी (Ramnath Kovind Car) मिळाली. कारब्लॉग इंडियाच्या रिपोर्टनुसार ही गाडी अगदी सुरक्षित आहे. VR-9 लेव्हलचे बॅलिस्टिक प्रोटेक्शन, 0.44 कॅलिबर पर्यंतच्या हँडगनचा मारा, मिलिट्री रायफल शॉट, बॉम्ब हल्ले, स्फोटके, गॅस हल्ला अशा कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याचा यावर काहीही परिणाम होत नाही.

राष्ट्रपतींच्या ताफ्यात मर्सिडीज मेबॅकसोबतच इतर गाड्यांचाही समावेश असतो. माजी राष्ट्रपतींची ब्लॅक मर्सिडीज-बेंझ आर्मर्ड लिमोझीन हीदेखील राष्ट्रपतींसाठी पर्यायी वाहन म्हणून उपलब्ध असते. यापूर्वीच्या राष्ट्रपतींनी कॅडिलॅक, रोल्स रॉयस अशा गाड्याही वापरल्या आहेत.

पतीच्या मृत्यूनंतर दुसरं लग्न करणाऱ्या महिलांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे अधिकार

राष्ट्रपतींची सुरक्षा

राष्ट्रपतींची सुरक्षा ही पीबीजीची (The President’s Bodyguard) जबाबदारी असते. पीबीजी ही भारतीय लष्कराचे सर्वात वरिष्ठ आणि सर्वात जुने युनिट आहे. हे जगातील एकमेव घोडेस्वार सैन्य युनिट आहे. शांततेच्या काळात पीबीजी एक औपचारिक युनिट म्हणून काम करते, मात्र त्यातील अधिकारी हे प्रशिक्षित पॅराट्रूपर्स असल्यामुळे युद्धकाळात देखील त्यांना तैनात केले जाऊ शकते.

निवृत्तीनंतर काय?

निवृत्तीनंतरही (Indian President benefits after retirement) देशाच्या राष्ट्रपतींना बरेच फायदे मिळतात. डीएनएने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, राष्ट्रपतींना निवृत्तीनंतर दरमहा 1.5 लाख रुपये पेन्शन मिळते. राष्ट्रपतींना राहण्यासाठी एक फुल-फर्निश्ड रेंट-फ्री बंगला (type VIII) मिळतो. दोन मोफत लँडलाईन फोन आणि एक मोबाईल फोन देण्यात येतो. पाच खासगी सहाय्यक मिळतात, ज्यांचा वार्षिक खर्च 60 हजार रुपये असतो. शिवाय एका व्यक्तीसोबत मोफत रेल्वे आणि विमान प्रवासाची सुविधा देखील मिळते.

First published:

Tags: Explainer, President