जाहिरात
मराठी बातम्या / Explainer / पोपटासारखा बोलणार आफताब! श्रद्धा हत्याकांडातील 'खून्या'ची कशी होणार पॉलीग्राफ अन् नॉर्को टेस्ट

पोपटासारखा बोलणार आफताब! श्रद्धा हत्याकांडातील 'खून्या'ची कशी होणार पॉलीग्राफ अन् नॉर्को टेस्ट

पोपटासारखा बोलणार आफताब!

पोपटासारखा बोलणार आफताब!

Shraddha Murder Case: श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणात तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याची पॉलीग्राफ आणि नॉर्को टेस्ट होणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 22 नोव्हेंबर : देशाला हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्लीतील मेहरौली येथे आपली लिव्ह-इन-पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करणारा आरोपी आफताब आता तिच्या हत्येचे रहस्य लवकरच उघड करणार आहे. नार्को चाचणीपूर्वी आरोपी आफताब पूनावालाची पॉलीग्राफ चाचणी होणार आहे. श्रद्धा हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांना आफताब पूनावालाची पॉलीग्राफ चाचणी करण्यास न्यायालयाकडून परवानगी दिली आहे. आता आफताबची पॉलीग्राफिक चाचणी एफएसएलद्वारे केली जाणार आहे. यानंतर वैद्यकीय तपासणी केली जाईल आणि त्यानंतरच नार्को चाचणी केली जाईल. चला तर मग जाणून घेऊया श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबची पॉलिग्राफ आणि नार्को टेस्ट कशी होणार आहे. पॉलीग्राफ टेस्टमध्ये काय होते? वास्तविक, पॉलीग्राफ चाचणीमध्ये भूल दिली जात नाही. मात्र, कार्डिओ कफ सारखी मशीन वापरली जाते, ज्यामध्ये रक्तदाब, घाम, श्वास, नाडी, रक्त प्रवाह मोजला जातो. यामध्ये डॉक्टर ब्रेन मॅपिंग करतात आणि एखाद्या लबाड गुन्हेगाराच्या मनात काय चालले आहे, यावर लक्ष ठेवले जाते. पॉलिग्राफ टेस्टमध्ये आफताबला या प्रक्रियेतून जावे लागेल आणि त्यानंतरच आफताबच्या दुष्ट मनात काय चालले आहे हे पोलिसांना कळेल. नार्को टेस्टमध्ये काय होते? दुसरीकडे, नॉर्को टेस्टमध्ये इंजेक्शन आणि औषधे दिली जातात. ज्याची नॉर्को चाचणी केली जाते, त्याला अर्धवट बेशुद्ध अवस्थेत नेले जाते. नार्को चाचणीच्या वेळी प्रश्न विचारले असता, गुन्हेगार बनावट कथा सांगत नाही तर तो खरं बोलतो, असा विश्वास आहे. तो अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असल्याने रुग्णाचे वय काय आणि त्याची प्रकृती काय आहे? हे नॉर्को चाचणीत पाहणे आवश्यक आहे, त्या आधारे इंजेक्शन आणि औषधांचे डोस दिले जातात. जर एखाद्याला मोठा आजार असेल तर नॉर्को चाचणी करणे घातक ठरू शकते आणि ते टाळले जाते. वाचा - श्रद्धाची हत्या का केली?, आफताफने कोर्टात सांगितली ‘ती’ परिस्थिती… आफताबवर पोलिसांना संशय का? 18 मे रोजी श्रद्धाची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून 12 नोव्हेंबरपर्यंत श्रद्धाला मारले नसून ती स्वतः घर सोडून निघून गेल्याचे आफताब खोटे बोलत राहिला. श्रद्धाच्या वडिलांनी ती बेपत्ता झाल्याचं रिपोर्ट केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. यानंतर मुंबई पोलिसांनी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर श्रद्धाचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले.

News18लोकमत
News18लोकमत

आफताबला 12 नोव्हेंबरला अटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय पूनावाला याने 18 मे रोजी श्रद्धा वालकर (वय 27) हिचा गळा दाबून खून केला. तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. तो इथेच थांबला नाही तर दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील निवासस्थानी सुमारे तीन आठवडे 300 लिटरच्या फ्रीजमध्ये हे तुकडे त्याने ठेवले होते. अनेक दिवसांपासून तो मध्यरात्रीनंतर शहरात अनेक ठिकाणी हे तुकडे फेकत होता. आफताबला पोलिसांनी 12 नोव्हेंबरला अटक केली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , vasai
  • First Published :
जाहिरात
जाहिरात