Home /News /explainer /

घरावर तिरंगा फडकवण्याआधी नवीन नियम माहिती असायला हवेत; अन्यथा होऊ शकतो ध्वजाचा अपमान

घरावर तिरंगा फडकवण्याआधी नवीन नियम माहिती असायला हवेत; अन्यथा होऊ शकतो ध्वजाचा अपमान

Tiranga Questions, Indian Flag: भारताच्या राष्ट्रध्वजाला तिरंगा म्हणतात. त्यात तीन रंग असल्यामुळे त्याला तिरंगा म्हणतात. भारतीय ध्वज अनेक बदलांमधून गेला आहे.

  नवी दिल्ली, 6 ऑगस्ट : यंदा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. तुम्ही देखील घरोघरी तिरंगा मोहिमेबद्दल ऐकलं किंवा पाहिलं असेल. भारतीय ध्वज 'तिरंगा' हे आपल्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. तो (Har Ghar Tiranga) फडकवणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारतीय ध्वज बनवण्याबाबत आणि फडकवण्याबाबत अनेक प्रकारचे नियम आणि कायदे करण्यात आले आहेत, ज्यांचे पालन प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. (Flag Hoisting Rules). ध्वजसंहिता कधी लागू झाली? भारतात तिरंगा फडकावण्यासंबंधीचे सर्व नियम ध्वज संहिता 2002 अंतर्गत करण्यात आले आहेत. त्याची अंमलबजावणी 26 जानेवारी 2002 पासून करण्यात आली. ध्वजसंहिता किती भागांमध्ये विभागली आहे? ध्वज संहिता 2002 तीन भागांमध्ये विभागलेला आहे. पहिल्या भागात, तिरंग्याशी संबंधित सामान्य माहिती आहे - त्याचा आकार, रंग आणि बनवण्याची पद्धत. दुसऱ्या भागात सामान्य लोक, खाजगी संस्था आणि इतर संस्थांमध्ये ध्वजारोहण करण्यासंबंधीचे नियम आहेत. तिसर्‍या भागात राज्य सरकार, केंद्र सरकारच्या संस्था आणि त्यांच्याशी संबंधित एजन्सींसाठीच्या धोरणांची माहिती आहे. ध्वज कशापासून बनवला जाऊ शकतो? आतापर्यंत हाताने विणलेल्या आणि कातलेल्या लोकर, कापूस किंवा रेशमी खादीपासून बनवलेला राष्ट्रध्वज फडकवण्याची परवानगी होती. मात्र, नव्या बदलांतर्गत मशीन, लोकर किंवा रेशमी खादीपासून बनवलेला तिरंगाही फडकवता येणार आहे. यासोबतच पॉलिस्टरचा बनलेला तिरंगाही फडकवता येतो. रात्री आपण तिरंगा फडकवू शकतो का? आत्तापर्यंत घर, खाजगी संस्था किंवा इतर संस्थांमध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकावता येत होता. मात्र, आता 24 तास तिरंगा फडकवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

  India@75 : फक्त भारतच नाही तर 'हे' पाच देशही 15 ऑगस्टला झाले स्वतंत्र; प्रत्येकाची कहाणी वेगळी

  5- ध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर किती असावे? ध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर 3:2 आहे. टेबलावर कोणत्या आकाराचा तिरंगा ठेवता येईल? VVIP च्या विमानावर 450X300 मिमी, मोटार कारवर 225X150 मिमी आणि टेबलवर 150X100 मिमी आकाराचा तिरंगा ठेवता येतो. अशोक चक्रात किती आऱ्या आहेत? तिरंग्याच्या वरच्या बाजूला नेहमीच भगवा, मध्यभागी पांढरा आणि तळाशी हिरवा असतो. अशोक चक्र मध्यभागी बनविलेले आहे, ज्याच्या आत 24 आऱ्या आहेत. राष्ट्रध्वज कुठे फडकवता येईल? (a) राष्ट्रपती भवन (b) संसद भवन (c) अगदी सामान्य लोकांच्या घरी (d) वरील सर्व (राष्ट्रध्वज कुठेही फडकता येतो)
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Independence day

  पुढील बातम्या