मराठी बातम्या /बातम्या /explainer /

आधी Siddharth Shukla आता Puneeth Rajkumar; फिट असूनही तरुण वयातच का येतोय Heart attack?

आधी Siddharth Shukla आता Puneeth Rajkumar; फिट असूनही तरुण वयातच का येतोय Heart attack?

सेलिब्रिटी आपल्या फिटनेसबाबत खूप जागरूक असतात. सिद्धार्थ शुक्ला आणि पुनीत राजकुमारही त्यापैकीच होते. पण तरी तरुण वयातच त्यांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला.

सेलिब्रिटी आपल्या फिटनेसबाबत खूप जागरूक असतात. सिद्धार्थ शुक्ला आणि पुनीत राजकुमारही त्यापैकीच होते. पण तरी तरुण वयातच त्यांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला.

सेलिब्रिटी आपल्या फिटनेसबाबत खूप जागरूक असतात. सिद्धार्थ शुक्ला आणि पुनीत राजकुमारही त्यापैकीच होते. पण तरी तरुण वयातच त्यांचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला.

मुंबई, 30 ऑक्टोबर : सप्टेंबर महिन्यात बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा (Siddharth Shukla) हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. आता दाक्षिणात्य सुपरस्टार पुनीत राजकुमार (Puneeth Rajkumar) याचंही हार्ट अटॅकने (celebrites died by heart attack) निधन झालं आहे. या दोघांचेही मृत्यू हे धक्कादायक होते. कारण सिद्धार्थचं (Siddharth Shukla) वय केवळ 40 वर्षं होतं, तर पुनीतचं (Puneeth Rajkumar) वय अवघं 46 वर्षे. आधी सिद्धार्थ आणि आता पुनीतच्या निधनाने कमी वयामध्ये हार्ट अटॅक (Heart attack at early age) येण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून आलं आहे. याची नेमकी कारणं काय आणि त्याला कसं रोखता येईल पाहूयात.

तज्ज्ञांच्या मते, कमी वयात हृदयविकाराचा धक्का (Causes of Heart Attack) येण्यासाठी कित्येक गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. यामध्ये खाण्या-पिण्याच्या सवयी, कामाचा ताण, विविध औषधं, आणि व्यायामाचा अतिरेक अशा काही ठळक गोष्टींचा समावेश आहे. दारू आणि सिगारेट आपल्या आरोग्याला हानीकारक असते हे आपल्याला माहितीच आहे. या दोन्ही गोष्टींचे व्यसन लागल्यास हृदयविकाराशी संबंधित तक्रारी वाढण्याचा धोका असतो.

हे वाचा - Breast Cancer : पुरुषांनाही होतो 'ब्रेस्ट कॅन्सर' अशी असतात लक्षणं, वेळीच ओळखा

धूम्रपान - तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसाला साधारणपणे दहा सिगारेट पिणाऱ्या तरुणांमध्ये हार्ट अटॅकचा धोका 50 टक्क्यांनी (smoking increases chances of heart attack by 50% percent) अधिक असतो.

जंक फूड - यासोबतच, जंक फूड आणि चायनीजचे (Junk Food increases heart attack chances) अती सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. यामुळेदेखील हृदयावर अतिरिक्त ताण पडून, अटॅक येण्याची शक्यता असते.

स्ट्रेस - कामाचा ताण आणि मानसिक तणाव (Stress and Heart attack) याचाही परिणाम तरुणांच्या आरोग्यावर होत असतो. अँग्झायटी डिसऑर्डरमुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोलचे प्रमाण वाढतं. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यताही मोठ्या प्रमाणात वाढते. कित्येक लोक तणावापासून मुक्तीसाठी व्यसनाच्या नादी लागतात, आणि हार्ट अटॅकचा धोका आणखी वाढवतात.

हे वाचा - थंडीमध्ये पेरूचं सेवन ठरेल अत्यंत लाभदायी! जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

व्यायामाचा अभाव - यासोबतच, अति प्रमाणात व्यायाम करणे हेदेखील हार्ट अटॅकसाठी एक महत्त्वाचे कारण ठरत आहे. सिक्स पॅकच्या हव्यासाने कित्येक तरुण अति प्रमाणात व्यायाम करत आहेत. तसेच, लवकरात लवकर चांगले रिझल्ट मिळण्यासाठी ते विविध प्रकारच्या स्टेरॉईड्सचीही (Steroids and Heart attack) मदत घेत आहेत. या स्टेरॉईड्सचा दुष्परिणाम होऊनही हार्ट अटॅकचा धोका वाढतो आहे.

या कारणांसोबतच, उच्च रक्तदाब (High Blood Pressure) आणि अपुरी झोप (Sleep disorder) यादेखील हृदयविकाराला आमंत्रण देणाऱ्या गोष्टी आहेत. हृदयाला मजबूत ठेवण्यासाठी दररोज किमान सात ते आठ तास झोप घेणे गरजेचे आहे. एका अभ्यासानुसार, कमी झोप घेणाऱ्यांमध्ये हार्ट अटॅकचा धोका 24 टक्क्यांनी वाढतो.

हार्ट अटॅक येण्यापूर्वीची लक्षणं

अर्थात, कित्येक वेळा हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही ठळक लक्षणंही (Heart attack symptoms) जाणवतात. अती थकवा जाणवणे, झोप न येणे, श्वास घेण्यात अडचण येणे, छातीत मळमळणे, करपट ढेकरा येणे, हृदयाची गती अनियमीत होणे आणि पोट तसेच घोट्यापाशी सूज येणे ही हार्ट अटॅकची प्रमुख लक्षणे आहेत. मात्र, कित्येक वेळा हार्ट अटॅक अचानकच येतो. त्यामुळे लक्षणे दिसण्याआधीच त्याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे.

अशा प्रकारे घ्या खबरदारी?

रिपोर्टनुसार खरंतर, हृदयाला तंदुरुस्त ठेवायचे असेल (How to avoid heart attack) तर व्यायाम करणे गरजेचे आहे. मात्र, हा व्यायाम पुरेशा प्रमाणात आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा. यासोबतच जेवणात पुरेशा प्रमाणात फळ आणि भाज्यांचा समावेश करणे, लो-फॅट पदार्थांचा आहारात समावेश करणे, जंक फूडचे सेवन कमीत कमी करणे आणि वेळच्या वेळी जेवण करणे अशा काही गोष्टी पाळून तुम्ही अकाली येणारा हृदयविकाराचा धक्का नक्कीच टाळू शकाल.

First published:

Tags: Entertainment, Health, Heart Attack, Lifestyle