मराठी बातम्या /बातम्या /explainer /

यंदाची Miss Universe हरनाज संधू! तुम्हालाही मिळवायचा आहे मान? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं

यंदाची Miss Universe हरनाज संधू! तुम्हालाही मिळवायचा आहे मान? तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं

यंदाच्या मिस युनिव्हर्स 2021 (Miss Universe 2021) स्पर्धेच्या विजेतेपदाचा मान भारताला मिळाला आहे. 21 वर्षीय हरनाझ संधू (Harnaaz Sandhu as Miss Universe 2021) हिने हा किताब मिळवला. तब्बल 21 वर्षांनंतर पुन्हा हा मुकूट देशाला मिळाला आहे. जर तुमचंही मिस इंडिया, मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स होण्याचं स्वप्न असेल तर आधी जाणून घ्या तुम्ही मॉडेलिंगमध्ये करिअर कसं करू शकता.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 13 डिसेंबर: यावर्षीची सर्वात मोठी सौंदर्य स्पर्धा इस्रायलमध्ये पार पडली. या मिस युनिव्हर्स 2021 (Miss Universe 2021) स्पर्धेच्या विजेतेपदाचा मान भारतला मिळाला आहे. 21 वर्षीय हरनाझ संधूच्या (Harnaaz Sandhu as Miss Universe 2021) रुपात तब्बल 21 वर्षांनंतर देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. जर तुम्ही मिस इंडिया, मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स बनण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुम्हाला मॉडेलिंगमधील बारकावे जाणून घेणे आवश्यक आहे. आज मॉडेलिंगचे जग खूप बदलले आहे. यामध्ये नाव आणि प्रसिद्धीसोबत पैसाही कमी नाही. यामुळेच आज अनेक तरुण या क्षेत्रात आपले करिअर करण्यासाठी धडपडत आहेत. जर तुम्ही मॉडेलिंगच्या जगात करिअर करण्याचा विचार केला असेल, तर आधी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

मॉडेलिंगचे प्रकार माहीत आहेत का?

  • टेलिव्हिजन मॉडेलिंग: यामध्ये तुम्हाला मूव्ही कॅमेऱ्यांसमोर मॉडेलिंग करावे लागते. जे टीव्ही जाहिराती, चित्रपट, व्हिडिओ, इंटरनेटमध्ये वापरले जाते.
  • प्रिंट मॉडेलिंग: यामध्ये, स्टिल फोटोग्राफर मॉडेल्सची छायाचित्रे घेतात, जी वर्तमानपत्रे, ब्रोशर, मासिके, कॅटलॉग, कॅलेंडर इत्यादींमध्ये वापरली जातात.
  • शोरूम मॉडेलिंग: शोरूम मॉडेल सामान्यत: निर्यातदार, वस्त्र उत्पादक आणि मोठ्या किरकोळ विक्रेत्यांसाठी काम करताना फॅशन प्रदर्शित करतात.
  • रॅम्प मॉडेलिंग : यामध्ये मॉडेल्सना रॅम्पवर चालताना आधुनिक फॅशनची झलक दाखवावी लागते. हे प्रदर्शन, फॅशन शो किंवा शोरूम देखील असू शकते. रॅम्प मॉडेलसाठी चांगले उभे राहणे, चालण्याची शैली आणि देहबोली असणे महत्त्वाचे आहे.

मॉडेलिंग क्षेत्रात येण्यासाठी पात्रता?

मॉडेलिंग क्षेत्रात येण्यासाठी कोणतीही विशेष पात्रता असणे आवश्यक नाही. होय, या क्षेत्रातील उंची मुलींसाठी 5 फूट 7 इंच आणि मुलांसाठी 5 फूट 10 इंच आहे. यासोबतच तुम्ही कोणत्याही मॉडेलिंग संस्थेतून प्रशिक्षण घेतले असेल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. 12 वी नंतर तुम्ही थेट या क्षेत्रात प्रवेश घेऊ शकता.

Miss Universe 2021: हरनाज संधूने मानले देशवासियांचे आभार, म्हणाली...

कोणते गुण असावेत?

मॉडेलिंगसाठी चेहरा फोटोजेनिक असावा. सुरुवातीला फोटो पाहून मॉडेल्स निवडले जातात. त्यानंतर रॅम्पवर उतरण्यापूर्वी तुम्हाला अनेक परीक्षांना सामोरे जावे लागते. यामध्ये व्यक्तिमत्त्वाची विशेष चाचणी घेतली जाते. चांगली उंची, फिटनेस, फिगर आणि सुंदर चेहरा असण्यासोबतच 'प्लीजिंग' आणि 'हसतमुख व्यक्तिमत्त्व' असणं महत्त्वाचं आहे. मॉडेलिंग दरम्यान तुमची प्रत्येक शैली तपासली जाते.

अशी सुरुवात करा

शाळा-कॉलेजमध्ये आयोजित मिस्टर फ्रेशर, मिस्टर कॉलेज, मिस कॅम्पस यासारख्या छोट्या सौंदर्य स्पर्धांपासून सुरुवात करू शकता. येथे तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व चमकण्याची संधी मिळू शकते. तसेच, मॉडेलिंग म्हणजे केवळ सुंदर दिसणे असं नाही, यासाठी प्रत्येक क्षेत्राचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. इथं 'प्रेझेन्स ऑफ माइंड'ही महत्त्वाचं आहे.

पोर्टफोलिओ आवश्यक

मॉडेलिंगसाठी सर्व प्रथम पोर्टफोलिओ आवश्यक आहे. चांगला फोटोग्राफर असा फोलिओ तयार करुन देतात. यासाठी सुमारे 20 हजार रुपये खर्च येऊ शकतो. प्रोफेशनल मॉडेल होण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतात, हे लक्षात असुद्या.

21 वर्षांनंतर भारताला 'Miss Universe'चा किताब, हरनाज कौर संधूनं पटकावलं विजेतेपद

मॉडेलिंग ही एक कला

मॉडेलिंग ही एक कला असून ती कोणत्याही संस्थेद्वारे विशिष्ट पद्धतीने शिकवली जाऊ शकत नाही. मॉडेल होण्यासाठी जन्मापासूनच मॉडेलिंगचे गुण असणे अत्यंत आवश्यक आहे, तर मॉडेलिंगचे अनेक अभ्यासक्रम हे गुण सुधारण्यास मदत करू शकतात.

मॉडेलिंगचे भविष्य

मॉडेलिंग इंडस्ट्रीत सौंदर्य स्पर्धेला विशेष स्थान आहे. पूर्वी फेमिना मिस इंडिया स्पर्धा होत असत, आता ग्रासिम मिस्टर इंडिया, ग्लॅडरॅग्स, मिसेस इंडिया, मेट्रोपॉलिटन टॉप मॉडेल यासारख्या राष्ट्रीय स्पर्धांव्यतिरिक्त, मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स, मिस इंडिया, एशिया पॅसिफिक, ग्रासिम मिस्टर इंटरनॅशनल यासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर मॉडेल्ससाठी अनेक संधी नेहमीच खुल्या असतात.

ठराविक वेळेतच 'मॉडेलिंग'ची सुरुवात करा

मॉडेलिंग हा एक असा व्यवसाय आहे, जो वेळेत करणे योग्य आहे. कारण विशिष्ट वय आणि वेळेपर्यंतच तुम्ही मॉडेलिंग करू शकता.

First published:

Tags: Beauty queen, Beauty tips, Miss india