Home /News /explainer /

नुपूर शर्मांचं वक्तव्य ते नमाजनंतर दगडफेक! या घटनांच्या मुळाशी नेमकं कोण? घटनाक्रम समजून घ्या

नुपूर शर्मांचं वक्तव्य ते नमाजनंतर दगडफेक! या घटनांच्या मुळाशी नेमकं कोण? घटनाक्रम समजून घ्या

Prayagraj Violence: दगडफेकीच्या घटना अधूनमधून होत असल्याची सध्याची परिस्थिती आहे. दंगलखोर पोलिसांवर भारी पडली आहे. त्यामुळे पोलीस दलाला माघार घ्यावी लागली. सध्या पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. मात्र, ज्याप्रकारे हल्लेखोर टोळक्याने हल्ले करत आहेत, त्यावरून स्थानिक गुप्तचर विभागाचे अपयश असल्याचे दिसून येत आहे. कारण दंगेखोर पूर्ण तयारीनिशी आले आहेत.

पुढे वाचा ...
  नवी दिल्ली, 10 जून : जिल्हा प्रशासनाच्या सर्व प्रयत्नांनंतरही कानपूरच्या धर्तीवर प्रयागराजमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सुरू झालेल्या या आंदोलनाला पाहता पाहता हिंसक वळण लागले. उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यात आज नमाजनंतर दगडफेक करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांचे सर्व प्रयत्न करूनही हल्लेखोरांनी घोषणाबाजी करत दगडफेक सुरू केली. छतावरूनही दगडफेक करण्यात आली. त्यानंतर आरएएफ आणि पीएसीने लाठीचार्ज करून त्यांना पांगवले. मात्र, आंदोलनकर्ते नियोजनबद्ध पद्धतीने दगडफेक करत असल्याचे पाहायला मिळाले. या सर्व घटनेच्या मुळापाशी नेमकं कोण आहे? कशी पडली ठिणगी? चला जाणून घेऊ. पूर्ण घटनाक्रम जाणून घ्या सध्या देशभरात वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद प्रकरणाची चर्चा आहे. शुक्रवारी, 27 मे रोजी, भाजपची प्रवक्ता म्हणून नूपूर शर्मा एका राष्ट्रीय दूरचित्रवाणी वृत्तवाहिनीच्या चर्चेत पोहोचली. चर्चेदरम्यान त्यांनी आरोप केला की, काही लोक सातत्याने हिंदू धर्माची खिल्ली उडवत आहेत. असे असेल तर ती इतर धर्मांचीही खिल्ली उडवू शकते. नूपुरने पुढे इस्लामिक श्रद्धांचा उल्लेख केला, ज्या कथित फॅक्ट चेकर मोहम्मद झुबेरने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केल्या आणि नुपूर यांच्यावर पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप केला. एफआयआर अन् सरसंघचालकांचे वक्तव्य नुपूर यांचा व्हिडिओ व्हायरल होताच 1 जून रोजी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी नुपूर शर्मांविरुद्ध महाराष्ट्रात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2 जून रोजी महाराष्ट्रातच दुसरा गुन्हा दाखल झाला. 3 जून रोजी सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंदिर मशिदीबाबत वक्तव्य केले होते. त्यात ते म्हणाले, 'इतिहास तो असतो जो आपण बदलू शकत नाही. ते ना आजच्या हिंदूंनी बांधले ना आजच्या मुसलमानांनी, ते त्याकाळी घडले.. प्रत्येक मशिदीत शिवलिंग का शोधायचे? हे योग्य नाही. आपण वाद का वाढवायचा? रोज नवीन प्रकरण आणू नये.

  Video : दगडफेक, लाठीचार्ज अन् गोळीबार; नमाज अदा केल्यानंतर मशिदीसमोर उडाला गोंधळ

  आधी स्षटीकरण नंतर कारवाई यापूर्वी 5 जून रोजी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी एक निवेदन जारी केले होते. यामध्ये त्याने नुपूर यांचे नाव घेतले नसून ते त्यांच्याबद्दल बोलत असल्याचे बोलण्यातून स्पष्ट झाले. अरुण सिंह यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'पक्ष कोणत्याही पंथाचा किंवा धर्माचा अपमान करणाऱ्या विचारसरणीच्या विरोधात आहे. पक्ष सर्व धर्मांचा आदर करतो आणि कोणत्याही धार्मिक व्यक्तिमत्त्वाच्या अपमानाचा तीव्र निषेध करतो. भाजप अशा लोकांना किंवा विचारांना प्रोत्साहन देत नाही. अरुण यांच्या वक्तव्यानंतर काही तासांनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई करण्यात आली. दोघांनाही पक्षाच्या सर्व पदांवरून काढून प्राथमिक सदस्यत्वावरून निलंबित करण्यात आले आहे. कानपूरमध्ये जातीय हिंसाचार नुपूर शर्मांच्या वक्तव्यानंतर 6 जून रोजी कानपूरमध्ये जातीय हिंसाचार झाला आहे. चांगली गोष्ट म्हणजे पोलिसांनी वेळीच दखल घेतली, पण ती फक्त सुरुवात होती. भाजपने नुपूर यांच्यावर कारवाई केली नाही. पण, देशातील इतर राज्ये आणि शहरांमध्ये अशा जातीय हिंसाचाराचा धोका वाढला होता. जातीय तणाव कमी करण्यासाठी भाजपने शर्मा यांना निलंबित केलं.

  VIDEO : प्रेषित मोहम्मद पैगंबरांवर आक्षेपार्ह विधान, औरंगाबादेत लाखो मुस्लिम बांधव रस्त्यावर, देशभरात आंदोलणाचं लोण

  दगडफेकीनंतर प्रशासन सतर्क कानपूरनंतर आग्रा येथे झालेल्या दगडफेकीमुळे प्रशासन सतर्क आहे. त्याचवेळी कानपूर हिंसाचार प्रकरणात अनेक धक्कादायक प्रकरणे समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, हिंसाचाराच्या वेळी उंच इमारतींवरून दगडफेक करण्यात आली. नवीन रस्ता आणि आजूबाजूला बेकायदेशीरपणे बांधलेल्या उंच इमारती यामुळे सुरक्षेला मोठा धोका आहे. या संदर्भात पोलीस सहआयुक्तांनी कानपूर विकास प्राधिकरणाला चौकशी करून कारवाई करण्याचे पत्र पाठवले आहे. दरम्यान, कानपूर हिंसाचारात सहभागी असलेल्या आणखी 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यासह अटक केलेल्यांची संख्या आता 38 झाली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमधील नाव आणि अज्ञात आरोपींचा समावेश आहे. शुक्रवारच्या नमाजानंतर अनेक शहरांमध्ये निदर्शने कानपूरमधील हिंसाचारानंतर आज पहिली शुक्रवारची नमाज होती. या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात पोलीस आणि प्रशासन हाय अलर्टवर होते. कानपूर शहरात कलम 144 लागू आहे. नमाजानंतर प्रयागराज, सहारनपूर, बरेलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुस्लिम समाजाच्या लोकांनी निदर्शनेही केली. प्रयागराजमध्ये पोलिस प्रशासनाला आव्हान देत आंदोलकांनी दगडफेक सुरू केली आहे. पोलिसांनी कारवाई करू नये, यासाठी कट अंतर्गत अल्पवयीन मुलांना आंदोलकांमध्ये पुढे करण्यात आले आहे.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Uttar pradesh, Violence

  पुढील बातम्या