Home /News /maharashtra /

VIDEO : प्रेषित मोहम्मद पैगंबरांवर आक्षेपार्ह विधान, औरंगाबादेत लाखो मुस्लिम बांधव रस्त्यावर, देशभरात आंदोलणाचं लोण

VIDEO : प्रेषित मोहम्मद पैगंबरांवर आक्षेपार्ह विधान, औरंगाबादेत लाखो मुस्लिम बांधव रस्त्यावर, देशभरात आंदोलणाचं लोण

नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रातही पडताना दिसत आहेत. औरंगाबादमध्ये हजारो मुस्लिम बांधव आज रस्त्यावर उतरले आहेत.

    औरंगाबाद, 10 जून : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल देशभरातील मुस्लिम बांधवांकडून निषेध व्यक्त केला जातोय. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रातही पडताना दिसत आहेत. औरंगाबादमध्ये हजारो मुस्लिम बांधव आज रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी नुपूर शर्मांच्या विरोधात निदर्शने दिली. त्याचबरोबर सोलापुरातही निदर्शने केली गेली. शुक्रवारी पवित्र नजाम पठण केलं जातं. त्यानुसार आज देशभरातील विविध मशिदींमध्ये नमाज पठण केल्यानंतर मशिदीबाहेर निदर्शने केली जात आहेत. या आंदोलनात लाखो मुस्लिम बांधव सहभागी झाले आहेत. औरंगाबाद पाठोपाठ सोलापूर, परभणी, रायगड अशी अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून निदर्शने दिली गेली. औरंगाबादमध्ये नेमकं काय घडलं? औरंगाबादमध्ये आज नमाज पठण झाल्यानंतर हजारो मुस्लिम बांधव हे विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर एकत्र जमले. यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी नुपूर शर्मा यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना अटक करा, अशी मागणी आंदोलकांकडून केली गेली. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. अनेकांकडून टाळ्या वाजवत घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात अनेक कार्यकर्त्यांना घोषणाबाजी करत आक्रोश केला. विशेष या आंदोलनादरम्यान पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली. एवढी मोठी गर्दी एकत्र उसळल्यानंतर काही विपरीत होणार नाही याची पुरेपूर काळजी पोलिसांनी घेतली. पोलिसांनी परिस्थिती सांभाळली. त्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलिल घटनास्थळी आले. तेदेखील आंदोलनात सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. नेमकं प्रकरण काय? भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेटमध्ये पैगंबर मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. यानंतर वाद अधिकच वाढला. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा अरब देशांनीही निषेध केला होता. यानंतर भाजपने नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित केले. वाद वाढल्यानंतर नुपूर शर्माने माफीही मागितली होती आणि आपले वक्तव्य मागे घेतले होते. त्या म्हणाल्या होत्या की, मी माझे शब्द मागे घेते. कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता, माझ्या बोलण्याने कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेते.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या