नवी दिल्ली, 12 जुलै : आपला शेजारी देश श्रीलंका इतिहासातील सर्वात वाईट आर्थिक संकटातून (Srilanka crisis) जात आहे. यामागची कारणं आता शोधली जात आहेत. यातील महत्त्वाचं कारण मानलं जातंय तिथलं एक राजकीय कुटुंब. श्रीलंकेवर गेली दोन दशके राजपक्षे कुटुंबाची सत्ता होती. या घराण्यातून कधी कोणी पंतप्रधान तर कधी राष्ट्रपती झाले. मंत्र्यांपासून शक्तिशाली पदापर्यंत या घराण्याने कब्जा केला होता. अगदी अलीकडच्या काळापर्यंत या देशाचा पंतप्रधान राजपक्षे यांचा भाऊ असेल तर राष्ट्रपती हा दुसरा राजपक्षे बंधू होता. या घराण्यातील लोकांनाही मंत्रिमंडळात भरपूर स्थान होते. जेव्हा महिंदा राजपक्षे यांनी मोठ्या आणि दीर्घ लष्करी कारवाईत एलटीटीई आणि त्याचा म्होरक्या प्रभाकरन यांचा खात्मा केला, तेव्हा या कुटुंबाची श्रीलंकेत पूजा करण्यात आली. मात्र, आता हे कुटुंब भ्रष्टाचार आणि चुकीच्या निर्णयांमुळे देशातील नंबर वन खलनायक बनले आहे. रविवारी, हजारो लोकांच्या संतप्त जमावाने देशाच्या राष्ट्रपती भवनावर हल्ला केला आणि ते ताब्यात घेतले, तेव्हा विद्यमान राष्ट्रपती गोटाबायो राजपक्षे तेथून निसटले. आता ते कुठे आहेत हे कोणालाच माहीत नाही, पण आता त्यांच्या राजीनाम्याची बातमी नक्कीच येत आहे. यावेळी सर्व बाजूंनी श्रीलंका ज्या भीषण संकटात अडकली आहे त्यासाठी या कुटुंबाला जबाबदार धरले जात आहे. मात्र, राजपक्षे कुटुंबातील लोकांनी परदेशात पळून जाऊन तेथे आश्रय घेतल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यांनी आपली मालमत्ता देशाबाहेर मोठ्या प्रमाणावर परदेशी बँकांमध्ये साठवली आहे. एकेकाळी राजपक्षे कुटुंब हे श्रीलंकेतील सर्वात शक्तिशाली राजकीय कुटुंब होते. सर्वात श्रीमंत आणि सर्वात धोकादायकही. सोबत देशातील सर्वात प्रिय कुटुंब देखील. प्रसारमाध्यमे त्यांचे कौतुक करताना थकत नव्हती. जो त्यांच्या विरोधात उभा राहिला तो एकतर तुरुंगात गेला किंवा गायब झाला. मात्र, आता ते सर्वांसाठी देशातील सर्वात मोठे खलनायक कुटुंब बनलंय. गेल्या दीड दशकांपासून या कुटुंबाने श्रीलंकेवर जबरदस्त पकड ठेवली आहे. या कुटुंबाच्या इच्छेशिवाय श्रीलंकेचे पानही हलू शकत नव्हते. श्रीलंकेत दरवर्षी सादर होणाऱ्या बजेटच्या 70 टक्के भागावर या कुटुंबाचा ताबा असायचा. म्हणजे कौटुंबिक व्यवसाय आणि या कुटुंबाच्या फायद्यानुसार बजेट तयार केले गेले. एकेकाळी या कुटुंबाकडे शाळेत जाण्यासाठीही पैसे नसल्यामुळे जगणे कठीण होते. परंतु, आता त्यांच्याकडे अफाट संपत्ती असल्याचे मानले जाते. जी जगभरातील बँकांमध्ये अत्यंत गोपनीय पद्धतीने ठेवण्यात आली आहे किंवा लपवून ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महागडे पेंटिंग्स, दागिने, मौल्यवान वस्तू, आलिशान घरे या कुटुंबाकडे गुप्तपणे जगभर पसरलेली आहेत. याचा बंदोबस्त करण्यासाठी सर्व व्हाईट कॉलर व्यावसायिक, वकील आणि काळा पैसा लपवणाऱ्या कंपन्यांची मदत घेतली जाते. पँडोरा पेपर्सकडून भांडाफोड या कुटुंबाशी संबंधित असलेल्या निरुपमा राजपक्षे आणि त्यांचे तमिळ हिंदू पती तिरुकुमार नादेसन, यांनी जगभरातील विविध शेल कंपन्या आणि ट्रस्टच्या मदतीने राजपक्षे कुटुंबाची अफाट संपत्ती कशी व्यवस्थापित केली याचा भांडाफोड पँडोरा पेपर्सने केला होता. राजपक्षे कुटुंब सत्तेत राहण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून तमिळ आणि सिंहली यांच्यात द्वेष निर्माण करण्याचे राजकारण करत असल्याचे श्रीलंकेच्या राजकारणात मानले जाते. पण, प्रत्यक्षात त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचे विवाह तामिळ कुटुंबात झाले आहे. “द इकॉनॉमिस्ट"ने आपल्या एका लेखात राजपक्षे कुटुंबाविषयी लिहिले आहे, की राजपक्षे कुटुंबाची समस्या ही नाही की सरकारमध्ये त्यांच्या कुटुंबातील इतके लोक का आहेत? तर समस्या ही आहे की जास्त का नाहीत.
4 भावांनी देशाची कशी लावली वाट? “ब्लूमबर्ग"च्या अहवालात म्हटले आहे की 4 शक्तीशाली भावांनी मिळून श्रीलंकेचा नाश कसा केला. राजपक्षे कुटुंबीय अनेक दशकांपासून श्रीलंकेच्या संपत्तीवर डल्ला मारत आहेत. तिथला अफाट पैसा परदेशात पाठवून देशाला पोकळ बनवलं आहे, अशा कथा आता जगभरातील प्रसारमाध्यमांमध्ये छापल्या जात आहेत. शेल कंपन्यांच्या माध्यमातून प्रचंड संपत्ती जगभर साठवली Pandora Papers नुसार, 2018 मध्ये, स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा फ्री पोर्टवर जाण्यासाठी लंडनमधील एका मोठ्या गोदामातून 21 मौल्यवान पेंटिंग्स लोड केली जात होती. ज्याची किंमत एक 10 लाख डॉलर्सपेक्षा जास्त होती. त्यात राजा रविवर्मा यांची काही मौल्यवान चित्रेही होती. ही चित्रे सामोआमधील एका शेल कंपनीच्या मालकीची होती, ज्यांच्या स्ट्रिंग्स पॅसिफिक कमोडिटीज लिमिटेड आहेत, ज्यांचे संचालक निरुपमा राजपक्षे यांचे पती आहेत. परदेशातील गुप्त मालमत्ता आणि संपत्तीचे व्यवस्थापन कोण करतंय? पँडोरा पेपर्समध्ये असे म्हटले आहे की हे जोडपे अनेक वर्षांपासून राजपक्षे कुटुंबाच्या बाहेरील अफाट संपत्तीचे व्यवस्थापन गुप्तपणे करत आहे. निरुपमा या श्रीलंकेचे विद्यमान राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या भाची आहेत, त्या स्वत: श्रीलंकेच्या सरकारमध्ये माजी मंत्री राहिल्या आहेत आणि खासदारही आहेत. इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्टच्या अहवालात असे म्हटले आहे की या जोडप्याने गेल्या काही दशकांमध्ये राजपक्षे कुटुंबाच्या एवढ्या मोठ्या संपत्तीचे आणि मालमत्तेचे एक गुप्त साम्राज्य उभे केले आहे जे जाणून जगाला आश्चर्य वाटेल. राजपक्षे कुटुंबाची देशाबाहेर किती संपत्ती आहे? देशाबाहेर या कुटुंबाची एकूण संपत्ती 18 मिलियन डॉलरपेक्षा जास्त असल्याचा अंदाज आहे. कोलंबो टेलिग्राफच्या अहवालात असे म्हटले आहे की 2005 ते 2015 दरम्यान या कुटुंबाने कमिशन आणि भ्रष्टाचारातून 1.2 अब्ज डॉलर कमावले. त्यानंतर रक्कम आणखी वाढेल. मानवाधिकार संघटनांच्या नजरेत, श्रीलंकेचे माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी ज्या प्रकारे एलटीटीई विरुद्धच्या गृहयुद्धात लष्कराला झोकून देऊन ही संघटना नष्ट केली, त्यात 40 हजारांहून अधिक लोक मारले गेले. त्याला युद्ध गुन्हेगार मानले जाते. सर्व दबाव आणि आवाहनांना न जुमानता, महिंदा यांनी कधीही या ऑपरेशनची आंतरराष्ट्रीय चौकशी होऊ दिली नाही. जगही त्यांचे काहीच वाकडे करू शकले नाही. तमिळ आणि लिट्टे यांच्यावर कारवाई करून हिरो तमिळ आणि लिट्टे यांच्यावर कारवाई करून महिंदा आपल्या देशातील सिंहली आणि बौद्धांचे नायक बनले. त्यानंतर ते अशा प्रकारे सिंहासनाला चिकटून बसले की संपूर्ण कुटुंबाच्या ताब्यात देश आला. 2019 मध्येच त्यांना काही काळ निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. अनेक देशांच्या बँकांमध्ये गुप्त पैसा दडलेला राजपक्षे यांची संपत्ती दुबई, सेशेल्स आणि सेंट मार्टिनसह टॅक्स हेवन देशांतील बँकांमध्ये दडलेली असल्याचे श्रीलंकेच्या माजी अधिकाऱ्यांचे मत आहे. या कुटुंबातील प्रामुख्याने आठ जणांची भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चौकशी सुरू होती. मात्र, गोटाबायो राजपक्षे राष्ट्रपती झाल्यानंतर ही चौकशी थांबली होती. 2009 मध्ये, महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधान असताना एलटीटीई प्रमुख प्रभाकरनसह संपूर्ण संघटना नष्ट केली. त्यानंतर ते देशात हिरो बनले. यानंतर दुसऱ्या टर्मची निवडणूक त्यांनी सहज जिंकली. तेव्हापासून श्रीलंकेवर या कुटुंबाची पकड कमी-अधिक प्रमाणात घट्ट होत गेली. श्रीलंकेच्या या अवस्थेसाठी त्यांना जबाबदार मानले जात आहे. चीनी कंपन्यांना आश्रय महिंदा राजपक्षे यांनी दुसऱ्यांदा निवडणूक जिंकताच त्यांनी भारतीय कंपन्यांना काढून देशातील मोठे प्रकल्प चीनला देण्यास सुरुवात केली. येथूनच देशात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराला सुरुवात झाली. जे राजपक्षे कुटुंबालाच समृद्ध करत होते. गेल्या दीड दशकात या कुटुंबाने आपल्या राजकीय विरोधकांनाही मोठ्या प्रमाणावर आश्रय दिल्याचे बोलले जाते. श्रीलंकेतील भयानक आर्थिक संकटानंतर नागरिकांचा उद्रेक; अखेर पंतप्रधानांची राजीनाम्याची घोषणा राष्ट्रपती गोटाबायो राजपक्षे वयच्या 72 व्या वर्षी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा देणारे गोटाबायो राजपक्षे यांना खूप रागीट समजले जाते. ते त्यांच्या मोठ्या भावाचा मुख्य सरदार होते. LTTE विरुद्ध ऑपरेशन चालू असताना संरक्षण खाते त्यांच्या मोठ्या भावाकडे होते. पण, संरक्षण सचिव म्हणून काम करताना या कारवाईत त्यांची मोठी भूमिका होती. पंतप्रधान महिंदा राजपक्षे जेव्हा गोटाबायो यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली, त्यानंतर त्यांनी मोठा भाऊ महिंदा (76 वर्षे) यांना देशाचे पंतप्रधान केले. गोटाबायो यांनी त्यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी पंतप्रधान करण्याची ही दुसरी वेळ आहे. कुटुंबाचा सूत्रधार धाकटा भाऊ बेसिल हा अर्थमंत्री नुकताच अर्थमंत्री पदाचा राजीनामा देणारे बेसिल राजपक्षे यांच्याकडे दुहेरी नागरिकत्व आहे. 70 वर्षीय बेसिल यांच्याकडे अमेरिकन नागरिकत्वही आहे. ते प्रत्यक्षात या कुटुंबाचा खरा सूत्रधार मानले जातात. महिंदा यांना अनेक गंभीर आजारांनी ग्रासले आहे, त्यामुळे त्यांच्या जागी बेसिल देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, अशीही चर्चा आहे. त्यांना मिस्टर टेन पर्सेंट असेही म्हणतात, म्हणजेच ते सर्व सरकारी कंत्राटांमध्ये कमिशनशिवाय काहीही करत नाही. चमन राजपक्षे हे कृषी मंत्री अन् पहिले स्पीकर दुसरा भाऊ चमल 79 वर्षांचे आहे. यापूर्वी ते लोकसभेचे अध्यक्ष होते. आता अनेक खात्यांचे मंत्री. एकेकाळी ते श्रीलंकेत पोलीस अधिकारी होते. पण, नंतर श्रीलंकेच्या पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमाओ बंदरनायके यांचे वैयक्तिक अंगरक्षकही बनले. चमल यांचा मुलगाही सरकारमध्ये राज्यमंत्री आहे. महिंदा यांचा मुलगा तमल हा देखील एक शक्तिशाली मंत्री महिंदाचा मुलगा तमल याला उद्या देशाची सूत्रे हाती घेता यावीत, अशा पद्धतीने तयार केले जात आहे. 35 वर्षीय तमल यांनी केवळ 24 वर्षांचे असताना राजकारणात प्रवेश केला. सध्या ते देशाचे शक्तिशाली आणि प्रभावी मंत्री आहेत. त्याच्यावर मनी लाँड्रिंग आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. भारताचा अभिमानास्पद शेजारधर्म! आम्ही श्रीलंकेच्या नागरिकांसोबत म्हणत 3.8 अब्ज US डॉलरची मदत 1930 पासून कौटुंबिक राजकारणात 1930 च्या दशकात राजपक्षे कुटुंबात राजकारण सुरू झाले. जेव्हा राजपक्षे बंधूंचे काका राजकारणात आले आणि त्यांनी निवडणूक लढवली. त्यांच्या मृत्यूनंतर वडील डॅन अल्विन यांनी हममंटोटा येथून निवडणूक जिंकली. ते अनेकवेळा खासदार होते. नंतर त्यांनी एक राजकीय पक्ष स्थापन केला आणि निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर कुटुंबाचे दिवस फिरले त्यानंतर त्यांची आर्थिक स्थिती इतकी बिकट झाली की त्यांना सर्वस्व गमवावे लागले. मालमत्ता विकावी लागली. त्याच्याकडे एकूण 9 मुले होती आणि त्या सर्वांना वाढवणे आणि शाळेची फी भरणेही कठीण झाले. जेव्हा अॅल्विनला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा त्याला योग्य वेळी रुग्णालयात नेण्यासाठी घरात कोणतेही साधन नव्हते. यामुळे त्यांचा मृत्यू झाला. महिंदा पुन्हा राजकारणात चमकू लागले यानंतर महिंदा राजपक्षे यांचा तारा हळूहळू राजकारणात चमकू लागला. पुढे त्यांनी केवळ स्वत:लाच नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि काकाच्या कुटुंबीयांना सोबत घेऊन राजकारणात स्वत:ला बळकटी देण्यास सुरुवात केली. मात्र, हा काळ संयमी आणि निर्दयी राजपक्षे बंधूंसाठी चांगला नाही.