नवी दिल्ली, 19 जून : देशात सध्या अग्निपथ योजनेवरुन (Agnipath scheme) गोंधळ सुरू आहे. अनेक राज्यात याविरोधात आंदोलने केली जात आहेत. काही ठिकाणी याला हिंसक वळण लागल्याचेही पाहायला मिळाले. यात रेल्वे, बसेससह सार्वजनिक मालमत्ता बळी पडली आहे. सरकार मात्र या योजनेवर ठाम असल्याचे दिसत आहे. यानिमित्ताने भारतीय लष्कर आणि जगभरातील शक्तीशाली सैन्याची माहिती घेऊया. कोणत्याही देशाच्या सुरक्षेचा आधार त्या देशाचे सैन्य असते. लष्कर मजबूत असेल तर देशावर कोणत्याही बाह्य हल्ल्याचा धोका राहणार नाही. दरवर्षी अर्थसंकल्पाचा मोठा भाग लष्कराला सुधारण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी खर्च केला जातो. लष्करासाठी अत्याधुनिक शस्त्रे आणि तंत्रज्ञान जमा करणे ही देशाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. भारतीय सैन्य हे जगातील चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे, भारत देखील दरवर्षी आपल्या सैन्याला मजबूत करण्यासाठी बजेटचा मोठा हिस्सा खर्च करतो. यावर तुमच्या मनात प्रश्न असेल की जगातील नंबर 1 आणि नंबर 2 सैन्य कोण आहेत? या लेखाद्वारे जाणून घेऊया जगातील टॉप 10 सर्वात शक्तिशाली सेना कोणती आहेत. जगातील दहा सर्वात शक्तिशाली सैन्य Top 10 Army अमेरिका जगातील सर्वात मोठी शक्ती असलेल्या ‘युनायटेड स्टेट्स’कडे जगातील सर्वात शक्तिशाली सैन्य आहे. जर आपण शक्तीबद्दल बोललो तर 2021 मध्ये अमेरिकेकडे 104 दशलक्ष सैनिक होते. आकडेवारीनुसार, यूएस सरकारने 2019 मध्ये आपल्या सैन्यावर 693 अब्ज अमेरिकी डॉलर खर्च केले. रशिया एका माहितीनुसार, रशियाकडे 12,950 रणगाडे आहेत, जे अमेरिकेच्या रणगाड्यांपेक्षा दुप्पट आहेत. रशियाकडे 900,000 सक्रिय सैन्य आणि 4,100 पेक्षा जास्त विमाने आहेत. या सर्व गुणांमुळे रशियन सैन्य जगातील दुसरे सर्वात शक्तिशाली सैन्य बनते. चीन जगातील सर्वाधिक लष्करी मनुष्यबळ असलेला देश चीन ताकदीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. चीनकडे अमेरिका आणि रशियानंतर सर्वात जास्त रणगाडे आणि पाणबुड्यांचा ताफा आहे. अमेरिका, इस्रायल, रशियासह अनेक देशांत Agnipath योजना, पण, नियमांत मोठा फरक भारत भारतात अंदाजे 1,444,000 सक्रिय लष्करी कर्मचारी आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीरवरून बराच काळ वाद सुरू आहे. जगातील चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय लष्कराकडे सर्वाधिक रणगाडे (4,292) आणि सर्वाधिक लढाऊ (538) आहेत.
जपान हे सैन्य केवळ अंतर्गत सुरक्षेसाठी असले तरी जपानी सैन्य हे जगातील पाचव्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य मानले जाते. चीन, रशिया आणि अमेरिकेनंतर जपानकडे लढाऊ हेलिकॉप्टरचा जगातील चौथा मोठा ताफा आहे. दक्षिण कोरिया दक्षिण कोरियाकडे मोठ्या प्रमाणात पाणबुडी, प्राणघातक हेलिकॉप्टर आणि बाह्य हल्ल्यांना तोंड देण्यासाठी सक्रिय लष्करी कर्मचारी आहेत. हे सैन्य जगातील सहाव्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे. “ही तर फक्त सुरुवात, येत्या काही वर्षांमध्ये सव्वा लाख अग्निवीरांची होणार भरती”; तीनही दलांच्या प्रमुखांची माहिती फ्रान्स लष्करी कर्मचार्यांच्या बाबतीत फ्रान्स लहान आहे. परंतु, फ्रेंच सैन्य हे उच्च प्रशिक्षित आणि प्रोफेशनली ट्रेंड सैन्य आहे. फ्रान्समध्ये 118,600 सक्रिय लष्करी कर्मचारी आहेत.
इटली इटालियन सैन्य हे लष्कर, हवाई दल, नौदल आणि काराबिनेरी या चार सैन्यांचे बनलेले आहे. 341,250 संख्या असलेल्या या सेनेमध्ये 165,500 लोक आर्मी, एअर फोर्स आणि नेव्हीमध्ये सेवा देत आहेत. युनायटेड किंगडम ब्रिटीश सैन्य, जगातील नवव्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली सैन्य, सध्या 82,040 नियमित पूर्णवेळ कर्मचारी तसेच 3,960 गुरखा आणि 29,740 राखीव कर्मचारी आहेत. तुर्की तुर्की सैन्य हे पूर्व भूमध्यसागरीय सैन्यांपैकी सर्वात शक्तीशाली आहे. क्रेडिट सुईसच्या यादीतील फक्त पाच देशांकडे तुर्कीपेक्षा जास्त पाणबुड्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.