मुंबई, 19 जून: केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेचा (Agnipath scheme) मुद्दा चांगलाच तापतो आहे. त्यात आता देशभरात याच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. त्यात सरकारतर्फे तरुणांच्या समस्या सोडवण्याचं काम सुरू आहे. अग्निपथ योजनेबाबत लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव लेफ्टनंट जनरल अनिल पुरी यांनी पत्रकार परिषद (Indian Army Press conference on Agnipath) घेऊन आढावा बैठकीची माहिती दिली. अग्निपथ योजनेद्वारे आम्हाला देशाच्या तिन्ही सैन्यात तरुणाई आणि अनुभव यांचा चांगला मिलाफ आणायचा आहे. आज मोठ्या संख्येने जवान 30 च्या पुढे आहेत आणि अधिकाऱ्यांना पूर्वीपेक्षा खूप उशीरा कमांड मिळत आहे. लष्कराचे वय कमी करणे हे आमचे प्राधान्य आहे. भारताच्या तिन्ही सैन्यात संवेदना आणि उत्साह यांचा चांगला मिलाफ असावा, अशी आमची इच्छा आहे. तब्बल 60,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; ‘या’ महापालिकेत जॉबची संधी सोडूच नका
अग्निवीरांना’ सियाचीन आणि इतर भागात तैनाती करताना तोच भत्ता मिळेल जो सध्या सेवा बजावत असलेल्या नियमित सैनिकांना लागू आहे. सेवेच्या बाबतीत अग्निवीरांसाठी कोणताही भेदभाव केला जाणार नाही. पुढील 4-5 वर्षांत आम्ही (सैनिक) 50-60,000 भरती करू आणि नंतर ते 90,000 ते 100000 पर्यंत वाढवू असंही त्यांनी म्हंटल आहे.
योजना मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही भारतीय सशस्त्र दलाच्या या योजनेची नितांत गरज आहे, त्यामुळे ती मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात, तिन्ही सेवांमध्ये अधिका-यांच्या दर्जापेक्षा कमी असलेल्या सर्व भरती केवळ ‘अग्निपथ योजने’द्वारेच केल्या जातील. सव्वा लाख भरती होणार योजनेचे विश्लेषण करण्यासाठी आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही पहिल्या वर्षी 46,000 भरती करून छोटी सुरुवात केली आहे. नजीकच्या भविष्यात आमचा ‘अग्नीवीर’ संख्या 1.25 लाखांपर्यंत पोहोचेल. देशसेवेत बलिदान देणाऱ्या अग्निवीरला एक कोटी रुपयांची भरपाई मिळणार आहे. MBBS नंतर आयुर्वेदलाच राज्यातील विद्यार्थ्यांची पसंती; होमिओपॅथीकडेही वाढला कल
24 जूनपासून सुरू होईल ऑनलाइन प्रोसेस
भारतीय हवाई दलाचे अधिकारी एअर मार्शल एसके झा म्हणाले, अग्निवीर बॅच क्रमांक 1 नोंदणी प्रक्रिया 24 जूनपासून सुरू होईल आणि पहिला टप्पा ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया 24 जुलैपासून सुरू होईल. पहिल्या बॅचची डिसेंबरपर्यंत नोंदणी केली जाईल आणि 30 डिसेंबरपर्यंत प्रशिक्षण सुरू होईल. अग्निपथ योजनेबद्दल, भारतीय नौदलाचे व्हाइस अॅडमिरल दिनेश त्रिपाठी म्हणाले की, या वर्षी 21 नोव्हेंबरपासून पहिले नौदल ‘अग्नीवीर’ प्रशिक्षण प्रतिष्ठान आयएनएस चिल्का, ओडिशा येथे पोहोचण्यास सुरुवात होईल.