नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : मद्यपान, धूम्रपान यासारख्या सवयी या खराब जीवनशैलीचा भाग आहेत. यामुळे लठ्ठपणाही वाढतो. या सवयींमुळे तरुणांमध्ये अलिकडे स्तनाच्या कर्करोगाचा (Cancer) धोका (symptoms of breast cancer in men) वाढत आहे. पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण संथ गतीनं वाढत आहे. याची वेळीच काळजी घेतली नाही, तर स्तनाच्या कर्करोगाला बळी पडणाऱ्या पुरुषांची संख्या सातत्यानं वाढत जाण्याची शक्यता आहे.
महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी आहे. दरवर्षी अशी किमान दोन प्रकरणे समोर येत आहेत. पुरुषांमध्ये, स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी पुरुषांच्या स्तनाच्या ऊतीमध्ये तयार होतात तेव्हा स्तनाचा कर्करोग होतो. सुमारे 10 वर्षांपूर्वी पुरुषांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची समस्या केवळ 50-70 वर्षांच्या लोकांनाच दिसून येत होती, परंतु आता 40-50 वर्षांच्या वयातही लोक याला बळी पडत आहेत.
हे वाचा - LIC ची जबरदस्त पॉलिसी; फक्त एकदा प्रीमियम भरा आणि निवृत्तीनंतर पेन्शन मिळवा
मंगळुरू येथील केएमसी हॉस्पिटलचे डॉ. हरीश ई यांनी 'आज तक'ला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी 140 कॅन्सरग्रस्त रुग्णांपैकी दोन रुग्ण स्तनाच्या कर्करोगाचे होते. डॉ. हरीश सांगतात की, स्तनाच्या कर्करोगाच्या 100 पैकी एक प्रकरण पुरुषांशी संबंधित आहे. तसेच, पुरुष स्तनाच्या कर्करोगाची 60-70 टक्के प्रकरणे तिसऱ्या किंवा शेवटच्या टप्प्यात लक्षात येतात. कर्करोगाच्या पेशी स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक आक्रमकपणे पसरतात.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
पुरुषांच्या स्तनाच्या कर्करोगात लोक अनेकदा गाठ उठणे किंवा अल्सरसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. या लक्षणांमुळे नंतर पाठदुखी, कावीळ आणि श्वासोच्छवासाचा त्रास होतो. पुरुषांमध्ये स्तनाचा कर्करोग अनुवांशिक कारणांमुळे होऊ शकतो. याशिवाय गायकोमास्टियाने ग्रस्त असलेल्यांना स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cancer, Health Tips