मराठी बातम्या /बातम्या /देश /

Video : दगडफेक, लाठीचार्ज अन् गोळीबार; नमाज अदा केल्यानंतर मशिदीसमोर उडाला गोंधळ

Video : दगडफेक, लाठीचार्ज अन् गोळीबार; नमाज अदा केल्यानंतर मशिदीसमोर उडाला गोंधळ

मोहम्मद पैगंबरांविरोधात भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या वक्तव्याविरोधात वारंवार उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) मुस्लीम समुदायाने विविध ठिकाणी आंदोलन केलं आहे.

    लखनऊ, 10 जून : मोहम्मद पैगंबरांविरोधात भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्माच्या वक्तव्याविरोधात उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) मुस्लीम समुदायाने विविध ठिकाणी आंदोलन केलं आहे. प्रयागराज, लखनऊ, मुरादाबाद आणि सहारनपूरमध्ये गोंधळ आणि घोषणाबाजी झाली. प्रयागराजमध्ये परिस्थिती अधिक बिघडली आहे. येथील अटाला येथे जुमेच्या नमाजानंतर घोषणाबाजी झाली. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याचवेळी दगडफेक सुरू झाली. पोलिसांनी लाठीहल्ला करून उपद्रव करणाऱ्या लोकांना ताब्यात घेतलं आहे. यानंतरही उपद्रवी शांत झाले नाही. त्यामुळे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. हवेत गोळीबारही करण्यात आला. दगडफेकीत आयजी राकेश सिंह हेही जखमी झाले आहेत. याशिवाय अनेक पोलीस जखमी झाले आहेत. यानंतर बडे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले.  प्रयागराजमध्ये डीएम संजय कुमार खत्री आणि एसएसपी अजय कुमार हे देखील शुक्रवारच्या नमाजपूर्वी चौक जामा मशिदीबाहेर पोहोचले आणि लोकांना शांततेच आवाहन केलं. शुक्रवारच्या नमाजानंतर पोलिसांच्या सतर्कतेनंतरही अटाळा चौक आणि आजूबाजूच्या रस्त्यावर उपस्थित अल्पवयीन मुलांना धक्काबुक्की करून गोंधळ घातल्याचे सांगण्यात येत आहे. रस्त्यावरील मुलांनी पोलिसांच्या टीमवर दगडफेक सुरू केली. यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले आहेत शेकडोंच्या संख्येमध्ये पोहोचलेल्या लोकांनी नुपूर शर्माला फाशी देण्याची मागणी केली आहे. तणावपूर्ण परिस्थितीत पोलीस आणि प्रशासकातील अधिकारी बातचीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर दुसरीकडे सहारनपूरमध्ये मुस्लीम समुदायाच्या लोकांनी गोंधळ घातला. जुमेच्या नमाजानंतर सहारनपूरच्या रस्त्यावर उतरलेल्या मुस्लीम समुदायाच्या लोकांनी 15 ते 20 मिनिटांपर्यंत मशिदीच्या बाहेर घोषणाबाजी केली. सहारनपूरच्या जामा मशिदीत 1 वाजता जुमेची नमाज सुरू केली. नमाज संपल्यानंतर नमाजी मशिदीच्या बाहेर निघाले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. हातात तिरंगा घेऊन पोहोचलेल्या तरुणांनीही आंदोलन सुरू केलं. नागरिकांनी पोलिसांचे आदेश न पाळल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी लाठीमार केल्याने सर्वजण पसार झाले. यावेळी वातावरण चिघळवणाऱ्या 6 ते 7 हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी एसडीएम दीपक कुमार यांच्यासह अधिकाऱ्यांनी तरुणांना समजावण्याचा प्रयत्न केला. 

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Muslim, Uttar pradesh

    पुढील बातम्या