कोलंबो, 9 जुलै : श्रीलंकेतील भयानक आर्थिक संकटानंतर नागरिकांचा उद्रेक झाला आहे. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (Sri Lanka Prime Minister Ranil Wickremesinghe) यांनी सरकार चालू ठेवण्यासाठी आणि सर्व नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपण आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. ट्विट करत त्यांनी याबाबत माहिती दिली. (Ranil Wickremesinghe Resign Tweet) ते म्हणाले की, सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांची सर्वोत्तम शिफारस स्वीकारतो. तत्पूर्वी, श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी एका निवेदनात म्हटले आहे की, बेटव्यापी इंधन वितरण या आठवड्यात पुन्हा सुरू होणार आहे. तसेच जागतिक अन्न कार्यक्रमाचे संचालक (World Food Program Director) या आठवड्यात देशाला भेट देणार आहेत. आणि आयएमएफचा कर्ज स्थिरता अहवाल लवकरच तयार होणार आहे." “नागरिकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी, विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या या शिफारसीला ते सहमत आहेत,” असे निवेदनात म्हटले आहे.
To ensure the continuation of the Government including the safety of all citizens I accept the best recommendation of the Party Leaders today, to make way for an All-Party Government.
— Ranil Wickremesinghe (@RW_UNP) July 9, 2022
To facilitate this I will resign as Prime Minister.
दरम्यान, श्रीलंकेचे खासदार हर्षा डी सिल्वा यांनी सांगितले की, पक्षाच्या बहुसंख्य नेत्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या राजीनाम्यावर आणि सभापतींनी जास्तीत जास्त 30 दिवस राष्ट्रपती म्हणून काम करण्याचे मान्य केले आहे. ते पुढे म्हणाले की, उर्वरित कालावधीसाठी खासदाराची निवड संसदेद्वारे केली जाईल, यावर नेत्यांचेही एकमत झाले. दरम्यान, श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षेही लवकरच राजीनामा देऊ शकतात, असा दावा केला जात आहे. राष्ट्रपती भवनावर आंदोलकांनी केलेल्या हल्ल्यानंतर ते सध्या फरार आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव विक्रमसिंघे यांनाही अज्ञातस्थळी नेण्यात आले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी पक्षाच्या नेत्यांची बैठकही घेतली.
श्रीलंकेतील आंदोलकांचा राष्ट्रपती भवनाला घेराव -
आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या श्रीलंकेतील आंदोलनाची झळ राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनाही बसली आहे. आंदोलकांनी शनिवारी कोलंबोमधील राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. त्यानंतर गोटाबाया त्यांचे अधिकृत निवास्थान सोडून पळून गेले (Gotbaya Rajapaksa fleed from his own house) आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे. श्रीलंकेच्या अध्यक्षांवर आंदोलकांचा मुख्य राग आहे. त्यांनी राजीनामा द्यावा ही त्यांची प्रमुख मागणी होती. त्यानंतरही राजपक्षे राजीनामा न देण्यावर ठाम होते. आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये पद सोडणार नाही, असं त्यांनी जाहीर केलं होतं. अखेर त्यांना संतप्त आंदोलकांपासून वाचण्यासाठी घर सोडून पळावं लागलं आहे.