टोंगा, 18 जानेवारी : ज्वालामुखी (Volcano) हा निसर्गाच्या अशा घटनांपैकी एक आहे, ज्याचा प्रभाव दूरवर होऊ शकतो. सहसा असे उद्रेक कमी होतात पण ते कधीच होणार नाहीत असे नाही. गेल्या आठवड्याच्या शेवटी असाच ज्वालामुखीचा उद्रेक पॅसिफिक महासागरातील टोंगाजवळच्या (Tonga) समुद्रात झाला होता, ज्याचे पडसाद जगभर दूरवर उमटले होते. त्यामुळे निर्माण होणारे भूकंपाचे धक्के 12 हजार किलोमीटर दूर भारतातील चेन्नई येथेही जाणवले. याचा आपल्या देशावर काय परिणाम होऊ शकतो?
कधी दिसला प्रभाव?
शनिवारी ही घटना घडल्यानंतर दहा तासांनंतर, भारतीय वेळेनुसार रात्री 8.15 वाजता, वातावरणाचा दाब काही काळासाठी अचानक 2 हेक्टा पास्कल इतका वेगाने वाढला. समुद्रात ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याची घटना 16 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 10.15 वाजता घडली. त्यामुळे धोक्याची भीती निर्माण झाली आहे.
प्रशांत महासागर आवाज
या स्फोटामुळे प्रशांत महासागराच्या किनारी देशांमध्ये वेगवेगळ्या तीव्रतेच्या त्सुनामीच्या लाटा निर्माण झाल्या. याशिवाय 2500 किमी दूर न्यूझीलंडमध्ये अनेक ठिकाणी या स्फोटाचे आवाजही ऐकू आले आहेत. त्याचवेळी 9500 किमी अंतरावर असलेल्या अमेरिकेच्या अलास्का ज्वालामुखी वेधशाळेत भूकंपाचे धक्के जाणवत असताना मंद आवाज ऐकू आला.
वेगळेपण काय?
अलास्का वेधशाळेतील शास्त्रज्ञांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "स्फोटाची तीव्रता पाहता खूप मोठा सिग्नल दिसणे ही आश्चर्याची गोष्ट नाही. पण त्याचा आवाज ज्या पद्धतीने ऐकायला आला तो खूप अनोखा आहे. जरी हा आवाज भारतात ऐकू आला नाही. मात्र, वातावरणाच्या दाबात वेगाने बदल झाला.
रशियन शास्त्रज्ञांचं 'ग्रहांवरील मानवाच्या एकाकीपणावर' संशोधन
भारतात पहिल्यांदा चेन्नईत संकेत
आयआयटी मद्रासचे (IIT Madras) PHD स्कॉलर, एस वेंटरमन (S Venterman) त्यांच्या घरी बसवलेल्या एका लहान हवामान केंद्रावर काम करत असताना, चुकून त्यांच्या बॅरोमेट्रिकमध्ये हे चढउतार लक्षात आले जे 1012.5 ते 1.014.5 hPa दरम्यान होते. त्यांनी सांगितले की हे खूप विचित्र होत, मला सुरुवातीला वाटले की माझ्या डिव्हाइसमध्ये काही समस्या आहे.
चेन्नई ते बंगलोर
जरी हा प्रभाव अगदी थोडावेळ जाणवला पण अचानक होता. निरीक्षण लहरी आणि अतिशय संथ स्वरुपात होतं. वेगवान वाढ आणि घसरण असामान्य होती. वेंकटरमन यांनी ताबडतोब चेन्नईतील त्यांच्या सक्रिय हवामान ब्लॉगिंग समुदायाला याची माहिती दिली आणि बंगळुरूशीही संपर्क साधला, जिथे अशीच निरीक्षणे आढळून आली, जी 20 मिनिटांच्या अंतरानंतर तिथे पोहोचली.
चेन्नई हवामान केंद्रावर लाटा पोहणार?
यानंतरच वेंकटरामन यांना पुष्टी मिळाली की हे सर्व टोंगा येथील ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे झाले आहे. त्यांच्या मते या लाटा 10 तासांनंतर ताशी 1200 किलोमीटर वेगाने चेन्नईला पोहोचू शकतात. चेन्नईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रादेशिक चक्रीवादळ चेतावणी केंद्राचे संचालक एन पुविरासन यांनी सांगितले की त्यांच्या कर्मचार्यांनी त्याच वेळी वातावरणातील दाबातील या बदलाची माहिती दिली होती.
Mutations | म्यूटेशनच्या नवीन संशोधनाने डार्विनच्या सिद्धांताला आव्हान!
भारतातील वेगवेगळ्या हवामान केंद्रांवरही या लाटा जाणवल्या. पण त्यांचा काळ अंतरानुसार बदलत असे. पॅसिफिक महासागराचा संपूर्ण जागतिक हवामानावर प्रभाव पडतो. या ज्वालामुखीच्या उद्रेकाचे दूरगामी परिणाम येत्या काळात अभ्यासातून समोर येतीलच, पण वेंकटरमन यांनी म्हटल्याप्रमाणे निसर्गाला सीमा नसतात, हे लक्षात घ्यायला हवे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Earthquake, Science