मराठी बातम्या /बातम्या /explainer /

हिमालयापेक्षा उंच पर्वत रांग तयार होणार! भारताचाही आकार बदलणार, संशोधनातून नवीन माहिती समोर

हिमालयापेक्षा उंच पर्वत रांग तयार होणार! भारताचाही आकार बदलणार, संशोधनातून नवीन माहिती समोर

हिमालय (Himalaya) ही जगातील सर्वात उंच पर्वतश्रेणी (Mountain Range) आहे. मात्र, एका नवीन अभ्यासात असे सांगण्यात आले आहे की हिमालयाची ही स्थिती फार काळ टिकणार नाही. संशोधनात असे म्हटले आहे की आजपासून 20 कोटी वर्षांनंतर सोमालियाच्या (Somalia) पर्वत रांगा हिमालयापेक्षा उंच असतील. संशोधकांनी एका खास सॉफ्टवेअरद्वारे पर्वतांच्या निर्माणासाठी मॅन्युअल बनवले, ज्याचे परिणाम समोर आले.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 29 डिसेंबर : पृथ्वीची (Earth) भूस्वरूपे फार काळ एकसारखी राहत नाहीत. त्यांच्यात हळूहळू बदल होत असतात. यामुळेच आजचा भूगोल हजारो-लाखो वर्ष जुन्या भूगोलापेक्षा खूप वेगळा बनतो. एकेकाळी सर्व खंड मोठ्या खंडाचा भाग असायचे, तर आजचा हिमालय (Himalayas) एकेकाळी महासागराचा भाग होता. पण आज तो जगातील सर्वात उंच पर्वतराज आहे. एका संशोधनात असे सांगण्यात आले आहे की आजपासून 20 कोटी वर्षांनंतर नवीन पर्वतश्रेणी हिमालयापेक्षा उंच असणार आहे. संशोधकांना त्यांच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की सध्याच्या सोमालियातील (Somalia) पर्वत रांगा ह्या पूर्वीच्या हिमालयाच्या पर्वतरांगाप्रमाणेच आहेत.

पूर्वीप्रमाणे निर्माण

टेक्टोनिक हालचाली पृथ्वीच्या भूरूपांच्या निर्मितीमध्ये आणि बदलण्यात मुख्य भूमिका बजावतात. यामध्ये टेक्टोनिक प्लेट्सची एकमेकांशी टक्कर झाल्यामुळे हिमालयासारखी पर्वत रांग तयार होते. भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. डाऊ व्हॅन हिन्सबरफेन यांच्या नेतृत्वाखालील उट्रेच विद्यापीठातील संशोधकांनी शोधून काढले आहे की ज्याप्रमाणे हिमालय पर्वत रांगा तयार झाल्या आहेत, त्याचप्रमाणे सोमालियाच्या पर्वतरांगाही वरती येत आहेत.

पुरातन भूगोलाची पुनर्रचना

कन्वरशेसनमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात या बदलाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या प्रकारच्या पुरातन भूगोलाची पुनर्रचनेमध्ये टेक्टोनिक प्लेट्स, ज्वालामुखी आणि इतर पर्वत निर्मिती प्रक्रियांचा अभ्यास केला जातो आणि महासागर, सूर्य आणि वातावरण यांच्याशी त्यांचे परस्परसंबंध देखील समजले जातात.

सॉफ्टवेअरचा वापर

गेल्या 10 वर्षांपासून असे सॉफ्टवेअर विकसित केले जात आहे जे अशा प्रकारे पुनर्रचना करण्यास सक्षम आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने भूतकाळातील भौगोलिक हालचाली समजून घेता येतील आणि भविष्यातील परिस्थितीचा अंदाज लावता येईल. यातून माहिती मिळते की मोठ्या महासागर प्रवाहात तेव्हा बदल होतो जेव्हा महासागरांमध्‍ये अतिशय छोटा मार्ग उघडले जातात. जसे दोन अमेरिकन खंडांमध्‍ये उघडले गेले होते.

पृथ्वी आणि मंगळ यांसारखे ग्रह कसे तयार झाले? संशोधनात आधीच्या संकल्पनेला छेद

भूगर्भीय नोंदीची मदत

आज पृथ्वीच्या कवचाचा 70 टक्के भाग 15-20 कोटी वर्षांपूर्वी जसा होता तसाच आहे. त्यावेळी डायनासोर आधीच पृथ्वीवर फिरत होते, ज्यांचे अवशेष आज पृथ्वीच्या आवरणापर्यंत पोहोचले आहेत. मात्र, या काळात सर्व प्रकारच्या भूगर्भीय घडामोडींची माहितीही दफन झाली होती. या माहितीच्या माध्यमातून संशोधकांनी प्राचीन काळातील भौगोलिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला.

माहिती संकलन कशी केली?

हिमालयासारखे प्रसिद्ध नसलेले अनेक पर्वत तुटलेल्या टेक्टोनिक प्लेटमधील खडकांच्या निक्षेपाने आणि वाकल्यामुळे तयार झाले आहेत. त्यांच्यामध्ये जमा झालेली खनिजे आणि जीवाश्म हे खडक कसे तयार झाले हे उघड करू शकतात. महाद्वीप आणि ज्वालामुखी यांच्यात कशा प्रकारचे संबंध होते हे शोधण्यासाठी भूगर्भशास्त्रज्ञ हे संकेत गोळा करू शकतात.

सोमालिया आफ्रिकेपासून वेगळा होईल?

संशोधकांनी एक मॅन्युअल तयार केले आहे ज्यामध्ये पर्वत रांगांमध्ये आढळणाऱ्या वैशिष्ट्यांच्या आधारे पर्वतांची भौगोलिक रचना शोधली जाऊ शकते. यामुळे पुढील 20 कोटी वर्षांनंतर त्या पर्वतांची स्थिती काय असेल याचा अंदाज लावला जाऊ शकतो. यावरून त्यांना समजले की त्यावेळी सोमालियाची भूमी आफ्रिकेपासून वेगळी होऊन भारताच्या जवळ येऊ शकते.

नासासाठी यंदाचं वर्ष कसं होतं? भविष्यातील योजना पाहुन अचंबित व्हाल!

20 कोटी वर्षांनंतर यापासून जी पर्वतश्रेणी तयार होईल ती सोमालियाची रांग असेल आणि ती त्या काळातील हिमालयीन पर्वतरांग असेल. संशोधकांचे म्हणणे आहे की मादागास्कर आणि आफ्रिकेतील खाडी एक पर्वतीय पट्टा तयार करू शकते जो पूर्व युरोपातील कार्पेथियन किंवा इंडोनेशिया आणि तिमोरच्या बांडा बेटांसारखा अत्यंत वक्र असेल, तर वायव्य भारत सोमालियाच्या 50 किलोमीटर खाली गाडला जाईल. यामुळे भारतचा आकार वक्र होऊन पश्चिम नॉर्वेसारखा दिसेल.

First published:

Tags: Earth, Mount Everest