मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /थंडीमध्ये पेरूचं सेवन ठरेल अत्यंत लाभदायी! जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

थंडीमध्ये पेरूचं सेवन ठरेल अत्यंत लाभदायी! जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

 वर्षभर वेगवेगळ्या सिझनमध्ये वेगवेगळी फळं पिकतात. चांगल्या आरोग्यासाठी दररोज एक तरी सिझनल फळ खावं, असा सल्ला डॉक्टर देतात. सध्या थंडीचा सिझन सुरू झाला आहे. थंडीमध्ये पेरूचं  (Guava)  मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं.

वर्षभर वेगवेगळ्या सिझनमध्ये वेगवेगळी फळं पिकतात. चांगल्या आरोग्यासाठी दररोज एक तरी सिझनल फळ खावं, असा सल्ला डॉक्टर देतात. सध्या थंडीचा सिझन सुरू झाला आहे. थंडीमध्ये पेरूचं (Guava) मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं.

वर्षभर वेगवेगळ्या सिझनमध्ये वेगवेगळी फळं पिकतात. चांगल्या आरोग्यासाठी दररोज एक तरी सिझनल फळ खावं, असा सल्ला डॉक्टर देतात. सध्या थंडीचा सिझन सुरू झाला आहे. थंडीमध्ये पेरूचं (Guava) मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं.

    मुंबई,30 ऑक्टोबर- वर्षभर वेगवेगळ्या सिझनमध्ये वेगवेगळी फळं पिकतात. चांगल्या आरोग्यासाठी दररोज एक तरी सिझनल फळ खावं, असा सल्ला डॉक्टर देतात. सध्या थंडीचा सिझन सुरू झाला आहे. थंडीमध्ये पेरूचं  (Guava)  मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं. पेरू हे फळ आपल्या देशाच्या जवळपास सर्वच भागात आढळतं. पिकून पिवळा झालेला पेरू पाहिला की, आपल्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहत नाही. हेल्थलाइननं दिलेल्या वृत्तानुसार, हिवाळ्यात पेरू खाणं आरोग्यासाठी अतिशय चांगलं आहे. केवळ पेरूचं फळच नाही तर पेरूच्या पानांमध्येदेखील औषधी गुणधर्म आहेत. पेरूमध्ये अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants), व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. पेरूमध्ये अतिशय कमी प्रमाणात कॅलरीज असतात त्यामुळं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीदेखील त्याचा उपयोग होतो. पेरू खाल्ल्यानं शरीरातील साखर नियंत्रणात राहते आणि शरीरातील रक्ताची कमतरता नाहीशी होते. पेरूमुळं आपली रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढते परिणामी हिवाळ्यात आपलं सर्दी-खोकल्यापासून संरक्षण होत. याव्यतिरिक्त पेरूचे आणखी देखील काही फायदे आहेत. ते आपण जाणून घेउया.

    शरीरातील साखर नियंत्रणात राहते

    ज्यांना मधुमेह म्हणजेच डायबेटिसचा (diabetes) त्रास आहे, अशांसाठी पेरू खूप फायदेशीर आहे. पेरू खाल्ल्यानं रक्तातील साखर (blood sugar) नियंत्रणात राहते, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. डायबेटिस पेशंट्ससाठी पेरूची पानं आरोग्यदायी आहेत. पेरूच्या पानांचा चहा प्यायल्यानं रक्तातील अतिरिक्त साखरेचं प्रमाण कमी होतं.

    हृदय राहते निरोगी

    पेरूमध्ये अँटिऑक्सिडंटचं (Antioxidants) प्रमाण जास्त असतं. याशिवाय यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वं आढळतात. हे घटक फ्री रॅडिकल्समुळं होणारं हृदयाच्या नुकसान टाळतात. पेरूमध्ये पोटॅशियम आणि फायबर असल्यामुळं तो हृदयासाठी आरोग्यादायी आहे. पोटॅशियम आणि फायबर हे घटक शरीरातील घातक कोलेस्ट्रॉल (Cholesterol) कमी करतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात.

    पिरियड्समध्ये (मासिक पाळी) मिळतो आराम

    पिरीयड्सदरम्यान अनेक मुली आणि महिलांना तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. पेरू आणि पेरूची पानं स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याचं एका अभ्यासात आढळलं आहे. पेरूमुळं पोटातील क्रॅम्प्सदेखील कमी होतात.

    पेरू आहे इम्युनिटी बूस्टर

    हवामान आणि ऋतुबदलाचा आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत पेरूमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतात. पेरू केवळ आपली रोगप्रतिकारक शक्तीच वाढवत नाही तर ऊर्जा देखील देतो.

    पचनकार्य सुरळीत राहते

    इतर फळांच्या तुलनेत पेरूमध्ये सर्वाधिक फायबर असते. त्यामुळं बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. पेरूच्या बिया गॅस आणि अपचनाच्या समस्येवर मात करण्यासाठी मदत करतात.

    पेरू खाल्ल्यानं आपल्या शरीराला विविध फायदे होतात. त्यामुळे आता सुरू झालेल्या थंडीच्या ऋतूमध्ये पेरू खाऊन तुम्ही निरोगी राहण्याचा प्रयत्न नक्की करू शकता.

    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle