मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Miss Universe 2021: हरनाज संधूने मानले देशवासियांचे आभार, म्हणाली...

Miss Universe 2021: हरनाज संधूने मानले देशवासियांचे आभार, म्हणाली...

Harnaaz Sandhu as Miss Universe 2021

Harnaaz Sandhu as Miss Universe 2021

मिस युनिव्हर्स 2021 (Miss Universe 2021) किताब पटकवल्यानंतर हरनाज संधूने देशवासियांचे आभार मानले आहेत.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 13 डिसेंबर: यावर्षीची सर्वात मोठी सौंदर्य स्पर्धा इस्रायलमध्ये पार पडली. या मिस युनिव्हर्स 2021 (Miss Universe 2021) स्पर्धेच्या विजेतेपदाचा मान भारतला मिळाला आहे. 21 वर्षीय हरनाझ संधूच्या(Harnaaz Sandhu as Miss Universe 2021) शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे. हा किताब पटकावल्यानंतर हरनाज संधूने देशवासियांचे आभार मानले आहेत.

मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यानंतर हरनाज संधू व्हिडिओद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. यामध्ये तिने भारतातील सर्व जनतेचे आणि पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले आहे. ती म्हणाली, “मला मार्गदर्शन आणि पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्वशक्तिमान, माझे पालक आणि मिस इंडिया संस्थेची खूप आभारी आहे. ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि मुकुटाच्या शुभेच्छा दिल्या त्या प्रत्येकाला खूप प्रेम. 21 वर्षांनंतर भारताचा गौरवशाली मुकुट परत आणणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.'' अशी भावना तिने यावेळी व्यक्त केली.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हरनाज मिस युनिव्हर्स 2021 चा मुकुट परिधान करताना दिसत आहे. ती एकदम खुश दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणते, “नमस्ते, सत श्री अकाल, पहिल्या दिवसापासून माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल तुम्हा प्रत्येकाचे आभार. आता विश्व वाचवण्याची वेळ आली आहे. चला एकत्र बचत करूया. धन्यवाद आणि तुझ्यावर प्रेम" असेही हरनाजने म्हटले आहे.

चंदीगड येथील मॉडेल, जो पब्लिक एडमिनिस्ट्रेशन येथे एमएचे शिक्षण घेत आहे. तिला गेल्या वर्षीची मिस युनिव्हर्स मेक्सिकोचा मुकुट अँड्रिया मेझाने घातला होता. पॅराग्वेची 22 वर्षीय नादिया फरेरा दुसऱ्या, तर दक्षिण आफ्रिकेची 24 वर्षीय लालेला मसवाने तिसऱ्या स्थानावर आहे.

'...तूच तुझा आवाज आहेस', सर्वच महिलांनी ऐकावा Miss Universe 2021 चा हा सल्ला

या उत्तरामुळे पटकावला मिस युनिव्हर्स 2021 चा मुकुट

टॉप 3 फेरीचा एक भाग म्हणून, स्पर्धकांना विचारण्यात आले, 'तरुण महिलांनी आजच्या काळात येणाऱ्या दबावांना कसे सामोरे वे याविषयी तुम्ही काय सल्ला द्याल?'

यावर हरनाझ म्हणाली की, 'आजच्या तरुणाईवर सर्वात मोठा दबाव आहे तो म्हणजे स्वत:वर विश्वास ठेवणे. तुम्ही अद्वितीय आहात हे समजून घेणे तुम्हाला सुंदर बनवते. इतरांशी तुमची तुलना करणे थांबवा आणि जगभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलूया. बाहेर या, स्वत:साठी बोला, कारण तुम्ही तुमच्या जीवनाचे नेतृत्त्व आहात. तुम्ही तुमचा आवाज आहात. माझा स्वतःवर विश्वास होता आणि म्हणूनच मी आज इथे उभी आहे.'

First published: