मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

21 वर्षांनंतर भारताला 'Miss Universe'चा किताब, हरनाज कौर संधूनं पटकावलं विजेतेपद

21 वर्षांनंतर भारताला 'Miss Universe'चा किताब, हरनाज कौर संधूनं पटकावलं विजेतेपद

Miss Universe 2021: मिस युनिव्हर्स 2021 (Miss Universe 2021)  मध्ये भारताने मोठी कामगिरी केली आहे.

Miss Universe 2021: मिस युनिव्हर्स 2021 (Miss Universe 2021) मध्ये भारताने मोठी कामगिरी केली आहे.

Miss Universe 2021: मिस युनिव्हर्स 2021 (Miss Universe 2021) मध्ये भारताने मोठी कामगिरी केली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 13 डिसेंबर: मिस युनिव्हर्स 2021 (Miss Universe 2021) मध्ये भारताने मोठी कामगिरी केली आहे. या स्पर्धेत भारतीय तरुणी हरनाज कौर संधूनं 70 वा मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारतानं 21 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हे विजेतेपद पटकावलं आहे.

सोमवारी सकाळी इस्रायलमधील इलात येथे आयोजित 70व्या मिस युनिव्हर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारताची हरनाज कौर प्रथम क्रमांक मिळवून मिस युनिव्हर्स 2021 बनली आहे. हरनाजच्या आधी 1994 मध्ये सुष्मिता सेननं आणि 2000 मध्ये लारा दत्ता यांनी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता.  भारताने आता तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावलं आहे.

तिला गेल्या वर्षीची मिस युनिव्हर्स मेक्सिकोचा मुकुट अँड्रिया मेझानं मुकुट घातला. पॅराग्वेची 22 वर्षीय नादिया फरेरा दुसरं, तर दक्षिण आफ्रिकेची 24 वर्षीय लालेला मसवाने तिसरं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम प्रश्नोत्तराच्या सत्रादरम्यान, संधूला विचारण्यात आले की, तरुणींना त्या आजच्या दडपणाचा सामना कसा करायचा याविषयी ती काय सल्ला देईल.

संधूनं काय दिलं उत्तर?

उत्तर देताना संधू म्हणाली, आजच्या तरुणाईवर सर्वात मोठा दबाव आहे तो म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. स्वतःची इतरांशी तुलना करणे थांबवा आणि जगभरात घडणाऱ्या अधिक महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोला. स्वतःसाठी बोला कारण तुम्ही तुमच्या जीवनाचे नेते आहात, तुम्हीच तुमचा आवाज आहात. माझा स्वतःवर विश्वास होता आणि म्हणूनच मी आज इथे उभी आहे.

मिस युनिव्हर्स 2021 हरनाज संधू कोण आहे?

हरनाज चंदीगड येथील रहिवाशी असून ती एक मॉडेल आहे.  ती सध्या पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये एमए करत आहे.  तिचा जन्म शीख कुटुंबात झाला. हरनाज ही फिटनेस आणि योग प्रेमी आहे. 2017 मध्ये हरनाजने मिस चंदीगडचा किताब जिंकला होता. एका वर्षानंतर, 2018 मध्ये, हरनाजला मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया 2018 चा मुकुट देण्यात आला. दोन प्रतिष्ठित शीर्षके जिंकल्यानंतर, हरनाझने मिस इंडिया 2019 मध्ये भाग घेतला, जिथे तिने टॉप 12 मध्ये स्थान मिळवले. संधूने 2017 मध्ये टाइम्स फ्रेश फेस जिंकला.  वयाच्या 17 व्या वर्षी चंदीगडचे प्रतिनिधित्व केलं. नंतर तिने LIVA मिस दिवा युनिव्हर्स 2021 चा किताब जिंकला.

हरनाजला चित्रपटांमध्ये रस

मिस युनिव्हर्स 2021 स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी हरनाझने चित्रपटांमध्येही तिचे स्थान निश्चित केले आहे. संधूने काही पंजाबी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.  'बाई जी कुटंगे' आणि 'यारा दियां पू बरन' हे दोन पंजाबी चित्रपट आहेत, जे पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत.

First published:

Tags: Bollywood News