घरावर तिरंगा फडकवण्याआधी नवीन नियम माहिती असायला हवेत; अन्यथा होऊ शकतो ध्वजाचा अपमान
भारताचा पहिला ध्वज कधी आणि कोणी बनवला? 1904 मध्ये, विवेकानंदांच्या शिष्या सिस्टर निवेदिता यांनी प्रथम ध्वज बनवला, ज्याला निवेदिता ध्वज म्हणतात. पहिल्यांदा तिरंगा कधी आणि कोणी बनवला? 1906 मध्ये बंगालच्या फाळणीच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शचिंद्रकुमार बोस यांनी प्रथमच तीन रंगांचा झेंडा हातात घेतला होता. या ध्वजात वरच्या बाजूला भगवा, मध्यभागी पिवळा आणि तळाशी हिरवा रंग वापरण्यात आला होता. India@75 : फक्त भारतच नाही तर 'हे' पाच देशही 15 ऑगस्टला झाले स्वतंत्र; प्रत्येकाची कहाणी वेगळी परदेशात प्रथमच भारतीय ध्वज कधी फडकवण्यात आला? 1908 मध्ये भिकाजींनी जर्मनीत तिरंगा ध्वज फडकावला होता. त्यात वरच्या बाजूला हिरवा, मध्यभागी भगवा आणि तळाशी लाल रंग होता. हा ध्वज भिकाजी कामा, वीर सावरकर आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांनी संयुक्तपणे तयार केला होता. भारताच्या वर्तमान ध्वजाची रचना कोणी केली? सध्याच्या भारतीय राष्ट्रध्वजाची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली होती.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Independence day