मराठी बातम्या /बातम्या /explainer /आता 'तो' दिवस दूर नाही! रशियन शास्त्रज्ञांचं 'ग्रहांवरील मानवाच्या एकाकीपणावर' संशोधन

आता 'तो' दिवस दूर नाही! रशियन शास्त्रज्ञांचं 'ग्रहांवरील मानवाच्या एकाकीपणावर' संशोधन

दीर्घ अंतराळ मोहिमांवर (Long Space Missions) सुरू असलेल्या संशोधनात एक विशेष संशोधन केले जात आहे. अंतराळवीर जेव्हा अंतराळात किंवा एखाद्या ग्रहावर बराच काळ एकटे राहतात तेव्हा त्या एकाकीपणाचा त्यांच्यावर काय परिणाम होतो आणि ते त्याला कसे सामोरे जातील याचा अभ्यास रशियातील (Russia) शास्त्रज्ञ करत आहेत. रशियामधील मोठ्या मोहिमेतील सहभागींना 240 दिवसांसाठी चार कक्षांमध्ये बंदिस्त केले जाते.

पुढे वाचा ...

मॉस्को, 17 जानेवारी : आता तो दिवस दूर नाही, ज्यादिवशी मानव परग्रहावर राहायला लागेल. नुकतंच ‘स्पेसएक्सच्या मिशन मंगळ अंतर्गत येत्या पाच वर्षांत जर माणूस मंगळ ग्रहावर पोहोचला नाही तर मला नवल वाटेल, असा आशावाद अमेरिकी खासगी स्पेस कंपनी स्पेसएक्सचे (SpaceX) संस्थापक, सीईओ एलन मस्क यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पृथ्वीच्या (Earth) बाहेर चंद्र आणि मंगळ यांसारख्या ग्रहांवर मानव राहू लागेल ही निव्वळ कल्पना असणार नाही. अशा मोहिमांवर अब्जावधी डॉलर्स खर्च केले जात आहेत. एवढेच नाही तर आता याहूनही पुढे मानव पाठवण्यावर संशोधन सुरू आहे. दीर्घ मोहिमांसाठी मोठ्या प्रमाणावर संशोधन चालू आहे, जे त्यांच्याशी संबंधित आव्हानांवर उपाय शोधत आहेत. यातील काही आव्हाने दीर्घ पल्ल्याच्या प्रवासादरम्यान व्यक्तीचा एकटेपणा (Interplanetary Isolatiion) हे प्रमुख आव्हान आहे, ज्याचा अभ्यास केला जात आहे. आता रशियातील (Russia) शास्त्रज्ञ यावर मोठा अभ्यास करत आहेत.

240 दिवस बंद

नोव्हेंबर 2021 मध्ये रशियामध्ये सुरू झालेल्या या संशोधनात आंतरराष्ट्रीय संशोधकांची एक टीम चार स्वैच्छिक सहभागी 240 दिवसांसाठी आयसोलेशन चेंबरमध्ये बंद आहेत. सायरस 21 (SIRIUS-21) नावाची ही प्रायोगिक मोहीम रशियाच्या इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल प्रॉब्लेम्स (IBMP) मध्ये सुरू आहे. ज्यामध्ये अनेक देशांच्या अंतराळ संस्थांचे सहकार्य आहे.

मोठा आयसोलेशन प्रकल्प

CIRUS-21 प्रकल्प हा युनिक टेरेस्ट्रियल स्टेशन प्रोजेक्ट प्रोग्राममधील वैज्ञानिक आंतरराष्ट्रीय संशोधन आहे. नासाचा मानवी संशोधन कार्यक्रम आणि आयपीएमपी एकत्रितपणे पाच वर्षांपासून करत असलेला हा एक मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय आयसोलेशन प्रकल्प आहे. यामध्ये अनेक एकत्रित वैज्ञानिक मॉडेल प्रयोग केले जात आहेत.

विविध उपयोग

या प्रयोगांमध्ये 17, 120, 24 आणि 360 दिवसांच्या प्रयोगांची मालिका आहे, जिथे शास्त्रज्ञ अंतराळवीरांवर दीर्घकाळ एकटं राहण्याच्या परिणामांचा अभ्यास करतील, ज्यासाठी ते पाच सहभागींना चार कक्षांमध्ये सोडतात. इतर ग्रहांवर लांबच्या प्रवासासाठी मानव किती सक्षम आहेत याचा ते तपास करतील.

मंगळ मिशनवर एलन मस्कचं मोठं वक्तव्य! आगामी प्रकल्प पाहून तुम्हीही व्हाल अवाक

विशेष वातावरण

या मोहिमेची सुरुवात दोन महिन्यांपूर्वी झाली असून एकूण 5 सहभागींची सिम्युलेटेड वातावरणात चाचणी घेतली जाईल म्हणजेच ते केवळ चेंबरमध्येच बंदिस्त राहणार नाहीत, तर अंतराळ प्रवासादरम्यान प्रवाशांना जे वातावरण मिळते, तेच वातावरण त्यांना मिळेल. यामध्ये चंद्रावर उतरण्याचा आणि मून वॉक करण्याचाही अनुभव असेल.

ही मोठी संधी

या संशोधनाचे समन्वयक असलेल्या युरोपियन स्पेस एजन्सीच्या अँजेलिक व्हॅन ओम्बर्गेन म्हणतात की, आजकाल प्रत्येकजण दीर्घकाळ एकटेपणाने त्रस्त आहे. युरोपियन संशोधकांसाठी मानवी वर्तनासह त्यांच्या आरोग्यावर आणि कार्यक्षमतेवर एकटेपणाचे परिणाम समजून घेण्याची ही एक उत्तम संधी आहे.

विविध वैज्ञानिक प्रयोग

युरोपियन स्पेस एजन्सीने खुलासा केला आहे की पाच क्रू सदस्य डझनभर संशोधन अभ्यास करत आहेत. त्यात न्यूरोसायन्स, मानसशास्त्र आणि रोगप्रतिकारशास्त्रातील अनेक प्रयोगांचा समावेश आहे. क्रू सदस्यांवर टीम डायनॅमिक्स, कार्यप्रदर्शन आणि आरोग्य इत्यादींचा परिणाम समजून घेण्यासाठी ATHLETE प्रयोग सुरू आहे. ज्यामध्ये मिशन दरम्यान आणि नंतर सहभागींमध्ये झालेल्या शारीरिक आणि मनोसामाजिक बदलांचे निरीक्षण केले जाणार आहे.

याशिवाय ब्रेवचा (BRAIVE) वापर करून मेंदूच्या संज्ञानात्मक आणि इतर कार्यांमधील बदल समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामध्ये क्रू मेंबर्सकडून अंतराळयानाच्या ऑपरेशनल क्षमतेचीही चाचणी घेतली जाईल. स्पेसक्राफ्ट सिम्युलेटरद्वारे सहभागींना चंद्रावर विविध उड्डाणांचा अनुभव दिला जाईल.

First published:
top videos

    Tags: Russia, Space Centre, Space-x